' “पहले हिजाब फिर किताब”: डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा एक नवा पैलू – InMarathi

“पहले हिजाब फिर किताब”: डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा एक नवा पैलू

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – इमरान शेख

===

शाळेत असतांना आईची कायम एकच शिकवण असायची (तंबी म्हणा हवं तर) की शाळेत जाताय तर तिथे फक्त “अभ्यास एके अभ्यास” दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत डोकं खुपसायचं नाही, शाळा सुटल्यावर सरळ घरी, शाळे पासून घरा पर्यंत यायला किती वेळ लागतो(पायी किंवा सायकल वर) हे तिने आधीच माहीत केलेलं असायचं… त्यावर एक मिनिट ही वर झाला तर कुठे थांबला होता याचं स्पष्टीकरण आम्हा भावंडांना द्यायला लागायचं…. मी आणि माझ्या दोन लहान बहिणी आम्ही तिघे डॉक्टर झालो पण कॉलेज पूर्ण होईपर्यंत तिचा हा नियम कायम होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आठवीत गेलं की आठवी हा दहावीचा पाया असतो इतकाच वर्ष मेहनत करायचीय. मग नववीत गेल्यावर नववीत जितके टक्के मार्क पडले तितकेच दहावीत ही पडतात म्हणून या वर्षी दाबून अभ्यास करायचा. दहावीत गेल्यावर अकरावी सायन्सला जायचंय आपल्याला मार्क कमी पडले तर जाता येणार नाही करा अभ्यास, अकरावी ही बारावीचा पाया, बारावीच्या मार्क वरनं पुढचं सगळं ठरणार असतं. मग एंट्रन्स मग पाहिलं वर्ष मग सेकंड मग आता फायनल वर्ष, असं करत करत त्या माऊलीने आम्हाला इथवर आणलं पण अभ्यास आणि शिक्षण या व्यतिरिक्त डोक्यात काही शिरू दिलं असेल तर शप्पथ.

म्हणजे समोरचा “जय श्रीराम” म्हणाला तर आपण “अल्लाहू अकबर” म्हणायचं असतं हे आम्हाला कधी कळलंच नाही. आम्ही आपलं डोळे मिटून हात जोडून ‘या कुंदे ऋतू षारहा रं धवला’ आणि “गुरुरब्रह्मा गुरुरविष्णू गुरुरदेवो महेश्वरा.. गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मैसी गुरुदेव नमः 🙏 हेच म्हणत शिक्षण पूर्ण केलं. त्याने आमचा धर्म वैगेरे कधी खत्र्यात आलाच नाही, घरी मौलाना यायचे अरबी कुराण, नमाज शिकवायला, ते झालं की ट्यूशन, मग गृहपाठ, मग तास भर खेळणे आणि संध्याकाळी जेवण वगैरे आटोपून पाढे म्हणत झोपी जाणे, हेच आमचं रुटीन.

 

hindu muslim im

 

बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळी मी बारा वर्षाचा होतो, वडील पोलीसमध्ये रात्रंदिवस ड्युटीवर असायचे. बाहेर कर्फ्यू लागलेला शाळा ट्युशन सगळं बंद… पण तेव्हा पासून ते आजवर देखील हे सगळं काय चाललंय कुणी केलंय का केलंय.. ह्यावर आमच्या घरात कधीच चर्चा झाल्याचं मला आठवत नाही, आम्हाला जे काही समजलं ते कॉलेजला वैगरे गेल्यावर बाहेरनं समजलं.

 

babari inmarathi

 

तर मित्रांनो सांगायचा मुद्दा असा की ” पहले हिजाब फिर किताब” हे तितकच शॉकिंग आहे माझ्यासाठी जितकं तुमच्यासाठी. कसे काय आई वडील मुलांवर असे संस्कार करू शकतात? धर्म वगैरे काय जे असतं ते आपापल्या घरात, शाळा कॉलेज मधे फक्त शिक्षण आणि अभ्यास.

