' ट्रॅफिकमुळे खरंच घटस्फोट होतात का? जाणून घ्या “खरी” प्रमुख कारणं – InMarathi

ट्रॅफिकमुळे खरंच घटस्फोट होतात का? जाणून घ्या “खरी” प्रमुख कारणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या समाजात एक मानसिकता तुम्हाला हमखास बघायला मिळते, ती म्हणजे ‘आपलं ठेवायचं झाकून आणि इतरांचं बघायचं वाकून’ या कॅटेगरीमधली. खासकरून भारतात तर हा प्रकार तुम्हाला अगदी सर्रास पाहायला मिळू शकतो.

स्वतःच्या घरात काय चाललंय हे कदाचित ठाऊक नसेल, पण शेजऱ्याच्या घरात नेमके कशामुळे कलह सुरू आहेत याची चर्चा नाक्यानाक्यावर होत असते. अशीच एक सर्वात जास्त चर्चेचा विषय बनणारी गोष्ट म्हणजे घटस्फोट!

 

divorce inmarathi

 

बॉलिवूड सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, जर तुम्ही घटस्फोट घेतला आहे तर तुमच्याकडे लोकांचा बघायला दृष्टिकोन हमखास बदलतो. सध्याची प्रगती, डेवलपमेंट बघता हे सगळे प्रॉब्लेम्स खासकरून मेट्रो सिटीजमध्येच तुम्हाला आढळून येतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नुकतंच महाराष्ट्रातले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी घटस्फोटाविषयी असेच एक विधान केल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

अमृता फडणवीस मुंबईतल्या वाहतूनकोंडीविषयी भाष्य करताना म्हणाल्या की “मुंबईत ट्रॅफिक जॅममुळे घटस्फोटांचं प्रमाण ३% इतकं आहे, कारण आपण आपल्या कुटुंबाला वेळच देऊ शकत नाही, त्यामुळेच घटस्फोट होत आहे!”

 

amruta 2 IM

 

 

अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर चर्चा होऊ लागल्या, त्या पुन्हा ट्रोलर्स आणि नेटकऱ्यांच्या रडारवर आल्या, भरपूर मिम्स जोक व्हायरल झाले.

इतकंच नाही तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीसुद्धा अमृता फडणवीस यांच्या स्टेटमेंटवर टीका करत, हा मुंबईला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं भाष्य केलं, पण खरंच मुंबई किंवा इतर शहरातल्या घटस्फोटामागे ट्रॅफिक जॅम हे कारण असू शकतं का?

 

amruta fadanvis IM

 

आज आपण एका रिसर्चच्या माध्यमातून, घटस्फोट होण्यामागची प्रमुख कारणं कोणती ते जाणून घेणार आहोत!

१. महिलांचं स्वातंत्र्य :

 

indian women IM

 

पूर्वी बायकांचं विश्व हे चूल आणि मूल इतकंच मर्यादित होतं, पण आता तसं नाहीये, आता पुरुषाच्याही एक पाऊल पुढे जाऊन प्रत्येक स्त्री ही स्वतंत्र आयुष्य जगते आणि स्वतःचं कुटुंबदेखील सांभाळते.

काही पुरुषी मानसिकतेच्या लोकांना हे पचत नाही, झेपत नाही, त्यामुळे स्त्रियांचं हे स्वातंत्र्य त्यांच्या डोळ्यात खुपतं, हळूहळू वाद विकोपाला जातो आणि याचा परिणाम घटस्फोटाच्या रूपात पाहायला मिळतो!

सध्याचा समाज बदलतो आहे पण पुरुषप्रधान मानसिकतेला अजूनही काही लोकं चिकटून आहेत आणि यामुळेच घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे असं आपण म्हणू शकतो!

२. फसवणूक किंवा विवाहबाह्य संबंध :

 

cheating IM

 

आज बऱ्याच सिनेमात तसेच वेबसिरीजमध्ये आपल्याला extra marital affairs, किंवा विवाहबाह्य संबंध अगदी सर्रास बघायला मिळतात. मनोरंजन विश्व हे आपल्याला आरसा दाखवत असतं.

