' विक्रम साराभाई यांच्या विवाहबाह्य संबंधातून IIM अहमदाबादचा जन्म झाला; सत्य काय? – InMarathi

विक्रम साराभाई यांच्या विवाहबाह्य संबंधातून IIM अहमदाबादचा जन्म झाला; सत्य काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मान्यवरांचं कार्य जसं चर्चेत असणारं असतं, तसंच त्यांचं खासगी जीवनही लोकांच्या चर्चेत असतं. पूर्वी या चर्चा मर्यादीत स्वरुपाच्या असत कारण माध्यमांचा आजच्यासारखा स्फ़ोट झालेला नव्हता. जी काही माध्यमं होती ती प्रेस कौन्सिलच्या तत्वांनुसारच चालणारी होती.

आता परिस्थिती बदलली आहे. मुद्रीत माध्यमांची सद्दी कमी होऊन डिजिटल माध्यमांनी मुसंडी मारली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रातही सिनेमा, मालिकांवर सेन्सॉरचं लक्ष असतं तसं ओटीटी प्लॅटफ़ॉर्मवर नसल्यानं अनेक बोल्ड विषय आणि साधे विषयही बोल्डपणे मांडले जाऊ लागले आहेत. वास्तव घटनांवर आधारीत मालिका बघणं लोकांना आवडतं हे लक्षात घेत अशा प्रकारच्या सीरीजची निर्मिती करण्यात येउ लागली आहे.

अलिकडेच ‘रॉकेट बॉईज’ ही बहुचर्चित सेरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून यात भारताच्या जडणघडणीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या विक्रम साराभाई आणि होमी भाभा या वैज्ञानिकांच्या जीवनपटाला मांडण्यात आलं आहे.

 

vikram sarabhai im3

 

या दोघांनी भारतात अंतराळ आणि परमाणु विज्ञान अनुसंधान क्षेत्रात क्रांती घडविली होती. यात त्यांच्या कार्याबद्दल माहिती आहेच शिवाय खाजगी आयुष्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

ज्यावेळेस हे लोक हयात होते, तेव्हा त्यांच्या खाजगी आयुष्याला चर्चेत आणणं, सवंगपणे त्याची चर्चा चघळत रहाणं टाळलं होतं मात्र आता माध्यम विस्फ़ोटाच्या जमान्यात सगळेच उघडे उभे आहेत. इथे खासगीपण जपणं जवळपास अशक्य बनलं आहे, खासगी आयुष्याची चर्चा होणं कोणालाही टाळता येणं शक्य नाही. या सीरीजच्या निमित्तानं विक्रम साराभाई यांचं खाजगी आयुष्य आणि त्यांच्या आयुष्यातलं प्रेमप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

असा दावा केला जातो, की भारतातील प्रतिष्ठीत आय आय एम ही संस्था अहमदाबादमधे आणण्यास विक्रम साराभाई यांचं प्रेम प्रकरण कारण बनलं आहे.

यामागची कथा अशी सांगितली जाते, एकेकाळी प्रेमात पडलेल्या युगुलाचा, मृणालिनी साराभाई आणि विक्रम साराभाई यांचा संसार सुखानं चालला होता. विक्रम त्यांच्या शोध कार्यात मग्न होत, तर मृणालिनी त्यांच्या नृत्य साधनेत आणि देश विदेशातल्या नृत्याच्या कार्यक्रमात.

 

vikram sarabhai im

 

मृणालिनी यांची एक मैत्रीण, कमला चौधरी यांच्यामुळे या दोघांच्या प्रेमात तिसरा कोन आल्याचं सांगितलं जातं. कमला यांचा विवाह भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस मधील अधिकारी खेम चौधरी यांच्याशी झाला होता. १९४० च्या दरम्यान खेम चौधरी यांचं नियुक्ती लाहोर येथे करण्यात आली होती आणि याच दरम्यान त्यांचं निधन झालं.

पती निधनानंतर कमला मिशिगन विद्यालयात सामाजिक मनोविज्ञान या विषयात एम ए करण्यासाठी रवाना झाल्या. यानंतर त्यांनी याच विषयात पीएचडी देखिल केली. १९४९ साली त्या भारतात परतल्या.

मृणालिनी साराभाई यांनी कमला यांना काहीकाळ अहमदाबादमधे वास्तव्यास येण्याचा आग्रह केला. कमला फारशा उस्तुक नव्हत्या मात्र मृणालिनी यांचा आग्रह त्यांना मोडता आला नाही. याच दरम्यान विक्रम साराभाई कापड मिल कामगारांच्या समस्यांवर लढत होते. कमला यांची विक्रम यांच्याशी भेट झाली आणि कमला यांच्या शिक्षण, कार्य, अनुभवानं ते प्रभावित झाले.

 

vikram sarabhai im2

 

विक्रमनी कमला यांना अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन (MTIRA) मध्ये नोकरीसाठी विचारणा केली. यानंतर कमला आणि विक्रम यांच्या नातेसंबंधात वेगळं वळण आलं. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. याच दरम्यान मृणालिनी सतत प्रदेश दौर्‍यांवर असत.

 

vikram sarabhai im1

 

असं म्हणलं जातं, की मृणालिनी यांच्या या सतत परदेशी जाण्यानं या दोघांना एकमेकांसाठी पुरेसा वेळ उपलब्ध करुन दिला. या दोघांचं प्रेम जुळण्यात आणि ते पुढे जाण्यात कुठे न कुठे हे परदेशी दौरे कारणीभूत होते. यानंतर मात्र कमला यांना एकूणच कुचंबणा झाल्यासारखं वाटू लागलं.

आजूबाजूच्या लोकांच्या, नातेवाईंकांच्या चर्चेचा विषय आपण बनत आहोत हे लक्षात आल्यावर त्यांनी अहमदाबाद सोडून कायमचं दिल्लीत रहायला जायचा निर्णय घेतला. असं म्हणतात, की त्यांनी अहमदाबाद सोडू नये यासाठी विक्रमनी हरतर्‍हेनं प्रयत्न केले.

कमला चौधरी यांनाच भाचा, सुधीर काकर याने ‘A Book of Memory: Confessions and Reflections’ या पुस्तकात त्यांच्या आणि विक्रम साराभाई यांच्या प्रेमाबद्दल लिहिले आहे. त्याच्या मतानुसार, विक्रम साराभाई तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंना भेटले आणि त्यांनी आय आय एम ची शाखा अहमदाबाद येथे सुरू करण्याची गळ घातली. पंडित नेहरूंनी याला मान्यता दिल्यानंतर आय आय एम अहमदाबाद येथे आली आणि त्याच्या संचालकपदी कमला यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर विक्रम यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९७२ सालापर्यंत कमला अहमदाबाद मधेच राहिल्या. अशारीतीने एका प्रेमप्रकरणामुळे अहमदाबाद येथे आय आय एम ची स्थापना झाल्याची कथित चर्चा आहे.

 

iim ahmedabad im

 

 

विक्रम साराभाई यांच्या कन्या आणि प्रसिध्द नृत्यांगना मल्लिका साराभाई यांच्यामते मात्र या चर्चा पोकळ आहेत. ‘अशा कथांना जन्म देऊन माझ्या वडिलांनी जो दूरदृष्टीनं विचार करत आय आय एम सारख्या संस्थेचा पाया रचला त्याच्या हेतूला धक्का बसतो. कमला यांच्या सोबतचे त्यांचे प्रेमसंबंध आणि आय आय एम ची निर्मिति याचा काहीही संबंध नाही आणि तो जोडूही नये’. असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?