आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जसा देश बदलल्यावर वेष बदलतो तसं प्रत्येक धर्माची सुद्धा वेशभूषा करण्याची आपली एक व्याख्या आहे. भगव्या रंगाचं वस्त्र हे जसं हिंदू धर्माचं प्रतीक मानलं जातं, तसं बुरखा दिसला, की ती स्त्री मुस्लिम असेल हे आपल्याला कळतं.
कर्नाटकमधील उडपी या शहरात मध्यंतरी काही विद्यार्थिनींना हिजाब परिधान करून आल्याने महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. संबंधित विरोधकांनी त्याचं हे कारण सांगितलं आहे, की हिजाबमुळे असमानतेची भावना दिसून येते.
हिजाबवरून पेटलेल्या या वादाने पुढे धार्मिक तेढ निर्माण केली आणि सोशल मीडियावर एकच वादळ उठलं. या वादात बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी केलेलं एक वक्त्यव्य पुन्हा एकदा व्हायरल होतंय.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर नसिरुद्दीन शहा यांनी ‘द वायर’ला एकदा मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी इस्लाम धर्मातील काही समजुतींबद्दल आपली मतं स्पष्ट केली होती, यतिकच एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा वेधून घेत आहे.
—
- शिया मुस्लिम खरंच अन्नात थुंकून ते वाढायचे का? वाद घालण्यापुर्वी हे सत्य जाणून घ्या
- ज्या ‘हिजाब’वरून कर्नाटकमध्ये वादळ उठलंय तो नेमका असतो तरी काय?
—
काय होतं हे वक्तव्य?
‘हिजाबला माझी हरकत आहे, कारण इस्लाम धर्मात बुरख्याचा उल्लेखच नाहीये.’ असे ते म्हणाले. नसिरुद्दीन शहा यांचं म्हणणं आहे, की कुराणात ‘हिजाब’चा उल्लेख आहे, पण हा उल्लेख वेगळ्या अर्थाने आहे. आपल्या नजरेत कायम लाज असावी, विनय असावी असा त्याचा अर्थ आहे, पण लोकांनी याचे चुकीचे अर्थ लावले.
भारतातील इस्लाम हा इतर देशातील धर्मांपेक्षा वेगळा आहे. आणि देव न करो, पण अशी वेळ येऊ नये, की कोणालाच हा इस्लाम ओळखताच येणार नाही. असेही ते म्हणाले होते.
लहान मुलीने फ्रॉक घातला असेल, तर तिचे पाय दिसतात, पण तुम्ही तिचे पाय का बघता? इथे नजरेचा हिजाब असणं महत्त्वाचं आहे. नजर स्वच्छ असणं गरजेचं आहे, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
स्वतःची प्रगती करण्यासाठी हा तिढा सोडवला पाहिजे, असं ते म्हणाले होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.