आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मसाला डोसा हे नाव ऐकले की तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तसे तर डोसा हे दक्षिण भारतीय पदार्थ आहे, परंतु भारतात कुठल्याही भागात डोसा हा पदार्थ सामान्यतः सर्व खाद्यप्रेमींची पहिली पसंती असल्याचे आढळून येईल. जरी डोशाचे अनेक प्रकार असतील तरी मसाला डोसा हे बहुतेकांची पहिली पसंत असते.
कन्नड, तमिळ, तेलुगु, हिंदी, मराठी आणि गुजराती याप्रकारे कोणतीही भारतीय भाषा असू द्या, प्रत्येक भाषेत डोशासाठी एकच नाव आहे.
डोसा केवळ भारतामध्येच नाही तर श्रीलंका, मलेशिया आणि सिंगापूर या देशांमध्ये देखील खुप लोकप्रिय आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की मसाला डोसा हा पदार्थ नेमका कुठून आला आहे?
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
याबद्दल अद्याप कोणतीही अचूक माहिती उपलब्ध नाही. या विषयावर इतिहासकारांमध्ये देखील अनेक मत-मतांतर आहेत. इतिहासकार पी. थानाकप्पन यांच्या मते, याचा उगम कर्नाटक मधील उडुपी येथे झाले आहे, तर इतिहासकार के.टी.आचार्य म्हणतात की डोसाचा उल्लेख संगम साहित्यामध्ये आहे.
तसेच तामिळ डोसा हा जाडा आणि मऊ असतो तर कर्नाटकी डोसा हा कुरकुरीत आणि पातळ होता. डोशाचा उल्लेख १२व्या शतकातील संस्कृत विश्वकोश, मानसोल्लासमध्ये देखील आढळून येईल. हे साहित्य कर्नाटकच्या राजा सोमेश्वर तिसरे यांच्या काळात लिहिले गेले आहे.
● एका ब्राह्मणने बनवला होता पहिल्यांदा डोसा :
तसे तर आम्ही आधी सांगितलेच आहे की, डोशाचा शोध किंवा उत्पत्तीबद्दल अनेक मत-मतांतरे आहेत. एका रिपोर्टनुसार सांगितले जाते की, डोसा सर्वप्रथम कर्नाटकमध्ये बनवला गेला होता.
–
- इडली- सांबारमधील ‘सांबार’चे आरोग्यदायी लाभ तुम्हाला माहित आहेत का? वाचा
- तुमच्या रोजच्या आहारात ज्वारीची भाकरी का हवी हे पटवून देणारे ८ फायदे!
–
उडुपीमध्ये एका ब्राह्मणाचे धार्मिक कर्मकांडातून लक्ष विचलीत झाले होते आणि त्यावेळी त्याच्या मनात दारू पिण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. त्यामुळे त्याने तांदूळ शिजवून आणि नंतर कुजवून घरी दारू बनवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होऊ शकला नाही.
त्यामुळे त्याने नंतर हा तांदूळ अजुन बारीक केला आणि तव्यावर ठेवून त्याची पोळी बनवली. त्याकाळी मद्य आणि मांसाचे सेवन हे पाप कृत्य मानले जात होते. त्यामुळे या पदार्थाचे नाव ‘दोष’ वरुन डोसा असे पडल्याचे मानले जाते.
● म्हैसूरच्या राजाच्या स्वयंपाकघरात बनवला मसाला डोसा :
डोशाशी संबंधित अजुन एक कथा प्रचलित आहे. असे म्हणतात की एकदा राजाने म्हैसूर पॅलेसमध्ये एक उत्सव आयोजित केला होता. या उत्सवाच्या शेवटी भरपूर अन्न शिल्लक होते.
अन्नाची ही नासाडी पाहून राजाला अतिशय दुःख झाले होते. म्हणूनच त्याने आपल्या शाही स्वयंपाकींना यावर योग्य तोडगा काढायला सांगितले, मग त्यांनी उरलेल्या भाज्या मसाल्याच्या डोस्याबरोबर दिल्या आणि अशा प्रकारे मसाला डोसाचा शोध लागला.
● डोशाची अजुन एक विचित्र कहाणी :
जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी डोसा खाल्ले असेल तर तुम्ही बघितले असेल की काही ठिकाणी डोसा त्रिकोणी असतो तर काही ठिकाणी लांब असतो. तर काही डोसे वेगवेगळे सारण घालून ते सर्व्ह केले जाते.
आधी डोसा हा बटाट्याच्या भाजीसोबत दिला जायचा. त्याकाळी बहुतेक खानावळीमध्ये ब्राह्मणच जेवण बनवत असत. त्याकाळी ब्राह्मण लोक कांद्याला हातदेखील लावत नसत.
परंतु एकेकाळी राज्यात बटाट्याचा तुटवडा होता. या तुटवड्यानंतर बटाट्यात कांदा मिसळून भाजी केली गेली आणि हे कांदे लपवण्यासाठी त्यांनी ही बटाटा-कांद्याची भाजी लपवण्यासाठी डोसाच्या आतमध्ये सर्व्ह केली.
अशा प्रकारे नकळत मसाला डोसाचा शोध लागला. यानंतर बघता-बघता मसाला डोसा त्याच्या चवीमुळे इतका लोकप्रिय झाला की, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या सर्व लहान-मोठ्या हॉटेल्सच्या मेनूमध्ये आपल्याला मसाला डोसा आढळून येतो.
आज वेगवेगळ्या राज्यांमध्ये डोसा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. कुठे सांबार आणि चटणीबरोबर तर कधी इडली पोडी (मसाल्यांचे मिश्रण) सोबत दिले जाते.
हल्ली तर अनेक ठिकाणी चीज, चीज, चॉकलेट, आईस्क्रीम सर्वकाही डोशात भरायला सुरुवात झाली आहे. पण मसाला डोसा, सांबार आणि बदाम चटणीमध्ये जे आहे, ते इतर डोशात आपल्याला आढळणार नाही…!!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.