Site icon InMarathi

एका भीतीपोटी लतादीदींनी ‘आनंदघन’ हे नाव स्वीकारलं…

lata didi singing im2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर आज आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण भारतातले त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले. लतादीदींनी त्यांच्या ७ दशकांच्या कारकिर्दीत विविध भारतीय भाषांमध्ये जवळजवळ ५० हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत.

त्यांनी गायलेली गाणी गुणगुणणारा माणूस नाही असं होणंच शक्य नाही. लतादीदी एक गायिका म्हणून सुप्रसिद्ध तर होत्याच, पण त्यांनी संगीतकार म्हणूनही काम केलं आहे. लतादीदींनी केवळ मराठी चित्रपटांनाच संगीत दिलं होतं. चला त्याबद्दल आणखी जाणून घेऊया!

 

 

लतादीदींनी चित्रपटांसाठी संगीतकार म्हणूनही काम केलं आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नाही. त्यांनी संगीत दिलेला पहिला सिनेमा म्हणजे ‘राम राम पाव्हणं’. यानंतरही त्यांनी एकूण ४ मराठी चित्रपटांना ‘आनंदघन’ या टोपणनावानं संगीत दिलं. हे सिनेमे म्हणजे ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’, साधी माणसं’ आणि तांबडी माती’.

लतादीदींनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत देण्यामागे पण एक किस्सा सांगितला जातो. प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे लतादीदींना त्यांच्या मुलीसारखं मानायचे. ते ‘मोहित्यांची मंजुळा’ सिनेमा करत होते त्यावेळी त्यांच्याकडे संगीत दिग्दर्शक नव्हता.

त्यांनी ही अडचण लतादीदींना सांगितल्यावर त्या म्हणाल्या, की मी करते सिनेमाचं संगीत, मात्र त्यावेळी पेंढारकरांनी त्यांना सांगितलं की हे जे संगीत द्यावं लागणार आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं आहे, तरीही लता मंगेशकर संगीत देण्यासाठी तयार झाल्या. तेव्हा भालजी पेंढारकरांना काळजी वाटली. कारण लतादीदी त्यावेळी त्यांच्या करियरच्या शिखरावर होत्या आणि जर त्यांचा हा प्रयोग फसला असता तर त्यांच्या गायिकेच्या प्रतिमेला धक्का पोहोचला असता.

ही शंका त्यांनी बोलून दाखवली आणि त्याचवेळी टोपणनावाने संगीत देण्याचा सल्ला दिला. त्यांनी सुचवलेल्या काही नावांमधून लतादीदींनी आनंदघन हे नाव नक्की केलं. त्यांचा हा प्रयोग खूप यशस्वी झाला आणि चित्रपटाला इतर पुरस्कारांबरोबर उत्कृष्ट संगीताचाही पुरस्कार मिळाला.

 

 

त्यांना पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी लतादीदी त्यांच्या खुर्चीत बसून होत्या. समोर गेल्या नाहीत. मात्र स्टेजवरून अनाउन्समेंट झाली, की आनंदघन म्हणजेच लता मंगेशकर! मग मात्र लतादीदींना उठून पुरस्कार घेणं भाग पडलं आणि त्यांचं गुपित जगासमोर आलं.

लतादीदींना यानंतर काही वर्षांनी आनंद सिनेमाचं संगीत करण्याचीही ऑफर आली होती, मात्र त्यांनी ती नम्रपणे नाकारली. कारण त्यावेळी लतादीदींना संगीतकार म्हणून काम करण्याची इच्छा नव्हती. मुख्य म्हणजे त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्या रेकॉर्डिंगमध्येच फार व्यस्त होत्या.

लतादीदी बहुआयामी आणि चतुरस्र व्यक्तिमत्व असूनही त्यांचे पाय जमिनीवरच होते हे महत्त्वाचं. त्यांच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे, ते फक्त आपण शिकणं गरजेचं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version