विशेष म्हणजे हे स्लोगन घेऊन मुली पुढे येतायेत ही खरी शोकांतिका. जिथे पाकिस्तान मध्ये (ज्यांनी धर्मासाठी, धर्माच्या आधारावर देश वेगळा घेतला) तिथे मागच्या वर्षी मुली आणि महिलांनी.. “मेरा जिस्म मेरी मर्जी” म्हणत आंदोलनं केलीत आणि बुरखा झूगारून लावला आणि तुम्ही या देशात ज्या देशाने तुम्हाला शिक्षणाचा अधिकार दिलाय तिथे पहिले धर्म आणि मग शिक्षण असं सुनावताय?? याहून वाईट काय असू शकतं???

 

muslim im

 

तुमचा मूळ फोकस फक्त आणि फक्त शिक्षण असायला हवा…. कारण जर धर्मच फॉलो करायचा म्हणलं तर तो धर्म तुम्हाला असं co-education ची (जिथं मुलं मुली एकत्र शिकतात) परवानगीच देत नाही. विचारा हवं तर कुठल्याही मौलानाला… धर्माप्रमाणे (शरीयत प्रमाणे ) तुम्ही शिक्षण घेऊ शकता फक्त जिथे १००% मुली शिकतात आणि शिकवायला देखील महिला स्टाफ आहे. हिजाब किंवा बुरखा घालून देखील तुम्ही co-educatin मधे जाऊ शकत नाही… त्याउपर आणखीनच कट्टर follow करायचा म्हणलं तर गैर मैहरमची नजर तर सोडाच पण आवाज ही तुमच्या कानी पडता कामा नये, ना तुम्ही इतक्या जोरात बोलावं की तुमचा आवाज परपुरुषाच्या कानावर पडेल. मग tv वर मीडिया समोर इंटरव्हिव वगैरे देणं तर लांबच राहिलं. हे मी म्हणत नाही तुमचे हादिस उचलून वाचा त्यात लिहलंय सगळं…. धर्मचं follow करायचाय तर 100% करा ना?? असं कशाला तळ्यात मळ्यात?

मुलींनो हे जे काही चालू आहे ते फक्त तुमचा वापर केला जातोय इतकं साधं तुम्हाला कळत नाहीये का?? तुमच्यातल्या कट्टर पुरुषांना तुमच्या शिक्षणाशी काही देणं घेणं नाही. उलट तुम्ही न शिकता घरात बसल्या तर बरंच आहे त्यांना, फक्त गरजेपुरतं उर्दू शाळेतून शिकायचं, मग धार्मिक शिक्षण घ्यायचं आणि लग्न करून सासरी जायचं तिथं ही खाली मान घालून राहायचं. सोप्पंय ना तुमच्यासाठी??? कशाला उगाच कॉलेज युनिव्हर्सिटी च्या चक्कर मधे पडताय???

एकीकडे हिजाबवरून वाद, पण इथे ८०० वर्ष जुन्या मंदिरासाठी एकत्र आले हिंदू- मुस्लिम!

हिजाब वाद: ”बिकिनी चालेल का?” अभिनेत्री शर्लिनचा प्रियंका गांधींना अजब सवाल

सावित्रीबाई फुले, आनंदी गोपाळ, फातेमा शेख यांनी धर्माच्या बेड्या झूगारून तुमच्यासाठी शिक्षणाची दारं खुली केली, त्यांचा असा अपमान करू नका… त्यांची तपासचर्या अशी फुकट घालवू नका.

 

musliim girl im

 

फक्त शिक्षण फोकस करा. तुमचे धार्मिक काय असेल ते घरात आणि फक्त तुमच्या समाजा पुरतं मर्यादित ठेवा.

धर्म ठेवा घरातआणि देश ठेवा मनात

आपला भारत देश खरंच खूप सुंदर आहे. त्याला बिघडवू नका.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?