Site icon InMarathi

मुस्लिम धर्मीय व्यक्ती इतर कोणासाठी प्रार्थना करू शकते का? वाचा यामागचं खरं उत्तर

shahrukh khan featured 2 IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गानसरस्वती लता मंगेशकर ६ फेब्रुवारी रोजी अनंतात विलिन झाल्या. त्यांच्या मृत्युच्या बातमीने देशात दुःखाची लाट पसरली. अवघा महाराष्ट्र तर त्यांच्या लाडक्या दीदींच्या आवाजाच्या आठवणींनी हळवा झाला. दादर येथील शिवाजी पार्क मध्ये त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक बड्या आसामी तेथे उपस्थित होत्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतरत्न लता दीदींच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार हे शासकीय इतमामत होत असल्याने अनेक टीव्ही चॅनेलवर त्याचे लाईव्ह प्रक्षेपण चालू होते. तेथे उपस्थित लोकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हालचालींवर लोक बारीक लक्ष ठेवून होते. काही लोकांच्या वागण्याचे कौतुक झाले तर काहींच्या वागण्याचा निषेध करण्यात आला.

 

 

अलीकडच्या काळात शाहरुख आणि वाद हे समीकरण वाढत असताना श्रद्धांजली वाहण्यासाठी केलेल्या कृतीचा देखील काही लोकांनी निषेध केला आहे. शाहरुख आपल्या मॅनेजर पुजा ददलानी सोबत आला होता. त्याने लतादीदींच्या पार्थिवा समोर पुष्पगुच्छ ठेवलं, आपल्या धर्मातील मान्यतेप्रमाणे तिथे उभं राहून त्याने प्रार्थना केली. त्यानंतर मास्क खाली करून फुंकर घातली आणि तो गेला.

 

काही लोकांना मात्र ही कृती योग्य वाटली नाही. तो थुंकला अशी वावडी उठवून ट्विटरवर त्या विरोधात जोरदार मोहीम करण्यात आली. त्यावर इस्लामचा अभ्यास केलेल्या लोकांनी त्याच्या हया कृती मागील कारण स्पष्ट करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. एखाद्या व्यक्तीसाठी दुवा केल्यानंतर ती कबूल ह्यावी ह्यासाठी फुंकर मारण्याची प्रथा आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, लेखिका तस्लिमा नसरीन ह्यांनी शाहरुखची बाजू घेऊन ह्या कृती मागील त्याचा नेक विचार मांडला. आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रत्येक जण आपआपल्या धार्मिक आचरणानुसार प्रार्थना करतात. मात्र मुस्लिम धर्मीय व्यक्ती इतरांसाठी प्रार्थना करू शकतात का? काय सांगते इस्लाम ? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

 

 

इस्लाम मध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व मानवांच्या सुखी जीवनाचा विचार करणे योग्य आहे. त्यामुळेच मुस्लिम धर्मीय व्यक्तींना गैर-मुस्लिमांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी दुआ करण्याची परवानगी आहे. मात्र गैर-मुस्लिम व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी माफीची दुआ करणे निषिद्ध आहे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्यास सद्गती लाभून शांती मिळावी ह्यासाठी दुवा करण्याची अनुमती आहे. यामध्ये काहीही चुकीचे नाही असे इस्लाम म्हणते. परंतु व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यासाठी माफी मागणे हे मात्र कुराणामध्ये ‘हराम’ म्हंटले आहे.

 

 

आज भारतासारख्या विविध जाती आणि पंथाच्या प्रदेशात अनेक चालीरीती रूढी परंपरा अस्तित्वात आहेत. त्यामुळे आपण कुठल्या एका जातीजमातील टार्गेट न करता त्यामागे नक्की काय तथ्य तपासली पाहिजेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version