Site icon InMarathi

५० इंटरव्ह्यू नंतर वयाच्या २४ व्या वर्षी १ करोड पॅकेजची नोकरी मिळवणारी तरुणी!

sampriti yadav featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘प्रयत्नांती परमेश्वर’ ही उक्ती ही माणसं खरोखरच सार्थ ठरवतात. अशीच एक तरुणी आहे जिने कधीच स्वतःला मागे खेचलं नाही. ती जिथे जिथे पोहोचली त्याच्या पुढे याहून आणखी काय मोठं आहे आणि ते आपल्याला साध्य करायचंय असाच विचार तिने कायम केला आणि यापुढेही करते आहे.

पाटण्याच्या संप्रीती यादव या मुलीने वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी थेट गुगलमध्ये जवळपास १ करोडचं वार्षिक पॅकेज मिळवलंय. पण अनेकांना थक्क करेल असं हे घवघवीत यश संपादन करण्यापूर्वी तिने सुमारे ५० वेळा वेगवगेळ्या ठिकाणी मुलाखती दिलेल्या आहेत.

 

 

तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, संप्रीतीच्या यशाचा हा चढता आलेख नेमका किती आव्हानांनी भरलेला होता हे समजून घेतलंत तर भरपूर कष्टांच्या जोरावर मोठ्या ध्येय्याचं स्वप्न पाहणं तुमच्यासाठीही अशक्य नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लहानपणापासूनच इंजिनियर होण्याचं स्वप्न तिने मनाशी बाळगलं होतं आणि १२वीत असताना आपल्याला ‘सॉफ्टवेअर इंजिनियर’ व्हायचंय हे तिने निश्चित केलं. ती नेहमीच अतिशय हुशार मुलगी होती. दिल्लीतल्या ‘इंटरनॅशनल स्कूल’मधून १२वी च्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर तिने २०१६ मध्ये ‘जेइइ मेन्स’ क्रॅक केली.

तिच्या ‘लिंक्डइन प्रोफाईल’वरील माहितीनुसार, मागच्या वर्षी मे २०२१ मध्ये तिने ‘दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी’मधून ‘कॉम्प्युटर सायन्स’ मध्ये बी. टेक. ची पदवी मिळवली आणि आता तिची लंडनमध्ये गुगल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नेमणूक झाली आहे.

पदवीधर झाल्यानंतर तिला ‘ऍडॉब’, ‘फ्लिपकार्ट’ अशा अनेक मोठमोठ्या ब्रॅण्ड्सकडून नोकरीकरता विचारणा झाली. संप्रीतीने ‘मायक्रोसॉफ्ट’ मध्ये नोकरी करायचा निर्णय घेतला. तिथे तिला वर्षाला ४४ लाखांचं पॅकेज होतं.

 

 

त्या दरम्यान, गुगलकडून प्रस्ताव आल्यानंतर तिने गुगलला आपला रिझ्युम पाठवला आणि त्यानंतर मुलाखतींच्या ९ फेऱ्या पूर्ण करून तब्ब्ल १. १० करोड रुपयांचं दमदार वार्षिक पॅकेज मिळवलं.

‘हिंदी डेली’शी बोलताना संप्रीती म्हणाली, “गुगलने वेगवेगळ्या पातळ्यांवर ९ फेऱ्यांमध्ये मुलाखती घेतल्या.

प्रत्येक फेरीतलं माझं उत्तर कंपनीला समाधानकारक वाटलं आणि त्यानंतर माझी निवड झाली.दैनिक भास्करशी बोलताना ती म्हणाली, “मला कधीच वाटलं नव्हतं की पहिल्याच प्रयत्नात मला इतकं मोठं पॅकेज मिळेल. पण आपण नक्कीच काहीतरी चांगलं साध्य करू हा आत्मविश्वास मला नेहमी होता.”

मुलाखतीच्या वेळेस संप्रीती नेहमी घाबरून जायची. पण तिच्या कुटुंबीयांनी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनी तिला नेहमीच चांगली कामगिरी करत राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. संप्रीती सांगते की तिने मोठमोठ्या कंपन्यांचा तासन् तास अभ्यास केला.

मोठ्या कंपन्यांसोबतच्या बऱ्याचश्या मुलाखती या चर्चेसारख्या असायच्या. सतत आणि पुन्हा पुन्हा सराव केल्यामुळे मी माझ्या मनातल्या भीतीवर मात करून आत्मविश्वासाने मुलाखती देऊ शकले असं ती सांगते.