सध्याच्या फास्ट फूड जनरेशनच्या आवडी-निवडी, पसंती-नापसंती पाहता फसवणूक किंवा चीटिंगचं प्रमाण वाढलेलं आहे असंच दिसतय. लग्न झालेलं असो किंवा रिलेशनशिपमध्ये असो आपल्या पार्टनरला चीट करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

फक्त पुरुषच नाही तर महिलासुद्धा याबाबतीत पुढे असल्याचं आपल्याला दिसेल. खरंतर ही खूप वैयक्तिक बाब आहे पण सध्याच्या घटस्फोटांमागचं हे एक प्रमुख आणि गंभीर कारण आहे!

३. सेक्स लाईफमध्ये प्रॉब्लेम :

 

sex life problem IM

 

सध्या कामाचं स्वरूप, आणि इतर जवाबदऱ्या यामुळे प्रत्येक जोडप्यात तुम्हाला यातले काही ना काही प्रॉब्लेम आढळून येतात. सध्याची लाईफस्टाईल आणि आरोग्य व्यवस्था पाहता प्रत्येकाला काहीतरी प्रॉब्लेम आहेत.

कुणाला मूल होत नाही, तर कुणाचं सेक्स लाईफ उत्तम नाही त्यामुळे त्याचा परिणाम नात्यावर आणि भविष्यावर होतो आणि परिणामी कपल्स एकत्र राहण्याचं सोडून वेगळे होतात.

खरंतर सध्या विज्ञानाने एवढी प्रगती केलीये की या सगळ्या प्रॉब्लेमवर तोडगा उपलब्ध आहे, पण समंजसपणा नसल्याने आणि ऑप्शन्स उपलब्ध असल्याने लोकं एकेमकांपासून वेगळं होणं पसंत करतात!

वरवर जरी ही खूप छोटी समस्या वाटत असली तरी ती गंभीर आहे, आणि त्यातून  जी व्यक्ति जाते त्यालाच ती दाहकता समजू शकते!

४. घरच्यांशी जुळवून न घेणे :

 

problem with in laws IM

 

एकमेकांच्या घरच्यांबद्दल गैरसमज करून घेणं किंवा एखादा पूर्वग्रह करून वागणं यामुळे नवरा बायकोच्या नात्यात एक वेगळीच दरी निर्माण होते. एकमेकांबद्दल वाटणारा आदर कमी होऊ लागतो.

घरच्यांशी जुळवून घेणं हा प्रॉब्लेम फक्त मुलीचा नसून, मुलांनाही त्यातून जावं लागतं. घरच्यांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांच्या मनाला पटेल अशी एखादी गोष्ट करतानासुद्धा बऱ्याच कुरबुरी होतात.

परिणामी याचंची रूपांतर घटस्फोटातच होतं. मुलाने मुलीकडच्या घरच्यांशी आणि मुलीने मुलाच्या घरच्यांशी जुळवून घेणं हे सध्या अत्यावश्यक आहे, कारण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही!

५. संवादाचा अभाव :

 

communication IM

 

सध्या प्रत्येक व्यक्ति ही आपापल्या कामात इतकी व्यस्त आहे की कुटुंबासाठी वेळ देणं किंवा आपल्या जोडीदाराला वेळ देणं हे खूप दुर्मिळ झालं आहे. जवाबदऱ्या आणि कामाचा लोडच इतका आहे की त्यातून खास वेगळा वेळ काढणं हे कठीण होऊन बसलं आहे.

यामुळे दोघांमधला संवाद बहुदा नाहीसाच होऊ लागला आहे. संवाद नाही त्यामुळे गैरसमज व्हायला आणखीनच वाव मिळत असल्याने दोघांच्या मनातली दरी आणखीनच वाढत आहे.

खरंच जर सध्या प्रत्येक जोडप्याने एकमेकांसाठी वेळ काढून संवाद साधला, समोरच्याचे प्रॉब्लेम जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर यामुळे वाढणारं घटस्फोटांचं प्रमाण नक्कीच कमी होईल!

हे सगळी प्रमुख कारणं या रिसर्चमध्ये तुम्हाला आणखीन विस्तृतपणे वाचता येतील!

या लेखात दिलेल्या माहीतीनुसार अमृता फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं तसं कारण तुम्हाला कुठेच आढळून येणार नाही. नातं टिकवण्यासाठी गरज असते ते समंजस वृत्तीची, मग बाकी शहरात कितीही ट्रॅफिक असो तुम्ही समंजस असाल तर तुम्ही तुमचं नातं घटस्फोटापर्यंत जाउच देणार नाहीत!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?