Site icon InMarathi

आज भारत-पाक मध्ये फक्त क्रिकेटची नाही तर अजून एक लढाई रंगणार आहे, ज्याबद्दल कुठेच चर्चा नाही!

ind-vs-pak-marathipizza00

haribhoomi.com

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आज आहे ड्रीम मॅच…भारत पाकिस्तान महामुकाबला! आणि तो देखील फायनलचा सामना! त्यामुळे आज कोणीही क्रिकेटप्रेमी आणि इंडियन टीम सपोर्टर आपल्या टीव्ही सेटसमोरून हलणार नाही हे नक्की! कारण अशी लढत पुन्हा कधी होईल कोण जाणे!

youtube.com

बरं पण तुम्हाला माहित आहे का आज फक्त भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचीच नाही तर अजून एक लढाई रंगणार आहे, काय म्हणता? तुम्हाला माहित नाही?

अहो, भारत पाकिस्तान हे केवळ क्रिकेटच्या मैदानात एकमेकांविरोधात उभे ठाकणार असून, हॉकीच्या मैदानात देखील दोघांत तुंबळ युद्ध रंगणार आहे.

sportsrediscovered.com

हॉकी वर्ल्ड लीगचे सामने सध्या लंडन मध्ये सुरु आहेत. भारत, स्कॉटलंड, कॅनडा आणि पाकिस्तान एका ग्रुपमध्ये आहेत. भारताने चांगली सुरुवात केली असून त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडला ४-१ ने धूळ चारली. आणि आज आपला पाकिस्तान बरोबर सामना आहे. आज एकीकडे संपूर्ण भारत भारतीय क्रिकेट टीमला चीअर्स करत असतील आणि दुसरीकडे त्याच भारताची हॉकी टीम मात्र मुठभर समर्थकांच्या साथीने इंग्लंड मध्येआपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी हॉकी स्टिकने सामना करत असेल.

india.com

हा विरोधाभास अतिशय दुर्दैवी आहे त्याला कारण म्हणजे क्रिकेटच्या ग्लॅमर समोर हॉकीचे साधेपण फिके पडते आणि प्रत्येकवेळी हॉकीच नाही तर इतर खेळांच्या पुढे क्रिकेटच जिंकते. याचा अर्थ इथे आम्ही क्रिकेटची निंदा करत आहोत असे मुळीच नाही, पण इतर खेळांचे महत्त्व क्रिकेटमुळे झाकोळले जाते आणि आपल्या इतर खेळाडूंची मेहनत पडद्यामागेच राहते एवढेच सांगणे आहे. असो, ही परिस्थिती केवळ आपणच बदलू शकतो, आपण सर्व भारतीयांनी मिळून प्रत्येक खेळाला समान महत्त्व दिले पाहिजे.

vot-e.com

आज हॉकी मध्ये भारत ६ व्या स्थानावर आहे आणि पाकिस्तान १३ व्या स्थानावर आहे. त्यामुळे भारतीय हॉकीचे खेळाडू आपला पाठींबा मिळवण्याचा पात्र आहेत. त्यामुळे आज जेव्हा विराट कोहली आपल्या बॅटने चौकार आणि षटकार मारत असताना शिट्या वाजवत असाल, तेव्हा जरा चॅनेल बदली करून हॉकी स्टिकने जादू करणाऱ्या त्या १६ खेळाडूंसाठीही टाळ्या वाजवा आणि दोन्ही सामने आपला भारतच जिंकू अशी प्रार्थना करुया!!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Exit mobile version