Site icon InMarathi

लिओनार्डोने ‘ऑस्कर पुरस्कार’ परत दिला होता, कारण वाचून तुम्हीही त्याची प्रशंसा कराल

Leonardo DiCaprio

variety

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

ऑस्कर म्हंटल की सगळ्यांच्याच भुवया उंचवतात, विशेष करून तर आपण भारतीय तर ऑस्करच्या बाबतीत वेडे आहोत. आपण तर जेव्हा जेव्हा आपला एक सिनेमा ऑस्कर ला पाठवतो तेव्हा तेव्हा त्याला पुरस्कार मिळावा अशी सगळ्या भारतीयांची इच्छा असते!

इतकं आपली लोकं या पुरस्कार सोहळ्याला महत्वाचे मानतात!

अर्थात त्यात काही गैर नाही म्हणा, कारण या पुरस्कार सोहळ्यात सगळ्या जगभरातून विविध देशांमधून आणि त्यांच्या भाषेचे सिनेमे येतात त्यामुळेच इथे होणारी स्पर्धा ही आणखीन चुरशीची होते असा बऱ्याच जणांचा समज आहे!

 

oscars

 

या स्पर्धेमधून काही चित्रपट बाहेर पडतात तर काहींना बक्षीस मिळतात, स्लमडॉग मिलेनियर सिनेमासाठी उत्तम संगीतकाराचा पुरस्कार आपल्या ए.आर. रहमान या भारतीय संगीतकाराला मिळाला होता ही कोणताच भारतीय विसरू शकणार नाही!

भारतातून सुद्धा आत्तापर्यंत बरेच सिनेमे पाठवले गेले पण त्यापैकी ‘मदर इंडिया’ ‘सलाम बॉम्बे’ ‘लगान’ या तीन भारतीय सिनेमांना आत्तापर्यंत नॉमिनेशन म्हणजेच नमांकानं मिळाली!

 

india tv

 

या २०२० सालचा उत्तम अभिनेत्याचा पुरस्कार वॉकीन फिनिक्स या अभिनेत्याला २०१९ साली आलेल्या बहुचर्चित ‘जोकर’ या सिनेमासाठी मिळाला. 

तर सर्वोत्तम सिनेमा आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार ‘पॅरासाईट’ या कोरियन सिनेमाला मिळाला!

 

thrillist

 

लिओनार्डोला कोण नाही ओळखत? टायटानिक मधल्या आपल्या अभिनयाने त्याने जे प्रेक्षकांवर गारुड केले ते कायमचेच, पण अश्या या हरहुन्नरी अभिनेत्याला इंडस्ट्री मध्ये कित्येक बेस्ट परफॉर्मन्स देऊनही ऑस्कर काही मिळाला नव्हता.

आपल्या भारतीयांना लिओनार्डोला फक्त लोकं टायटॅनिक चा हीरो म्हणूनच ओळखतात पण त्याने शटर आयलंड, एव्हिएटर, ब्लड डायमंड, द डिपारटेड अशा कित्येक फिल्म्स मधून त्याने लोकांच्या मनात घर केलं आहे!

ऑस्कर मिळवणे म्हणजे प्रत्येक अभिनेत्याचे एकमेव स्वप्न.

२०१६ साली ऑस्कर अवॉर्डसची घोषणा झाली आणि रेव्हेनन्ट चित्रपटासाठी अखेर सर्वोत्तम अभिनेता म्हणून लिओनार्डोला ऑस्कर मिळालाच.

जगभरातील त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी हा क्षण म्हणजे अविस्मरणीय सोहळा ठरला होता.

तुम्ही देखील लिओनार्डोचे भयंकर मोठे फॅन असला आणि लिओनार्डोला ऑस्कर मिळाल्यावर तुम्हाला देखील आभाळ ठेंगणे झाले असेल पण आता आम्ही जी बातमी सांगू ती ऐकून कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण “लिओनार्डोने त्याचं ऑस्कर परत केलं.”

 

variety

 

थांबा, लगेच हवालदिल होऊन गैरसमज करून घेऊ नका. संपूर्ण प्रकरण सांगण्यापूर्वी आणि तुमचा गोंधळ उडू नये म्हणून एक गोष्ट स्पष्ट करतो की तुम्हाला वाटतंय तो ऑस्कर त्याने परत केलेला नाही आहे,

म्हणजे गेल्या वर्षी त्याला मिळालेला ऑस्कर त्याने परत केलेला नसून त्याला भेट म्हणून मिळालेला एक ऑस्कर त्याने परत केला होता.

पण एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की, ऑस्कर परत करण्यामागचं कारण जाणून घेतल्यावर तुमचा त्याच्याविषयीचा आदर अधिकच वाढेल.

त्याने तो ऑस्कर परत केलाय जो प्रसिद्ध कलाकार मार्लेन ब्रँडन यांना मिळाला होता आणि तो ऑस्कर लिओनार्डोला भेट म्हणून दिला गेला होता.

“On the Waterfront” या चित्रपटामधील जबरदस्त परफॉर्मन्ससाठी मार्लेन ब्रँडन यांना हा ऑस्कर मिळाला होता आणि हीच ऑस्करची बाहुली Red Granite Pictures या प्रोडक्शन कंपनीने लिओनार्डोला गिफ्ट म्हणून दिली होती,

 

pinterest

 

कारण दरम्यानच्या काळात त्यांची निर्मिती असलेला “The Wolf Of Wall Street” या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले होते !

आणि या प्रोडक्शन कंपनीला चित्रपटासाठी जबरदस्त डेडीकेशन दाखवल्याबद्दल लिओनार्डोला काहीतरी विशेष गिफ्ट द्यायचे होते आणि म्हणून त्यांनी मार्लेन ब्रँडनची ऑस्कर बाहुली लिओनार्डोला भेट म्हणून दिली.

यासोबतच त्यांनी लिओनार्डोला तब्बल ३० लाख रुपये किमतीची प्रसिद्ध चित्रकार पिकासो यांच ओरीजनल पेंटिंग आणि ९० लाख रुपयांचे बॅस्क्वेट कोलाज देखील दिले होते.

 

vanity fair

 

आता जाणून घेऊया हा ऑस्कर लिओनार्डोने का परत केलाय?

ज्या Red Granite Pictures कंपनीने हा ऑस्कर लिओनार्डोला भेट दिला होता, ते एका स्कॅंडल अडकले असून मलेशिया मध्ये खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला!

कंपनीवर हा आरोप झाल्यावर आणि त्या विरोधात पुरावे सापडल्यावर लिओनार्डोने कंपनीसोबत असलेले सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला.

आणि त्यांनी दिलेला ऑस्कर आणि इतर भेटी परत करून त्याने कंपनी आणि आपल्या नात्याला पूर्व विराम दिला आहे.

फसवेगिरी करणाऱ्या कोणत्याही कंपनीसोबत मला स्वत:ला लिंक करायचे नाही असे मत लिओनार्डोने मांडले आहे.

 

parade

 

आपल्या सच्चेपणासाठी हॉलीवूड मध्ये प्रसिद्ध असलेल्या लिओनार्डोने उचललेले हे पाउल त्याच्या असंख्य चाहत्यांच्या मनात त्याची प्रतिमा अधिक उंचावणारेच आहे नाही का?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version