आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सध्या लता मंगेशकर यांच्या पार्थिवाजवळ इस्लामिक पद्धतीने प्रार्थना करणाऱ्या शाहरुख खानची सगळीकडेच चर्चा होतीये, तो थुंकला का फुंकला अशा टुकार विषयावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे.
खरंतर अशा नाजुक परिस्थितीत अशी चर्चा होणं हे किती दुर्दैवी आहे हे आपण जाणतोच, पण सोशल मीडियावरच्या काही समाज कंटकांनी मात्र यावरून चांगलाच वाद निर्माण केला आहे.
हिंदू अंत्यसंस्काराच्या वेळी इतर धार्मिक पद्धतीचा अवलंब का करावा? मुस्लिम मयताच्यावेळी महामृत्युंजय जप लावला तर, तोंडावर तुळशीपत्र ठेवले तर चालेल का? असे बिनबुडाचे प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारले जात आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
त्यातच आता काही लोकांनी आमीर खान आणि शाहरुख खान यांची तुलना केली. ज्या पद्धतीने शाहरुखने प्रार्थना केली तशीच आमीर खानने का केली नाही? तो मुसलमान नाहीये का इथपासून अगदी जावेद हबिबच्या थुंकण्याचे संदर्भ देऊन शाहरुखचं कृत्य कसं चुकीचं आहे हे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्नसुद्धा झाला.
काहींनी तर या थुंकण्याचा थेट इस्लामी चालीरीतींशी संबंध जोडला. पण तुम्हाला माहितीये का की आमीरसुद्धा त्याच्या या थुंकण्याच्या गोष्टीमुळे इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे? याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत!
१९९० मध्ये दिल सिनेमाच्या सेटवर एक दिवस आमीरने माधुरी दीक्षितकडे हात पुढे करण्याची विनंती केली, मी हात वाचून भविष्य सांगतो असा आमीरने आव आणला होता, जेव्हा माधुरीने तिचा हात पुढे केला तेव्हा अमीर तिच्या हातावर थुंकला आणि त्याने तिथून पळ काढला.
माधुरीनेसुद्धा या गोष्टीकडे नंतर गंमत म्हणून दुर्लक्ष केलं. २०१६ मध्ये जियोने आयोजित केलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये जो जिता वही सिकंदरची संपूर्ण टीम लोकांशी गप्पा मारायला आलेली, तेव्हा आमीरच्या या सवयीची पोलखोल करण्यात आली.
दिग्दर्शक फराह खान हिने या गोष्टीवर प्रकाश टाकत तेव्हा आमीरच्या या खोडकर वृत्तीबद्दल स्पष्टीकरण दिलं की आमीर सेटवर हिरोईनचा हात वाचण्यासाठी विनंती करतो आणि मग तो त्या हातावर थुंकतो.
यावर आमीरने नेहमीप्रमाणेच खोडकर उत्तर देत सांगितलं की “मी आजवर ज्या ज्या हिरॉईन्सच्या हातावर थुंकलो आहे त्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत!”
–
- शाहरुखच्या कृत्याबद्दल एक राष्ट्रप्रेमी मुस्लिम काय म्हणतोय – विचारात पाडणारा लेख
- “आमिर, रस्ते नमाज पढण्यासाठी नाहीयेत” आमिर खान पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर!
–
आमीरच्या या सवयीकडे कित्येक कलाकारांनी मस्करी म्हणून दुर्लक्ष केलं, पण काही अभिनेत्रींना मात्र ही गोष्ट अजिबात पटली नाही. अभिनेत्री जुही चावल हिच्या बाबतीतसुद्धा असाच एक प्रसंग घडला होता.
१९९७ सालच्या इष्क सिनेमात आमीर-जुही यांची जोडी सुपरहीट ठरली, सिनेमासुद्धा खूप लोकप्रिय झाला. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सवयीप्रमाणे आमीरने भविष्य बघण्यासाठी जुहीचा हात मागितला आणि जुहीने हात पुढे केल्यावर तो तिच्या हातावर थुंकला आणि त्याने तिथून धूम ठोकली.
आमीरची ही मस्करी जुहीला अजिंबात आवडली नाही, जुही त्याच्या पुढच्या दिवशी शूटिंगसाठीसुद्धा आली नाही, आणि नंतर बराच काळ आमीर आणि जुही एकमेकांशी बोलतही नव्हते!
आमीरच्या या अशा वागण्यामागे इस्लामिक प्रथा आहे की ही फक्त एक मस्करीच आहे हे आमीरच जाणे, पण शाहरुखच्या प्रार्थनेमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
कायम कॅमेरा फेस करणारा शाहरुखसारखा मोठा कलाकार भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे, पण त्यावरून आमीर आणि शाहरुखमध्ये तुलना करणं कितपत योग्य आहे?
सध्या सिनेमाच्या सेटवर आमीर अशीच मस्करी करतो का ते माहीत नाही पण मग आमीरच्या या हिरॉईन्सच्या हातावर थुंकून त्यांना टॉपच्या हिरॉईन्स बनवण्याच्या अंधश्रद्धेला काय म्हणायचं? इस्लामिक प्रथा की मस्करी.
या वादाला किंवा या तुलनेला खरंतर काहीच अर्थ नाही, हे असे वाद काढून आपण त्या गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला फक्त यातना देतो, जिथे आयुष्यभर कधीच कोणता भेदभाव न करता संगीताची सेवा केली त्या व्यक्तीच्या अंत्यदर्शनाच्या वेळी वाद उद्भवणं हे खरंच खूप दुर्दैवी आहे!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.