 

 

संप्रीती म्हणते, “या पॅकेजच्याही पलीकडे जाऊन गुगल लंडनमध्ये मला प्लेसमेंट मिळणं ही गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. ही नोकरी मिळाल्यानंतर सगळ्यात आधी माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आली. प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनियरचं बड्या कंपनीत नोकरी मिळवण्याचं स्वप्न असतं. गुगलमध्ये नोकरी मिळणं आणि त्यात लंडनमध्ये ती मिळणं हे माझ्यासाठी फारच खास होतं. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला.”

संप्रीतीच्या नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी तिच्यावर शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव करेपर्यंत आपण मिळवलेलं यश किती मोठं आहे याची जाणीव तिला झाली नव्हती. आपल्या अनुभवाकडे पाहताना हे यश मिळवणं आपल्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं असं ती सांगते.

एक गांगरून मुलाखत देणारी मुलगी ते आत्मविश्वासाने हवं ते साध्य करणारी मुलगी हा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला होता. तिच्या वयाच्या कुठल्याही व्यक्तीप्रमाणेच तीदेखील डगमगायची, तिलाही पिअर प्रेशर जाणवायचं, तिचंही लक्ष अनेकदा विचलित व्हायचं.

आपल्या उचित मार्गावरून न हटता सतत पुढे जात राहायची प्रेरणा तिला तिच्या आई वडिलांकडून मिळाली. तिचे वडील रामशंकर यादव हे ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ इथे नोकरी करतात तर तिची आई शशी प्रभा या बिहार मध्ये ‘योजना आणि विकास विभागात असिस्टंट डायरेक्टर आहेत.

 

 

संप्रीती म्हणते, “मोठं होत असताना मी माझ्या पालकांना रोज प्रचंड मेहनत घेताना पाहीलं आहे. माझ्या आईने स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलं आहे. माझ्या पालकांचे इतके कष्ट बघून मी अभ्यास आणि इतर अभ्यासेत्तर उपक्रमांमध्ये स्वतःला पूर्णतः झोकून देऊन माझी सर्वोत्तम कामगिरी द्यायचं ठरवलं. माझ्या पालकांकडून आणि समवयस्कांकडून मला प्रेरणा मिळते. आपण ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात येतो त्या प्रत्येकाकडूनच आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं असं मला वाटतं.”

तिच्या पिढीच्या इतरांप्रमाणेच तिलादेखील सोशल मीडियावर असणं आवडतं. पुढेमागे तिला कन्टेन्ट क्रिएटर व्हायलाही आवडेल. एक मर्यादित वेळ सोशल मीडियावर घालवणं चांगलं आहे मात्र त्याचं व्यसन होऊ देता कामा नये असं मत ती व्यक्त करते.

तीदेखील आधी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आली. आता ती लिंक्डइन वर सर्वाधित ऍक्टिव्ह असते. संप्रीतीला नाटकांमध्ये आणि संगीतातही रस आहे. विद्यार्थीदशेत असताना तिने वेगवेगळ्या वादविवाद स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

मुलाखतींमध्ये अपयश येणं हेसुद्धा महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे आपल्याला आणखी मेहनत घेण्यासाठी प्रोत्साहन मिळतं.

 

 

जर तुम्ही सातत्याने कसून मेहनत करत असाल तर तुम्हाला तुमच्या ध्येय्याविषयी चिंता करण्याची गरज नाही कारण तुम्ही ते नक्की साध्य कराल असा आशावाद ती अनेकांच्या मनात पेरते.

वयाच्या अवघ्या २४व्या वर्षीच करियरमध्ये इतकी मोठी झेप घेणाऱ्या संप्रीतीने तिच्या वयाच्या इतरांनी जेव्हा २-४ मुलाखतींच्या वर मुलाखती दिलेल्या नसतात तेव्हा सुमारे ५० मुलाखती दिलेल्या होत्या.

यावरून एक मोठं ध्येय्य गाठणं हे नक्कीच येरागबाळ्याचं काम नाही हे आपल्या प्रत्येकाला पटेल आणि आपण आपल्या ध्येय्याकडे किती गांभीर्याने पाहतोय याचाही आपण विचार करू.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version