' “शाहरुख अंगावर धावून आला तेव्हा मी त्याला बोचकारलं”: मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा – InMarathi

“शाहरुख अंगावर धावून आला तेव्हा मी त्याला बोचकारलं”: मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वाद आणि शाहरुख हे समीकरण आपल्याला नवीन नाही. वानखेडे प्रकरण, सहिष्णूता प्रकरण, नुकतंच झालेलं मुलाचं ड्रग्स प्रकरण किंवा सध्या लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर मुस्लिम पद्धतीने प्रार्थना करण्याचं प्रकरण. या न त्या कारणाने शाहरुख चर्चेत असतोच.

खरंतर सध्याच्या प्रकरणात त्याची खरंतर काहीच चूक नाही, पण सोशल मीडियावर त्याला या वादात खेचून आणलंय आणि लोकं त्यावर टीका टिप्पणी करण्यात गर्क आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

दिल्लीच्या सामान्य कुटुंबातला एक पोरगा आज करोडो लोकांच्या मनावर राज्य करतोय ही बाब कौतुकास्पद आहेच. शिवाय जेव्हा शाहरुख इंडस्ट्रीत आला तेव्हा इतर मोठ्या कलाकारांनी नाकारलेले रोल त्याने आपलेसे केले आणि तिथूनच शाहरुखची खरी सुरुवात झाली.

 

shahrukh khan 4 IM

 

टीव्हीच्या माध्यमातून तो लोकांच्या मनात घर करून बसलाच होता, शिवाय सुरुवात खलनायक म्हणून केलेला हा इंडस्ट्रीतला पहिला चॉकलेट बॉय! शाहरुखने डर, अंजाम, बाजीगरसारख्या सिनेमातून खलनायक साकारला आणि आजही त्याच्या या भूमिकांची लोकं आठवण काढतात.

शाहरुखचा बाजीगर हा सर्वात जास्त लोकप्रिय झालेला चित्रपट. अब्बास मस्तान जोडीचा क्राइम थ्रिलर, अनू मलिकच संगीत, जॉनी लिव्हरची कॉमेडी आणि शाहरुख काजोल शिल्पा शेट्टीसारखे कलाकार यासाठी हा चित्रपट ओळखला जातो.

यातला कलाकारांचा अभिनय, गाणी यांची जेवढी चर्चा झाली तितकीच चर्चा त्यातल्या एका सीनची झाली तो सीन म्हणजे शाहरुख एका मुलीला मारून, पुरावे नष्ट करण्यासाठी एक फोटोग्राफ फाडून चक्क खातो.

 

baazigar IM

 

या सीनमध्ये आपली मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीस हीने त्या मुलीचा रोल केला आहे. नुकत्याच एका शोमध्ये तिने या सीनमागचा एक धमाल किस्सा सांगितला आहे, त्याविषयीच आपण आज जाणून घेणार आहोत!

रेशम टिपणीस हीने जीवलगा या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. शिवाय सत्वपरीक्षा, मृगजळ, बे दुणे चार अशा सिनेमातून रेशम टिपणीसच्या अभिनयाची दखल घेतली जाऊ लागली.

याबरोबरच मध्यंतरी मराठी बिग बॉसमधल्या तिच्या पेरफॉर्मन्ससाठी आणि खासकरून तिच्या वादग्रस्त रिलेशनशिपसाठी ती चांगलीच चर्चेत होती!

resham tipnis IM

 

बाजीगरमधल्या या सीनमध्ये शाहरुख एका हॉटेल रुमवर येतो आणि रेशमवर हल्ला करतो, त्यांची झटापट होते आणि मग तो तिचा गळा दाबून तिला ठार मारतो, आणि मग तो मृतदेह एका बॅगेत भरून ती बॅग समुद्रात फेकून देतो.

रेशम टिपणीस हिने या सीनमागची गोष्ट सांगताना तिने असं म्हंटलं की या सीनचं शूटिंग श्रीदेवी यांच्या चेन्नईतल्या एका बंगल्यात करण्यात आलं होतं.

दिग्दर्शक अब्बास मस्तान यांनी हा सीन समजून दिल्यावर शूटिंगला सुरुवात झाली. शाहरुख दरवाज्यातून रेशमला ढकलून आत शिरतो आणि तिला बेडवर ढकलतो, या सिनदरम्यान शाहरुखने खरोखरच तिचा गळा आवळला होता, आणि तेव्हा त्या झटपटीत शाहरुखच्या शर्टची बटणं उघडी असल्याने रेशमने त्या नादात शाहरुखच्या छातीवर बोचकारलं.

 

baazigar 3 IM

 

सीन ओके झाल्यानंतर शाहरुखने रेशमला बोलावलं आणि तिला छातीवर झालेली जखम दाखवली, त्यावर रेशम ने आता तू बायकोला काय सांगणार? असं शाहरुखला प्रश्न विचारला, अर्थात ही गोष्ट तेवढ्यावरच निवळली.

पुढे सिनेमा हीट झाला आणि या सीनची सॉलिड चर्चा झाली, शाहरुखच्या करियारमधला बेस्ट सिनेमा म्हणून आजही बाजीगरची गणती होते, शाहरुखसोबत रेशम टिपणीससुद्धा हा सिनेमा कधीच विसरू शकणार नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?