आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लता दीदींचा आवाज स्वर्गीय होता. अनेकांसाठी जगण्याचं कारणही होता. या आवाजात अशी जादू होती, की एखाद्याला जगण्याचंही कारण मिळे. या सगळ्या वाक्यात कोणतिही अतिशयोक्ती नाही. फ़िल्मी जगतातली एक अशी दिग्गज व्यक्ती जिनं लतादीदींच्या आवाजाच्या मदतीनं दुर्धर रोगाशीही लढा दिला. या व्यक्तीचं नाव, मेहबुब खान.
—
—
लता दीदींची अनेक अजरामर गाणी आहेत. या गाण्यापैंकी एक गाणं १९५६ साली प्रदर्शित झालेल्या राज कपूर-नर्गिस जोडीच्या चोरी चोरी चित्रपटातलं रसिक बलमा. हे गाणं दीदींनी इतकं अप्रतिम गायलंय, की पहिल्या ओळीपासूनच ऐकणारा त्या सुरांच्या जादूत हरवून जातो.
हे गाणं चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच फ़िल्मी वर्तुळात चर्चेत होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तर रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. तो काळ निरोगी स्पर्धेचा होता. प्रत्येकजण आपलं काम प्रामाणिकपणे करायचा.
रसिक बलमानं संपूर्ण फ़िल्मी जगताला या गाण्याची दखल घेणं भाग पाडलं. अनेकांचं हे आवडतं गाणं बनलं. मदर इंडियाचे दिग्दर्शक मेहबुब खान लताचे निस्सीम चाहते होते. त्यांनाही हे गाणं खूप आवडलं. हा चित्रपट प्रदर्शित झाल तेव्हा ते आजारी होते अणि अमेरिकेत लॉस एंजेलिसमधे उपचारासाठी गेले होते.
—
- रेहमानसोबत तब्बल ८ तास उभं राहून केलं रेकॉर्डिंग आणि अजरामर झालं हे दीदींचं गाणं!
मासे खाण्याचं निमंत्रण ते शिवसेनेत प्रवेशाबद्दल विचारणा, दीदी-बाळासाहेबांच्या नात्याचे किस्से
—
दुर्धर आजार, परदेशातल्या हॉस्पिटलच्या भिंती आणि आपल्या माणसांपासून दूर असण्याचं नैराश्य. मेहबुब खान यांना मायदेशाची खूप आठवण येत असे. अशावेळेस ते लताची गाणी गुणगुणत बसत.
तो काळ गाणी इतकी सहज ऐकता येण्यासारखा नव्हता. साधनांची उपलब्धता आजच्यासारखी नव्हती. हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या पडल्या मेहबुब खान यांना लताचं रसिक बलमा ऐकण्याची अनिवार्य इच्छा होत होती. हे गाणं प्रदर्शित झालं तेव्हा ते भारतातच होते, मात्र त्यानंतर त्यांना लगेचच अमेरिकेला जावं लागलं होतं.
हॉस्पिटलमधे असणार्या मेहबुब खान यांनी लतादीदींच्या या गाण्याची रेकॉर्ड मिळवण्याचे खूप प्रयत्न केले. त्या परदेशी अनोळखी वातावरणात लताच्या सुरांचा मेहबुबना आधार वाटत होता. मात्र दुर्दैवानं ही रेकॉर्ड काही मिळत नव्हती. सर्व प्रयत्न करुन झाल्यावर अखेर मेहबुबनी लतादीदींना त्यांच्या मुंबईतल्या घरी थेट फ़ोन लावला.
फोन लता दीदींनीच उचलला. पलिकडून मेहबुब बोलले, ‘दीदी मैं मेहबुब खान बोल रहा हूं. एक गाना मेरी रूह में बस गया है. रसिक बलमा, ये गाना बार बार सुनने का मन हो रहा है. यहां इस गाने रिकॉर्ड कहीं मिल नहीं पा रहे है. मेहरबानी करके ये गाना आप मुझे सुना दिजिए’
हे ऐकल्यावर लता दीदींनी क्षणभराचाही विचार न करता त्यांच्या नेहमीच्याच मृदू, सुमुधुर आवाजात मेहबुबना उत्तर दिलं, ‘हां. जरूर सुनाउंगी. आपको ये गाना सुनकर दिल को सुकून मिल रहा है तो जरूर सुनाउंगी’ आणि चक्क आंतरराष्ट्रीय फ़ोनकॉलवर त्यांनी मेहबुबखान यांच्यासाठी हे गाणं गायलं.
विचार करा, तेव्हाचा काळ आजच्यासारखा नव्हता. आंतरराष्ट्रीय कॉल्स इतके सहजी लागत नसत आणि खूप महागही असत. शिवाय मेहबुबनी अमेरीकेतल्या दिवसा म्हणजे इथल्या मध्यरात्री फ़ोन केला होता. गाणं ऐकून झाल्यावर मेहबुब यांच्या डोळ्यात आनंदाश्रु आले.
ते दीदींना म्हणाले, ‘अब दिल को चैन आ गया. मैं तुमसे एक गुजारिश करता हूं कि जब भी मन करेगा मैं फ़ोन करके तुमसे ये गाना सुन सकता हूं’ या विनंतीचा दीदींनी स्विकारत करत त्यांना सांगितलं की, ‘मेहबुब साहब अगर आपको मेरी आवाज सुनकर दिल को इतना सुकून मिलता है तो आप मुझे दिन या रात कुछ भी न देखते हुए कॉल किया किजिएगा. मैं फ़ोन पर आ जाउंगी और जितनी बार आप कहेंगे मैं उतनी बार ये गाना आपको गाकर सुनाउंगी’
… आणि दीदीनी हे म्हणायचं म्हणून म्हणलं नव्हतं तर त्यानंतर किमान दहा पंधरा वेळा तरी लता दीदींनी हे गाणं मेहबुबना फ़ोनवरून ऐकवलं होतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.