Site icon InMarathi

महाराष्ट्रातील असं गाव जिथे सकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतरच उघडतात सगळी दुकानं

bhilwadi village im2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लहानपणी शाळा भरायच्या आधी किंवा प्रार्थनेच्या वेळी राष्ट्रगीतासाठी उभे राहून ते संपल्यानंतर ‘भारत माता की जय’ म्हणताना जो राष्ट्राभिमान वाटायचा त्याला कशाचीच तोड नव्हती. राष्ट्रगीताची ती वेळ संपूर्ण वातावरण भारून टाकण्यासाठी पुरेशी असायची. आता मात्र तो अनुभव सहसा घेता येत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

महाराष्ट्रातील एका गावी मात्र रोज सकाळी नऊच्या सुमारास राष्ट्रगीताचा आवाज घुमतो. त्या गावाचे नाव आहे भिलवडी. राष्ट्रगीत सुरू होण्याआधी दिनविशेष सांगून एखादे गाणे वाजवून या कार्यक्रमाची सुरवात होते.

‘ व्यापारी आणि ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो.. आजचा दिनविशेष… आजच्या दिवसाची सुरुवात करुया या छानशा गीताने असे म्हणत घड्याळाचा काटा ९ वाजून १० मिनिटांवर येतो. त्यानंतर ‘ परेड सावधान.. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर.. ‘ अशी सूचना येते आणि हा आवाज भिलवडी मध्ये जिथपर्यंत पोहोचतो तेथील गावकरी सावधान स्थितीत उभे राहून राष्ट्रगान सुरू करतात. यावेळी आजूबाजूच्या छोट्या – मोठ्या वाहनांना देखील आपसूक ब्रेक लागून , वाहन चालक सुद्धा उस्फूर्तपणे याचा हिस्सा होतात.

 

 

राष्ट्रगीत संपलं, की सगळे ‘ भारतमाता की जय’ असा एकच जयघोष करतात आणि त्यानंतर देशाप्रती भावना व्यक्त करून आपल्या दिवसाची सुरवात करतात. दुकानदार आपले दुकान उघडतात आणि बाजारपेठा सुरू होतात.

राष्ट्रीय प्रेरणा घेऊन दुकानं उघडण्याची सुरवात नेमकी कधी पासून झाली? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. २०२० मध्ये आलेल्या कोविडच्या पहिल्या लाटेने आणि त्याला प्रतिबंध म्हणून केलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिक, छोटे – मोठे व्यावसायिक यांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला.

बाजारपेठा बराच काळ बंद असल्याने हवालदिल झालेले व्यावसायिक एकमेकांना धीर देत होते. व्यापाऱ्यांची होणारी ससेहोलपट लक्षात घेऊन ‘एकी मे ही नेकी है ‘ हे सूत्र लक्षात आल्याने गावातील सुमारे साडेचारशे छोटे – मोठे व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापारी संघटनेची स्थापना केली.

 

 

व्यापारांच्या न्याय्य हक्कांबरोबरच सामाजिक कामातही योगदान देण्याच्या हेतूने राष्ट्रगीताने दिवस सुरू करण्याचा उपक्रम राबविण्याची कल्पना मांडण्यात आली आणि एकमताने मंजूर झाल्याने १५ ऑगस्ट २०२० रोजी हा उपक्रम सुरू झाला.

एखाद्या शाळेच्या किंवा हायस्कूलच्या परिपाठा प्रमाणे भिलवडी गावाने हा उपक्रम अखंड चालू ठेवला आहे. या उपक्रमासाठी ‘पब्लिक अड्रेस सिस्टीम’ चा वापर केला जातो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रगीताचा उपक्रम सुरू केल्यापासून गावात भांडण – तंटे कमी होऊन एकोपा वाढला आहे. तसेच गावातील लोकांची काम करण्याची क्षमता आणि उत्साह यामध्ये सुद्धा लक्षणीय बदल झाला आहे.

भिलवडी गाव हे सांगली मध्ये असून कदाचित महाराष्ट्रातील हे एकमेव गाव असेल जिथे राष्ट्रीय गीताने दिवसाची सुरवात होते. हा सन्मान सांगलीकरांना मिळाला असून भिलवडी गावाची लोकप्रियता वाढत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version