' गे नवरदेव, लेस्बियन नवराई : लवेंडर मॅरेज ही संकल्पना आहे तरी काय? – InMarathi

गे नवरदेव, लेस्बियन नवराई : लवेंडर मॅरेज ही संकल्पना आहे तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न म्हणजे आयुष्यातील एक अविभाज्य भाग. कुणासाठी मिरवण्याची संधी, कुणासाठी सरळसोट, धोपटमार्गावरील आयुष्यातील एक कर्तव्य, कुणासाठी एक सौदा, जो आयुष्यात करावाच लागतो, तर कुणासाठी ज्या मार्गाकडे ढुंकूनही बघायचं नाही, असा एक नकोसा प्रकारही!

मात्र लग्न या विषयाशिवाय सहसा कुणाचंही आयुष्य पूर्ण होत नाही. आता हे लग्न म्हटलं, की लग्नाचे दोन प्रकार सुद्धा आठवतात. हे प्रकार म्हणजे अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्या मात्र असा आणखी एक लग्नप्रकर चांगलाच चर्चेत आहे. म्हणजे, तसं पाहायला गेलं तर प्रकार नवा नाहीये, पण नव्याने चर्चेत आहे. ‘बधाई दो’ या सिनेमाचा ट्रेलर पाहिला असेल, तर तुम्ही या लग्नप्रकाराबद्दल नक्कीच ऐकलं असेल.

 

badhaai ho IM

 

मोठ्या चर्चेत असलेला हा लग्नप्रकार म्हणजे, लव्हेंडर मॅरेज. पण हे लव्हेंडर मॅरेज म्हणजे नेमकं काय? ते कधी सुरु झालं? हे नाव त्याला का पडलं? याबद्दल माहित आहे का? चला आज जाणून घेऊयात या लव्हेंडर मॅरेजबद्दल.

काय असतं लव्हेंडर मॅरेज?

लव्हेंडर मॅरेज हे वरवर दिसताना एक सामान्य लग्न वाटतं. एक पुरुष आणि एक स्त्री यात एकमेकांशी लग्नगाठ बांधतात.

मात्र या दोघांपैकी एक किंवा काहीवेळा दोघेही समलैंगिक असतात. दोघांमधील किमान एक व्यक्ती समलैंगिक असेल आणि ते लग्न पार पडलं असेल, तर त्या लग्नाला लव्हेंडर मॅरेज असं म्हटलं जातं.

 

lavendar marriage IM

 

आता तुम्ही म्हणाल, यात नवल ते काय? पण या लग्नामधील मेख अशी असते, की या दोघांनाही समलैंगिक असणाऱ्या व्यक्तीबद्दल माहित असतं. आणि हे लग्न परस्पर संमतीने आणि सहमतीने झालेलं असतं.

आहे की नाही भलतंच. आपण जिच्याशी लग्न करत आहोत, त्या व्यक्तीचं आपल्यावर कधीही प्रेम नसेल, आपल्यात कधीही पती-पत्नीचं भावनिक नातं निर्माण होऊ शकणार नाही, हे माहित असूनही लग्न करणं ही सोपी गोष्ट म्हणता येणार नाही.

लग्न करून एका घरात राहत असली, तरी अशी मंडळी अनेकदा वेगवेगळ्या खोलीत राहत असतात. आहे की नाही अगदी भलतंच लग्न?

लग्नाला रंगाचं नाव का बरं?

हा लग्न प्रकार जसा काहीसा वेगळा ठरतो, तसंच त्याचं नाव आणि त्या नावामागची कहाणीसुद्धा काहीशी वेगळी आहे. तुम्हाला काय वाटतं, या लग्न प्रकाराला लव्हेंडर असं नाव का पडलं असेल? याचीही कहाणी थोडी गंमतीशीर आहे. समलैंगिकता हेच या नावामागचं कारण आहे.

असं म्हणतात की, इसवीसन पूर्व ६०० च्या काळात सैफो नावाची एक कवयित्री होऊन गेली. ती समलैंगिक प्रेमात आकंठ बुडालेली होती. आपल्या प्रेयसीसाठी कविता करताना, तिला लव्हेंडर रंगांच्या फुलांचा मुगुट घालण्यात यावा अशी कवी कल्पना तिने मांडली. यामुळेच लव्हेंडर हा समलैंगिकतेचा रंग ठरला.

 

lavendar flowers IM

 

सैफो राहत असलेल्या लेसबोस आयलंड वरूनच या समलैगिकतेला लेस्बियन असा शब्द प्रचलित झाला, अशीसुद्धा आख्यायिका सांगितली जाते. आता यात नेमकं सत्य कुठलं आणि नुसतीच कवी कल्पना कुठली, हे कुणालाही नक्की ठाऊक नाही.

