आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
साईना नेहवाल आणि पी व्ही सिंधू भारताची मान उंचावणाऱ्या महिला खेळाडू. या दोघींपैकी कोणाचंही नाव नुसतं ऐकलं तरी संपूर्ण देशाच्या डोळ्यासमोर बॅडमिंटन हा खेळ उभा राहतो. बॅडमिंटन हा खेळ आजच्या घडीला सगळ्यात जगामध्ये लोकप्रिय खेळ आहे.
संपूर्ण जगभरात लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत बॅडमिंटन खेळ खेळला जातो. ऑलिम्पिकमध्ये याला मानाचे स्थान आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
मात्र या खेळात सगळ्यात जास्त पदकं कोण घेऊन जातात तर ते म्हणजे चीन, कोरिया, इंडोनेशिया, जपान इत्यादी. पण या बॅडमिंटन खेळाचा उगम किंवा हा खेळ नक्की कुठे तयार झाला, तो कोणासाठी तयार केला गेला, कोणी तयार केला या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहीतच नसतात.
बॅडमिंटन हा भारतात शोधला गेलेला खेळ आहे. होय आणि त्यातही महाराष्ट्राची मान उंचावली जाईल, शिवाय पुणेकरांना शायनिंग मारता येईल. कारण बॅडमिंटन हा पुण्यात निर्माण झालेला गेम आहे.
इंग्रजांनी बॅडमिंटन हा खेळ जगाला दिलेली देणगी म्हणता येईल. पण त्यांनी हा खेळ का तयार केला ते आपण जाणून घेऊ!
कसा खेळला गेला बॅडमिंटनचा पहिला सामना?
साधारणपणे १८६७ साली इंग्रजांनी त्यांच्या आणि त्यांच्या मड्डमांच्या मनोरंजनासाठी म्हणून हा खेळ तयार केला. खडकीमध्ये आर्मी ऑफिसर्सच्या बंगल्यामागच्या अंगणात हा खेळ खेळला गेला.
त्यांनी ग्राऊंडला विभागेल असं नेट तयार केलं. त्यानंतर प्लॅस्टिक किंवा चामड्यापासून शटलकॉक बनवलं आणि लाकडाच्या रॅकेट तयार केल्या. पण खेळाच्या वस्तू तयार करायला जेवढे कष्ट त्यांनी घेतले तेवढे नाव ठरवण्यासाठी अजिबात घेतले नाहीत.
–
- भारतीय क्रिकेटमधील “या” भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील…
- ‘सिंधू’ हैं हम, ‘वतन’ हैं ‘बॅडमिंटन’ हमारा… ‘फुलराणी’चं यश दिसतंय, त्याग सुद्धा समजून घ्या!
–
त्यांनी या खेळाचं नाव जिथं खेळला गेला त्या जागेवरूनच म्हणजे पूना असं ठेवलं. त्यांनी या खेळासाठी काही रुल्सही तयार केले. पूना हा खेळ कधीकधी गेट टू गेदर करण्यासाठी असलेल्या चर्चच्या हॉलमध्येही खेळला जात होता.
इंग्रजांनी भारतात रेल्वे आणि पोस्ट ऑफिस जसं त्यांच्या सोयीसाठी म्हणून तयार केलं तसंच हा खेळ त्यांच्या मनोरंजनासाठी म्हणूनच तयार केला होता.
पूनाला बॅडमिंटन हे नाव कसं मिळालं?
भारतातल्या अनेक महत्त्वाच्या आणि भारतीयांच्या भावना जोडलेल्या वस्तू जशा इंग्रजांनी त्यांच्या देशात नेल्या, तसाच हा खेळही त्यांनी इंग्लंडला नेला. तिथे या खेळाने ब्युफोर्टच्या नवव्या ड्यूक हेन्री ॲडेलबर्ट वेलिंग्टन फिट्झरॉय सॉरेटचे लक्ष वेधून घेतले.
त्यामुळे १८७३ मध्ये त्यांनी या खेळाची त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यांना ओळख करून दिली. हे खेळ ग्लॉस्टरशायरमध्ये असलेल्या बॅडमिंटन हाऊस इथे खेळाला गेला. त्यामुळे या खेळाला बॅडमिंटन हे नाव मिळालं आणि बॅडमिंटन या खेळाचं भारताशी असलेलं नातं हळूहळू पुसलं गेलं.
इंग्रजांच्या आधीही बॅडमिंटन खेळ भारतात होता?
होय! इंग्रजांनी या खेळाला संपूर्ण सुधारित स्वरूप दिलं हे खरं असलं तरीही १८५६ मध्ये हा खेळ दक्षिण भारतात खेळला गेला होता. बॉल बॅडमिंटन असं त्याला म्हणता येईल.
या खेळात इंग्रजांनी वापरली तसलीच लाकडी रॅकेट होती. पण इथे शटलकॉकच्या ऐवजी लोकरीचा बॉल असायचा. तामिळनाडूतल्या तंजावरमध्ये तंजोर या राजघराण्यात हा खेळ खेळायचे.
हा खेळ इतका प्रसिद्ध होता की तो शटल बॅडमिंटनपेक्षा जास्त लोकप्रिय होता. तामिळनाडूबरोबरच कर्नाटक आणि हैद्राबादमध्ये खूप प्रसिद्ध होता. पण याबद्दल एक वाईट गोष्ट अशी की हा दक्षिण भारतात शोधलेला खेळ उत्तर भारतात माहितही नव्हता.
एवढा इतिहास असला तरीही बॅडमिंटनबद्दल आणखी काही गोष्टी सांगितल्या जातात. बॅडमिंटन खेळाला जवळजवळ २००० वर्षांचा इतिहास आहे. या खेळाची पाळंमुळं खणायला गेलं तर हा खेळ आधी चीनमध्ये खेळला गेला होता. त्याचे पुरावेही ब्रिटिश म्युझियममध्ये आहेत. चीनमधले शेतकरी शटलसारख्या दिसणाऱ्या वस्तूला पायाने मारताना दिसतात.
या माहितीबरोबरच अशी माहिती आहे की ज्यो दे वेलों नावाचा बॅडमिंटनशी साधर्म्य साधणारा खेळ ग्रीसमध्ये खेळला जात होता. पण हा मुख्यत्वे मुलांचा एक टाईमपास खेळ होता. समोरासमोर दोन मुलं उभी राहून लाकडी बॅटने शटलकॉक मारायचे.
हळूहळू काळानुरूप बॅडमिंटन खेळाच्या साहित्यात बदल होत गेले. देशांनुसार आणि परिस्थितीनुसार खेळण्याचे नियम बदलत गेले. मात्र या खेळाचं आताचं स्वरूप काय आहे ते आपण बघतोच.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.