Site icon InMarathi

शाहरुखची फुंकर ते जावेदची थुंकी: या प्रकरणांच्या मुळाशी आहे तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सातही सुरांना पोरकं करून भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला आणि जगभरातून चाहते हळहळले. दिवसभर सुरु असलेली घालमेल, दुःख सहन न झाल्याने अनेकांनी ब्रिचकॅन्डी रुग्णालय तर काहींनी प्रभुकुंज या लतादीदींच्या निवासस्थानी धाव घेतली.

वेळेअभावी अनेकांना निवासस्थानी अंत्यदर्शन न मिळाल्याने संगीतप्रेमींनी मग शिवाजी पार्काची वाट धरली. ज्या शिवाजी पार्कात दीदींवर अत्यंसंस्कार केले जाणार तेथे किमान एकदा त्यांची झलक बघायला मिळावी यासाठी लाखोंचा जनसमुदाय तळमळत होता. दीदींच्या या श्रोत्यांमध्ये सर्वसामान्य तर होतोच, मात्र राजकारणातील नेते, सेलिब्रिटी, खेळाडू यांचाही समावेश होता.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

सगळ्याच मान्यवरांनी दीदींना मानवंदना देत अखेरचा निरोप घेतला. मात्र अभिनेता शाहरुख खान याच्या एका प्रतिक्रियेने चांगलाच वाद निर्माण केलाय. शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पुजा ददलानी यांनी लतादीदींच्या पार्थीवाचे दर्शन घेतले यावेळी हिंदू प्रथेप्रमाणे पुजाने नमस्कार केला तर शाहरुखने इस्लामी प्रथेप्रमाणे नमाज करत श्लोक म्हटले.

 

 

या दोघांनी एकाचवेळी केलेल्या कृतीचे कौतुक झाले, मात्र त्यानंतर जे काही घडले त्यावरून नेटकऱ्यांनी शाहरुखला ट्रोल केले.

काय होती ती कृती?

ट्विटरवर कालपासून अशाच एका प्रसंगाची चर्चा आहे जिथे असं बोललं जातंय की, “शाहरुख खान हा काल लतादीदींच्या अंतिम दर्शनासाठी आला आणि तिथे थुंकला.”

झालं असं की लतादीदींच्या पार्थिवा समोर पुष्पगुच्छ ठेवलं, आपल्या धर्मातील मान्यतेप्रमाणे तिथे उभं राहून त्याने प्रार्थना केली.

मृत आत्म्यास शांती लाभो अशी त्याने मनोमन प्रार्थना केली असं दिसलं. पण, दर्शन घेण्याआधी त्याने काही क्षण आपला मास्क खाली केला आणि त्याने ओठांचा फुत्कार केला. हे सोशल मीडियावर इतरांच्या वागण्याचं मूल्यमापन करणाऱ्या लोकांना अशोभनीय वाटलं.

पार्थिवावर शाहरुख खान थुंकला असा कोलाहल करणाऱ्यांना शाहरुखची नेमकी कृती कळली का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण शाहरुख खान थुंकला नसून त्याने तोंडून केवळ पार्थिवावर फुंकर घातली.

 

तो ‘थुंकला’ नाहीये, ओठांमधून हवेचा फुत्कार केला फक्त…

मासे खाण्याचं निमंत्रण ते शिवसेना प्रवेशाबद्दल विचारणा, दीदी-बाळासाहेबांच्या नात्याचे किस्से

मुळात इस्लामचा अभ्यास केलेल्या काही व्यक्तींनी शाहरुख खानच्या ओठांच्या फुत्काराचं असं लॉजिकल स्पष्टीकरण दिलं की, “नमाज पढल्यानंतर ओठांचा असा फुत्कार करणे याला इस्लाम मध्ये पवित्र मानलं जातं. असं करणं म्हणजे आत्म्यास सदगती लाभो आणि पुढच्या जन्मातसुद्धा अल्ला त्यांचं रक्षण करो” असा त्याचा अर्थ होतो.

त्यामुळे शाहरुखने कोणतीही आक्षेपार्ह कृती केली नसून त्याच्या धर्माला अनुसरून त्याने लतादीदींना आदरांजली वाहिली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही चूक नसताना बापड्या शाहरुखला नेटकऱ्यांनी फैलावर घेतले.

शाहरुखची चर्चा कमी म्हणून की काय, याचसंदर्भात हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीबला ट्रोल करण्याची संधीही चुकवली नाही. शाहरुखच्या थुंकण्याचा संबंध थेट जावेद हबीबच्या लज्जास्पद विधानाला जोडून ट्रोलर्सनी आपला रिकामा वेळ सत्कारणी लावला.

