Site icon InMarathi

तो ‘थुंकला’ नाहीये, ओठांमधून हवेचा फुत्कार केला फक्त…

shahrukh spit featured IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वाद हे काही सेलिब्रिटींच्या पाचवीलाच पुजलेले असतात. त्यांनी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरीही सोशल मीडियावरील सक्रिय जनता ही त्यांच्या वागण्यातील काहीतरी चूक शोधतात आणि हॅशटॅग सुरू करून त्या प्रसंगाचं चर्वण करत राहतात.

ट्विटरवर कालपासून अशाच एका प्रसंगाची चर्चा आहे जिथे असं बोललं जातंय की, “शाहरुख खान हा काल लतादीदींच्या अंतिम दर्शनासाठी आला आणि तिथे थुंकला.”

 

 

शाहरुख खानला आमिर खान इतकं सामाजिक भान नसलं तरीही तो अशी चूक करणार नाही याची त्याच्या चाहत्यांना खात्री आहे आणि त्यामुळे या घटनेचं कौतुक करणारे आणि टीका करणारे असे दोन मतप्रवाह सध्या इंटरनेटवर बघायला मिळत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पांढरा टी शर्ट आणि काळा मास्क घालून शिवाजी पार्कवर आलेल्या शाहरुख खानने लतादीदींचं अंतिम दर्शन घेतांना नेमकं काय केलं? ते जाणून घेऊयात.

लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी काल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री श्री उद्धव ठाजरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भारत रत्न सचिन तेंडुलकर, आमिर खान सारखे इतर मान्यवर सुद्धा शिवाजी पार्क इथे आले होते. अख्ख्या देशाला स्तब्ध करणाऱ्या या घटनेचं थेट प्रक्षेपण हे सर्व वृत्तवाहिन्यांवरून सुरू होतं.

 

 

लतादीदींबद्दल असलेल्या आत्मीयतेमुळे प्रत्येकाला एखादी घरातील व्यक्ती सोडून गेल्यासारखं दुःख होत होतं आणि म्हणून प्रत्येकाच्या नजरा काल टीव्हीवर खिळून होत्या.

लतादीदींना ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित केलेलं असल्याने अंतिम संस्कार हे शासकीय इतममात सुरू होते.

जेव्हा शाहरुख खान तिथे पोहोचला तेव्हा काही लोकांना आश्चर्य वाटलं असावं हे नक्की. कारण, तो पडद्यावर रोमान्सचा किंग असलेला शाहरुख हा समाजात वावरतांना मात्र आपल्या फटकळ बोलण्यामुळे आणि प्रत्येक कामात व्यावसायीक फायदा शोधण्याचा वृत्तीमुळे जास्त प्रसिद्ध आहे.

तो काल आला, त्याने लतादीदींच्या पार्थिवा समोर पुष्पगुच्छ ठेवलं, आपल्या धर्मातील मान्यतेप्रमाणे तिथे उभं राहून त्याने प्रार्थना केली.

मृत आत्म्यास शांती लाभो अशी त्याने मनोमन प्रार्थना केली असं दिसलं. पण, दर्शन घेण्याआधी त्याने काही क्षण आपला मास्क खाली केला आणि त्याने ओठांचा फुत्कार केला. हे सोशल मीडियावर इतरांच्या वागण्याचं मूल्यमापन करणाऱ्या लोकांना अशोभनीय वाटलं.

 

मग काय, एकाने वावडी उठवली आणि बघता बघता त्याचा वणवा पेटला. आपल्या धर्माचा अतिरिक्त अभिमान असलेल्या लोकांनी “हे आम्हाला मान्य नाही” अशी प्रतिक्रिया दिली आणि त्याला रिट्विट करण्याचा सिलसिला सुरू झाला. उथळ प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास क्षणार्धात सुरुवात झाली.

आपल्या मॅनेजर पूजा ददलानी सोबत आलेल्या शाहरुख खानने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न देणं पसंत केलं.

काही वेळातच इस्लामचा अभ्यास केलेल्या काही व्यक्तींनी शाहरुख खानच्या ओठांच्या फुत्काराचं असं लॉजिकल स्पष्टीकरण दिलं की, “नमाज पढल्यानंतर ओठांचा असा फुत्कार करणे याला इस्लाम मध्ये पवित्र मानलं जातं. असं करणं म्हणजे आत्म्यास सदगती लाभो आणि पुढच्या जन्मातसुद्धा अल्ला त्यांचं रक्षण करो” असा त्याचा अर्थ होतो.

जेव्हा हे स्पष्टीकरण ट्विटरवर येऊन धडकलं तेव्हा कुठे ही चर्चा थांबली. तरीही काही लोकांनी या घटनेबद्दल आपली गरळ ओकणं हे सुरूच ठेवलं होतं.

सोशल मीडिया मधील एका प्रवर्गाचा हा प्रॉब्लेम आहे की, त्यांना काहीच आवडत नाही किंवा प्रत्येक गोष्टीतच चूक सापडते, वाटते कारण ते तेच शोधत असतात. हे तेच लोक असावेत ज्यांना मंदिरा बेदीने आपल्या पतीला मुखाग्नी दिल्याबद्दल आक्षेप होता.

 

 

प्रसंगाचं गांभीर्य विसरून विषय भलतीकडेच न्यायचा आणि ट्विटरवर होणारी ट्विट्सची आतिषबाजी हातात पॉपकॉर्न घेऊन बघत रहायची अशी या लोकांची मानसिकता असावी. सेलेब्रिटींची चूक शोधून काढली की, आपण चर्चेत येणार हासुद्धा अशा काही ओरिजनल किंवा फेक अकाउंट्सचा मूळ उद्देश असावा.

लोकशाही प्रधान आपल्या देशात प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याचा पूर्ण अधिकार आहे.

शाहरुख खान असो किंवा कोणीही असो, त्याने आपल्या धर्मात शिकवलेल्या पद्धतीचं आचरण केलं तर त्यावर आक्षेप नोंदवणाऱ्यांनी त्याचा सखोल अभ्यास करून मग त्याचं कौतुक किंवा टीका करावी इतकंच या निमित्ताने सांगणं आहे.

 

 

आणि हो, हे सांगणं म्हणजे आम्हाला शाहरुखच्या वागण्याचा पुळका वगैरे आला आहे असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये.

आम्ही फक्त सत्य माहिती लोकांसमोर आणत आहोत. माहितीची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या सोशल मीडियाचा तसाच वापर केल्यास प्रत्येकाच्याच वेळेची बचत होईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version