' मोदी जॅकेट झाले, आता ज्या टोपीवरून चर्चा सुरु आहे ती टोपी नेमकी आहे कुठली? – InMarathi

मोदी जॅकेट झाले, आता ज्या टोपीवरून चर्चा सुरु आहे ती टोपी नेमकी आहे कुठली?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जसा देश तसा वेष अशी आपल्याकडे म्हण आहे, भारतासारख्या वैविध्यपूर्ण अशा देशात अनेक रूढी परंपरा अनेक वर्षांपासूनआपण जपत आलो आहोत. प्रत्येक राज्यांच्या संस्कृती वेगळी परंपरा वेगळी तरीदेखील आज देशातील प्रत्येकजण दुसऱ्याच्या संस्कृतीमध्ये आवर्जून सहभागी होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

उत्तर भारतातील लोक दक्षिणेत गेली की पुरुष मंडळी हमखास लुंगी नेसतात तर बायकांना दाक्षिणात्य साडी नेसण्याचा मोह आवरत नाही. पंजाबमध्ये गेल्यावर आपसूकच पगडी घातली जाते. इतर राज्यातील लोक जेव्हा आपल्या संस्कृतीचा, भाषेचा आदर करतात तेव्हा आपसुकूच लोकांना अभिमान वाटतो, बॉलीवूडची कलाकार मंडळी तोडकंमोडकं मराठीमध्ये बोलले तरी मराठी माणसू खुश होऊन जातो.

 

srk lungi dance inmarathi

 

देशाच्या पंतप्रधान मोदीजी देखील यात मागे नाहीत, कुठल्या ही राज्याच्या जनतेशी संवाद साधताना ते तिकडच्या भाषेतून सुरु करतात. जेणेकरून जनता देखील तितक्याच आवडीने त्यांचे भाषण ऐकते. मागच्या वर्षी बंगाल निवडुकांच्या वेळी त्यांनी टागोरांचा लूक केला होता त्या लूकची विशेष चर्चा झाली होती.

 

modi in bengal rally inmarathi

 

२६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोदींनी घातलेल्या टोपीची सध्या विशेष चर्चा सुरु आहे, यावरून त्यांना ट्रोल देखील केले जात आहे, मात्र आज आपण टोपीमागच नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेणार आहोत….

टोपी मागे दडलंय काय?

नरेंद्र मोदींनी घातलेल्या टोपीच कनेक्शन आहे थेट उत्तराखंड राज्याशी, होय उत्तराखंडमधील नागरिक ज्या पद्धतीची टोपी घालतात त्या परंपरेशी ही टोपी नक्कीच नाही. मात्र आता मोदींमुळे ही टोपी नक्कीच एक ट्रेंड बनू शकते. सध्या काही राज्यांच्या निवडणूका तोंडावर आहेत त्यात उत्तराखंड राज्य देखील आहे. त्यामुळे असे अंदाज लावले जात आहेत की बंगाल प्रमाणे आता मोदी उत्तराखंडच्या निवडणुकांसाठी हा लूक करत असावेत अशी चर्चा आहे. 

 

elections inmarathi
asiadialogue.com

 

टोपी शोधली कोणी?

खरं तर या टोपीचा जन्म आता नव्हे तर २०१७ साली झाला आहे. ही टोपी मसुरीमधील स्थानिक हस्तशिल्प कलाकार समीर शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने तयार केली आहे. उत्तराखंड स्थापन दिवसाच्या निमित्ताने त्यांनी २०१७ साली सर्वसामान्य जनतेसाठी ही विशेष टोपी बनवली आहे.

न्युज १८ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे म्हंटले आहे की गेल्या ५ वर्षात ८००० टोपीची विक्री झाली आहे. आणि आता खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी ही टोपी घातल्याने याला विशेष प्रसिद्धी मिळेल. तसेच उत्तराखंडमध्ये गढवाल भागात पांढरी किंवा काळी टोपी परिधान करतात मात्र आमच्या भागात अशी विशेष टोपी घातली जात नाही त्यामुळे आमच्या भागाची ओळख असलेली विशेष टोपी असावी म्हणून आमचा हा प्रयत्न आहे.

 

masoori im

टोपी मोदींपर्यंत कशी पोहचली?

डेहराडूनमधील एक युवकाच्या दुकानात त्याने ही टोपी विकायला ठेवली होती, या टोपीला ब्रह्मकमळ नाव दिले आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या नजरेत ही टोपी आल्याने त्यांनी याची चौकशी केली आणि या टोपीचे प्रमोशन करणार आहे असे देखील त्या दुकानदाराला सांगितले.

मंत्रीमहोदयांनी या टोपीबद्दल पंतप्रधान मोदींकडे माहिती पुरवली आणि २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणच्या कार्यक्रमात दस्तुरखुद्ध मोदींनी ही टोपी परिधान केली. आणि त्याचे फोतो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाले आणि या टोपीची चर्चा सुरु झाली.

 

cap im

 

आज बॉलीवूडच्या अभिनेत्यांपेक्षा मोदींनी एखादी गोष्ट किंवा एखाद वेष परिधान केला तर त्याची चर्चा जास्त होते, मोदींच्या जॅकेटची क्रेझ आजही कमी झालेली नाही. त्यामुळे एकूणच इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी काय क्लुप्त्या करतील हे काही दिवसात कळेलच…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?