जावेदची थुंकी आणि माफीनामा

एकेकाळी जावेद हबीब यांच्या आऊटलेटमधून केस कापून घेण्याचं स्वप्न मध्यमवर्गीय कुटुंबात पाहिलं जायचं. स्टाईल स्टेटमेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जावेदने देशभर आपला चांगलाच जम बसवला आणि त्यानंतर जणूकाही वाट्टेल तसे वागण्याचा परवानाच मिळाल्यासारखे त्याचे वारू चौफेर उधळू लागले.

मागील महिन्यात एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. अर्थातच महागडी फी परवडणारे उच्चभ्रु घरातील अनेक महिलांनी या कार्यशाळेला हजेरी लावली होती. त्यावेळी हेअरस्टाईल आणि हेअरकट यांचे प्रात्यक्षि दाखवणाऱ्या जावेदने उपस्थित महिलांपैकी पुजा गुप्ता यांची निवड केली आणि तिच्यावर प्रयोग सुरु केले.

 

 

केसांची देखभाल आणि शॅम्पुचे महत्व सांगणाऱ्या जावेद यांनी विनोदनिर्मितीचा एक लज्जास्पद प्रयत्न केला आणि जावेद हबीब चक्क त्या महिलेच्या केसांवर थुंकला. एवढंच करून तो थांबला नाही तर निर्लज्जपणाचा कळस म्हणजे ”माझ्या थुंकीत जीव आहे” अशी टिप्पणीही त्याने केली.

 

त्यानंतर मात्र पुजा गुप्ता चांगल्याच खवळल्या. माझ्या केसांवर जावेद थुंकल्याचा आरोप करत त्यांनी थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच महिला आयोग यांच्याकडे तक्रारीसाठी धाव घेतली.

“सेमिनारदरम्यान जावेद हबीब माझ्या केसांवर दोनदा थुंकले. असे करून त्यांनी माझा अपमान केला आहे. माझी नऊ वर्षांची कारकीर्द संपली. यापुढे मी माझ्या गल्लीतील न्हाव्याकडून केस कापून घेईन. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून हबीब यांच्यावर कठोर कारवाई करावी,” असे महिलेने सांगितले.

 

/

 

यानंतर या घटनेचे देशभर पडसाद उमटल्याचे पाहून जावेद हबीब यांनी पुजा यांची माफी मागितली.

अर्थात जावेद यांच्या वागणुकीला कोणत्याही प्रकारचा धार्मिक आधार नव्हता. त्यांनी केलेली कृती ही विनोद निर्मितीचा निष्पळ आणि किळसवाणा प्रयत्न होता. मात्र शाहरुख खानने लतादीदींच्या पार्थिवाजवळ केलेली प्रार्थना तसेच कृती ही इस्लामिक धर्माला अनुसरून होती. त्यामुळे या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध नसल्याने शाहरुख आणि जावेद यांची तुलना करणे योग्य नाही.

 

 

सोशल मिडीयावर कालपासून किंग खानला चांगलंच ट्रोल केले जात असून अनेकांनी जावेद आणि शाहरुख यांच्या कृती सारख्याच असून त्यांच्या धर्मावरच बोट ठेवले आहे. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही धर्मात समोरच्याच आपमान करण्याचे संस्कार केले जात नसून शाहरुखची कृती ही केवळ आदर आणि धार्मिक वृत्तीचे समर्थन करते. मात्र जावेद हबीबने केलेला तो लज्जास्पद प्रकार हा केवळ नैतिकतेला काळीमा फासणारा आहे.

जावेदसारख्या सेलिब्रिटींनी केलेल्या या कृत्यांचा काही काळापुरता गाजावाजा होतो, तक्रारी केल्या जातात, मात्र अशा सेलिब्रिटींना अशा गलिच्छ कृत्याबद्दल कधीही शिक्षा होत नसल्याने ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ ही म्हण सेलिब्रिटींना लागू पडत नसल्याने पुन्हा ही मंडळी अशाच नव्या चूका करायला सज्ज होतात.

पर्यायी शाहरुखला विनाकारण ट्रोल करणे, त्यानिमित्ताने हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणे हे योग्य नाही हेच खरं! लतादीदींना श्रद्धांजली वाहताना तरी अशा वादात न पडणे किंवा नव्याने असे वाद निर्माण न करणे ही त्यांना खरी आजरांजली!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version