हॉलिवूडमधून आलेली संकल्पना

भारतीय समाजानेसुद्धा आज समलैंगिक भावनांना काही प्रमाणात मान्यता दिलेली पाहायला मिळते. मात्र एक काळ असा होता, की पुढारलेल्या पाश्चिमात्त्य देशांमध्ये सुद्धा या समलैंगिक व्यक्तींकडे चुकीच्या नजरेने पाहिलं जात असे. यातून मोठमोठी कलाकार मंडळी आणि हॉलीवूडकर सुटले सुद्धा सुटत नसत.

एखाद्या व्यक्तीने आपली समलैगिकता उघडपणे मान्य केली, तर त्याला मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असे. नाव, पैसा, प्रसिद्धी, काम, टॅलेंट अशा गोष्टी बाजूला ठेऊन त्या व्यक्तीच्या गे किंवा लेस्बियन असण्याबद्दलच मीडियामध्ये चर्चा केली जायची.

 

lgbtq IM

 

परिणामी सगळी इभ्रत धुळीला मिळत असे. यमातून वाचण्यासाठी लढवलेली शक्कल, शोधून काढलेली पळवाट म्हणजेच हे लव्हेंडर मॅरेज!

बार्बरा स्टेनवीक, जेनेट गेनर अशी मोठमोठी नावं सुद्धा या लव्हेंडर मॅरेज म्हणजेच ‘मॅरेज ऑफ कन्विनियन्स’चा एक भाग होती.

हळू हळू सामान्यांवरही झाला परिणाम

चित्रपट, चित्रपटांतील कलाकार आणि त्यांची जीवनशैली यांचं अनुसरण करण्याची प्रथा काही फक्त आपल्या भारतातच आहे, असं नाही. हॉलिवूडकरांचं अनुसरण करू पाहणारा बराच मोठा चाहतावर्ग अगदी सहज पाहायला मिळतो. त्यामुळेच लव्हेंडर मॅरेजचं हे भूत हळू हळू सामन्यांच्या मानगुटीवर सुद्धा स्वार झालं.

घरचे लग्नासाठी मागे लागले, की मग एकमेकांच्यात ठरवून, केवळ पालकांना गप्पा करायचं म्हणून बाल सवंगडी लग्न करायचं ठरवतात, आणि मग मित्र-मैत्रीण म्हणून राहू असा विचार करतात, तसाच काहीसा हा प्रकार आहे असं म्हणायला हवं.

परदेशात तर, गे मुलांनी लेस्बियन मुली शोधणं आणि त्या दोघांनी परस्पर करार असणारं लग्न करणं या गोष्टी अगदी सर्रास घडतात. पाश्चिमात्य देशांमध्ये असे गटही तयार झाले आहेत, ज्यांच्यामार्फत अशा व्यक्ती शोधून काढणं सहजशक्य आहे.

 

lavendar marriage 2 IM

 

आपल्या समलैंगिकतेला पालकक परवानगी देणार नाहीत, हे ठाऊक असणारी होमोसेक्शुअल जोडपी एकत्र येतात, नवरदेव गे असतो, नवरी लेस्बियन असते आणि त्यांचं मोठ्या थाटामाटात लग्न होतं.

लव्हेंडर मॅरेज योग्य की अयोग्य?

एका बाजूने पाहायला गेलं, तर लव्हेंडर मॅरेज करणं हा काही योग्य पर्याय नाही असं म्हणता येईल. जी व्यक्ती आपल्याला आवडू शकत नाही, जिच्यावर आपण कधीही प्रेम करू शकत नाही, अशा व्यक्तीशी लग्न करून आयुष्यभरासाठी एकत्र राहणं हा काही योग्य पर्याय ठरू शकत नाही.

मात्र, अशा व्यक्तींची समलैंगिकता मान्य न करता पालक त्यांची लग्नं लावून देतात. मग त्यानंतर केलेला संसार हीदेखील एक तडजोडच असते. अनेकदा असा लग्नांमध्ये लेस्बियन असणाऱ्या स्त्रीला बलात्काराचा सामना करावा लागू शकतो किंवा मग गे पुरुषाला सुद्धा केवळ मन मारून जगावं लागू शकतं.

समलैंगिकता हा एक मानसिक आजार असून, लग्नानंतर तो बरा होईल असा समज करून घेऊन आपल्या मुलांची लग्नं पालक लावून देतात. अशा मुलामुलींची आयुष्य उध्वस्त होतात म्हटलं तरी ते अगदीच चुकीचं ठरत नाही.

 

shubh mangal zyada savdhan IM

 

असं काहीतरी घडण्यापेक्षा, दोन भिन्न लिंगांच्या समलैंगिक व्यक्तींनी परस्पर संमती आणि समजुतीने लग्न करणं पूर्णतः अयोग्यही म्हणता येणार नाही.

त्यामुळे लव्हेंडर मॅरेज नक्की योग्य की अयोग्य हा त्या-त्या व्यक्तीच्या विचारसरणीचा भाग ठरतो. याविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं, ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?