Site icon InMarathi

लव्ह जिहादचा मुद्दा घेत UP निवडणूक, हिंदू-मुस्लिम भेद हाच भाजपचा गेम!

love jihad im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ हा मुद्दा काही नवा नाही. बॉलिवूडच्या सिनेमांपासून ते राजकारणापर्यंत अनेक क्षेत्रात या मुद्द्याचा पुरेपुर वापर करून घेतला जातो. राजकीय पक्षांनी तर या धार्मिक वादात अनेकदा आपली पोळी भाजून घेतली आहे.

याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीला अभिनेता शाहरुख खानने मुस्लिम पद्धतीने केलेल्या नमाज पठणावरही अनेकांनाही तोंडसुख घेतले.

 

 

याच मुद्द्याला हाताशी धर आता भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेश निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकण्यासाठी इर्षेला पेटलेल्या भाजपने अखेर हिंदू मुस्लिम मुद्द्याचा आधार घेतला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

नेमकं प्रकरण काय?

भाजपने उत्तर प्रदेश निवडणूकीसाठी लोकसंकल्प पत्र प्रसिद्ध करण्यात आले. भाजप नेते अमित शहा यांनी याबाबतची घोषणा केली. शहांच्या उपस्थितीत या घोषणा पत्राचे अनावरण करण्यात आले.

दर निवडणूकीप्रमाणे यातही विकासाच्या मुद्द्यांचा उल्लेख असला तरी यातील एका मुद्द्याकडे मात्र सर्वांच्याच नजरा वळल्या आहेत.

 

भाजपने लव्ह जिहादच्या मुद्द्याला धरून यात विशेष घोषणा केली आहे, उत्तर प्रदेशच्या निवडणूकीनंतर भाजप पुन्हा सत्तेत आल्यास लव्ह जिहाद प्रकरणात सहभागी असलेल्या दहा वर्ष सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड सुनावण्यात येईल असे आश्वासन भाजपने दिले आहे.

या आश्वासनामुळे हिंदू धर्मियांची मतं आपल्या खिशात टाकण्याचा पुन्हा नवा प्रयत्न भाजपने केल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

लव्ह जिहाद या विषयाला फारसे महत्व दिले जात नसले तरी या प्रकरणाकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. या प्रकरणातील दोषींना वेळीच योग्य शिक्षा झाली तर भविष्यातील घटनांना आळा बसेल, तसेच हिंदू घरात सुरक्षितता निर्माण होईल, असा विचार मांडत भाजपने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.

 

 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला दोन दिवस शिल्लक असताना भाजपने जाहीरनामा प्रकाशित केला आहे. गुरुवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ९२ टक्के गोष्टींची पूर्तता करण्यात आल्याचा दावा शहा यांनी केला.

लव्ह जिहादच्या मुद्द्यासह भाजपने इतर विकासकामांचाही पाढा वाचला आहे. पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांसाठी मोफत वीज, उसाची देयके कारखान्यांनी १४ दिवसांत केली नाहीत तर व्याजासह रक्कम देणे बंधनकारक, प्रत्येक जिल्ह्यात सरकारी रुग्णालय, मुलींना राणी लक्ष्मीबाई योजनेंतर्गत मुलींना मोफत दुचाकी, दोन कोटी टॅबलेट व स्मार्टफोन अशी आश्वासने देण्यात आल्याने भाजपच्या पारड्यात यंदा भरघोस मतं पडणार का? हा प्रश्न आहे.

 

 

राजकीय पक्षांनी विकास कामांचे गाजर दाखवणे हे मतदारांना नवे नाही. निवडणूक आल्यानंतर भविष्यातील तरतुदींची घोषणाबाजी केली जाते. मात्र यंदा भाजपने थेट लव्ह जिहादसारख्या ज्वलंत मुद्द्याचा घेतलेला आधार हा हिंदू मतदारांना आकर्षित करणार का? त्याचा फायदा भाजपला होणार की हा वार त्यांच्यावरच पलटणार? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी निकालाची प्रतिक्षा करावी लागेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version