आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
संजय लीला भन्साली यांचा प्रत्येक सिनेमा विशेष असतो. वेगळा असतो. प्रत्येकाला आवडेलच असा नाही, पण सिनेमा बघतांना एक नेहमीच लक्ष्य येतं की, पटकथाकार, दिगदर्शकाने सिनेमा तयार करतांना, पात्र उभं करतांना प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा त्यांचा आगामी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होतोय. अजय देवगण आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत असलेल्या या सिनेमात अजय देवगणने अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला हे पात्र साकारलं आहे ज्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.
आपल्या गॉगल काढण्याच्या विशिष्ठ पद्धतीसाठी लोकांना नेहमीच आवडत आलेल्या अजय देवगणने या रोलमध्ये सुद्धा करीम लाला हे पात्र पडद्यावर जिवंत केलं असणार यात शंकाच नाहीये. सिनेमाचं शीर्षक हे जरी ‘गंगुबाई काठियावाडी’ असलं तरी डॉन करीम लाला कोण होता ? त्याचं गंगुबाई सोबत काय कनेक्शन काय होतं ? आणि मुंबईत त्यांची का दहशत होती ? हे प्रश्न सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहेत.
गंगुबाई यांचं पूर्ण नाव हरजीवनदास काठियावाडी हे होतं. अभिनेत्री होण्याचं स्वप्न लहानपणीच उराशी बाळगलेल्या हरजीवनदास या आपल्या वडिलांच्या अकाउंटंट रमाणिक लाल यांच्या प्रेमात पडते, लग्न करते आणि मुंबईला येते. रमाणिक लाल हा मनुष्य तिच्या स्वप्नांचा काहीही विचार न करता तिला कमी वयातच पैसे कमावण्यासाठी ‘कमाठीपुरा’ या मुंबई जवळील वैश्या व्यवसाय चालणाऱ्या भागात विकून टाकतो. तिथे ‘गंगुबाई’ हे नाव पडलेल्या हरजीवनदासची ओळख मुंबईच्या त्यावेळच्या डॉन करीम लाला सोबत होते.
समाजातील एका वर्गासाठी भीतीदायक असलेला हा डॉन याचकांना मदत केण्यास नेहमीच तत्पर असतो. ‘सुल्तान मिर्झा’ ज्याप्रमाणे अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी देव होता, तसाच करीम लाला सुद्धा गंगुबाईवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तिची मदत करतो. करीम लाला या डॉनला गंगुबाई भाऊ मानते आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेते असं या सिनेमाचं कथानक असल्याचं बोललं जात आहे.
‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आणि करीम लाला या डॉन बद्दल बरीच माहिती तो काळ जगलेले, त्या काळातील घटनांचा अभ्यास केलेले लोक सध्या सांगत आहेत. मुंबईचा पहिला डॉन म्हणून आजवर हाजी मसंद याचं नाव घेतलं जायचं. सध्या अशी माहिती समोर येत आहे की, करीम लाला हा त्याही आधी मुंबईत होऊन गेलेला डॉन आहे. करीम लाला याने एकदा भर चौकात दाऊद इब्राहिमला चोप दिला होता, म्हणून तो जास्त शक्तीशाली होता असं मानलं जायचं.
एकीकडे करीम लाला हा अंडरवर्ल्ड मध्ये आपली शक्ती वाढवता होता आणि दुसरीकडे गरजू लोकांचा तो ‘मसीहा’ म्हणून नावारूपास येत होता. समाजास घातक असलेल्या प्रवृत्तींसाठी कर्दनकाळ असलेला करीम लाला हा कित्येक अवैध कारवायांसाठी नेहमीच पोलिसांसाठी एक डोकेदुखी होता.
आपण कमावलेली अतिरिक्त कमाई ही गरिबांमध्ये, गरजू व्यक्तींमध्ये वाटून टाकायची अशी करीम लालाच्या कामाची पद्धत होती.
–
- मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा…
- हाती पिस्तूल न घेताही मुंबईवर दहशत माजवणारा पहिला डॉन
–
करीम लाला याचं मूळ नाव अब्दुल करीम शेर खान असं होतं. त्याचा जन्म अफगाणिस्तान मधील ‘कुमार प्रोव्हिन्स’ येथे झाला होता. दारूची अफरातफरी करणे, जुगार खेळणे आणि समाजातील उच्चभ्रू लोकांकडून खंडणी गोळा करणे असे त्याचे उद्योग १९६० ते १९८० चं दशक सुरू होईपर्यंत मुंबईत सर्रास चालायचे.
‘पठाण गँग’चा प्रमुख या नावाने तो कुप्रसिद्ध होता. करीम लाला हा एकदा इंदिरा गांधी यांना भेटल्याचा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे. या फोटोमध्ये त्याच्या सोबत पद्मभूषण पुरस्कार विजेते संगीतकार हृदयनाथ चट्टोपाध्याय हे सुद्धाआहेत. ही भेट कधी आणि का झाली होती ? हे मात्र आजतागायत एक गूढ आहे.
प्रेक्षकांना करीम लाला यांच्याबद्दल असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का ? आणि १९६० च्या दशकात घडलेल्या या सर्व घटना दिगदर्शक, नेपथ्यकार आणि कलाकारांचा अभिनय यामुळे कितपत खऱ्या वाटतील ? हे पहाण्यासाठी ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाची सध्या सिनेरसिकांना उत्सुकता आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.