Site icon InMarathi

पाकड्यांना खुश करणाऱ्या हुंडाईला भारतीयांसाठी माफीनामा द्यावा लागला…

hyundai im final

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ब्रँड अशी गोष्ट आहे जी बनवण्यासाठी लाखो लोक जीव तोडून काम करत असतात. आज मार्केटमध्ये टिकून राहायचे असेल इतर स्पर्धकांपेक्षा आपण ग्राहकांना काय वेगळे देऊ शकतो यासाठी सगळेचजण वेगवेगळी शक्कल लढवत असतात. अमेरिकेमध्ये ऑडी आणि मर्सिडीझ या कंपन्यांचे कोल्ड वॉर जगजाहीर आहे.

 

 

आज जगभरात आपला ब्रँड जर नावारूपाला आणायचा असेल तर कंपन्या त्यासाठी भरपूर मेहनत घेतात, प्रत्येक देशाच्या संस्कृतीनुसार परंपरेनुसार आपले उत्पादन तिकडे खपले गेले पाहिजे याचा विचार करतात. अगदी पॅकेजिंग पासून ते ब्रॅण्डच्या रंगापर्यंत या सगळ्याचीच विदेश काळजी घेतली पाहिजे. मात्र कधीतरी लोकांच्या भावनेला हात घालता घालता त्याच भावना दुखावल्या जाऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्या दोन ब्रँड आपल्या उत्पादनापेक्षा आपण केलेल्या कृतीमुळे जास्त चर्चेत आले आहेत. त्यातला एका म्हणजे चिकन प्रेमींचा केएफसी आणि दुसरा म्हणजे कार्स प्रेमींचा हुंडाई, या दोन्ही ब्रँड सध्या अनेकांच्या टीकेचे लक्ष बनले आहेत, नेमकं काय प्रकरण जाणून घेऊयात…

 

 

नेमकं काय आहे प्रकरण?

नुकतंच आपण देशाचा प्रजासत्ताकदिन साजरा केला, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी आपल्या देशातील दोन महत्वाचे दिवस, या दोन्ही दिवसाच्या एखाद्या सणाला जशा शुभेच्छा देतो तसेच या दोन्ही दिवशी आपण एकमेकांना शुभेच्छा देत असतो.

याच पद्धतीने ५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील हुंडाई कंपनीच्या युनिटने आझाद काश्मीर संदर्भात एक पोस्ट टाकली ज्यावरून भारतात प्रचंड गदारोळ माजला, ट्विटवर #boycuthyundai असे ट्रेंड फिरू लागले. केएफसीने काश्मीर मधली जनतेच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न करणारी एक पोस्ट शेअर केली, ज्यावरून केएफसी विरोधात ट्रेंड फिरू लागले आहेत.

 

 

ज्या पोस्टवरून इतका गदारोळ माजला त्यामागे कारण हे होते की प्रत्येक वर्षीच्या  फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये आझाद काश्मीर हा दिवस साजरा केला जातो. काश्मीरमधील फुटीरतावादी चळवळींना हा एक प्रकारचा पाठिंबा देणारा प्रकार आहे. काश्मीर फुटीरतावादी गटाची सहानभूती मिळवून त्यांना भारतविरोधी भडकावणे हा प्रकार मोठ्या प्रमाणावर होतो.

 

 

आता या वादात असे दिग्गज ब्रँड कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करत केवळ आपली वस्तू खपावी, लोकांच्या भावनेला हात घालून हळूच आपली वस्तू लोकंच्या मनात भरवावी या उद्देशाने या दोन्ही ब्रँडनी शक्कल लढवली मात्र तीच त्यांच्या अंगाशी आली आहे.

 

 

पाकिस्तान हुंडाईने केलेल्या पोस्टवरून भारतात वादंग निर्माण होताच लगोलग त्यांनी ही पोस्ट डिलीट करून टाकली, आणि आपला माफीनामा सुद्धा जाहीर केला, कारण आज जगभरात हुंडाई कंपनीला प्रचंड मागणी आहे त्यात भारत हे सर्वात मोठे मार्केट आहे. आज लोक मारुती सुझुकी नंतर सर्वात पहिला विचार या कंपनीचा करतात.

 

 

हुंडाई कोरियन कंपनी असून तिची एक उपकंपनी किया सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर प्रचलित झाली आहे. केएफसी या अमेरिकन कंपनीला बहुदा भारत आणि पाकिस्तान वादाचा विसर पडला असावा, म्हणून अशा संधर्भातील वादग्रस्त पोस्ट त्यांनी टाकली असावी.

हुंडाई, केएफसीसारखे दिग्गज ब्रँड आज जगभरात लोकप्रिय आहेत, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर नाव आहे तेच ब्रँड आपली इमेज जपताना त्यांना भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितींचा विसर पडावा ही त्यांच्यासाठीची हानिकारक गोष्ट आहे.

 

भारतात ब्रँड संकल्पनेला जरी उशिरा सुरवात झाली असली तरी भारतीय ब्रॅण्डची आज आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर नाव झाले आहे. परदेशी ब्रँड आपल्याकडे नव्वदच्या दशकांनंतर येऊ लागले तसेच आपले अस्सल भारतीय ब्रँड देखील त्यांना टक्कर देऊ लागले. त्यात मोदींनि दिलेल्या आत्मनिर्भरतेचे नारे देशात चांगलेच घुमू लागले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version