कौटुंबिक कलहाला कारणीभूत असणारा ‘सातबारा’ बंद होणार म्हणजे नेमकं काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आज सेकंड होम संकल्पना खूपच लोकप्रिय होत चालली आहे, शहरातील धकाधकीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून शहरापासून लांब कुठेतरी एक हक्कच घर असावं अशी प्रत्येकाची ईच्छा असते. गावाला हक्काची जमीन असेल तर सोने पे सुहागा, गावाला अर्धा गुंठा जमीन असो किंवा एकरात असो, आजच्या जमान्यात स्वतःच्या नावावर जमीन असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.
गावाला जमीन जरी असली तरी जर स्वतःच्या नावावर असेल तर ठीक जर त्यात कुटुंबातील आपल्या नातेवाईकांचे हिस्से असतील तर मग प्रकरण किचकट होऊन जाते. यातील किचकट प्रकरण म्हणजे सातबारा, तो नेमका कोणाच्या नावावर असतो त्यातील नियम सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडे असतात मात्र राज्य सरकारने हे याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे यापुढे सातबारा हा प्रकार बंद होणार आहे.
सातबारा बंद का होणार?
सातबारा बंद करण्यामागे सर्वात मोठ कारण आहे ते म्हणजे वाढते शहरीकरण, आज छोट्या शहरांचे मोठ्या शहरात रूपांतर होत आहे मोठी शहरे मेट्रो सिटी बनत आहेत त्यामुळे अशा ठिकाणची शेजमीन पूर्णपणे नष्ट होत चालली आहे. शहरांमध्ये सिटी सर्व्हे झालेल्या काही जमिनी असतात ज्यांचे सातबारे उतारे केलेले नसतात त्यामुळे अशी प्रकरणे कोर्टात जातात.
या सगळ्यावर उपाय म्हणून ज्या शेत जमिनी नाहीत अशा जमिनींचा सातबारा कमी करण्याची प्रक्रिया जमाबंदी आणि भूमिलेख अभिलेख विभागकाकडून प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
या निर्णयाची सुरवात प्रायोगिक तत्वावर पुणे, सांगली मिरज, नाशिक या भागातून होणार आहे. जर या भागात प्रयोग यशस्वी झाला तर संपूर्ण राज्यात राबनवण्याचा मानस सरकारचा आहे.
सातबारा म्हणजे नेमकं काय?
सातबारा म्हणजे आपल्या जमिनीची पूर्ण कुंडली, जसे जन्मकुंडलीवर आपल्या ग्रहांची इतंभूत माहिती असते त्याच प्रमाणे सातबाराच्या उताऱ्यावर जमिनींबाबतचे संपूर्ण तपशील, छोटी मोठी माहिती आपल्याला कळून येते. प्रत्येक गावाच्या तलाठ्याकडे गावातील सर्व जमिनी संदर्भातील कागदपत्रे, नोंदी लिहून जपून ठेवलेल्या असतात.
–
- स्वतःची २ एकर जमीन पोटच्या पोरासाठी नव्हे, तर पक्ष्यांच्या नावे करून ठेवणारं जोडपं
- एकर, गुंठा, हेक्टर, बिगा… जमीन मोजणीच्या युनिट्सबद्दल महत्वाच्या गोष्टी!
–
सध्याच्या डिजिटल युगात हाच सातबारा आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो. यासाठी सरकारने आपली अधिकृत अशी वेबसाईट देखील सुरु केली आहे.
सातबारा उताऱ्यातील नावावरून आज अनेक घरांमध्ये वाद निर्माण होताना दिसून येतो. ज्या घरात एकेमकांशी प्रेमाने वागलेली माणसं जमिनीच्या हक्कासाठी न्यायालयात वर्षनुवर्षं भांडत असतात. एकूणच जमीन जुमला हे प्रकरण किचकट आहे त्यामुळे सरकराने उचलले हे पाऊल नक्कीच फायद्याचे ठरेल…
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.