तिकीट मिळूनही दोन दिवसात काँग्रेस पक्ष सोडणारी महिला आहे तरी कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपण जनतेला दिलेली आश्वासनं किती पोकळ होती हे पुन्हा पुन्हा सिद्ध करूनसुद्धा दरवेळी निवडणुका आल्या की सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये आपल्या पक्षाचे उमेदवार जनतेचा कौल मिळवण्यात कसे यशस्वी होतील हे सांगण्याची चुरस रंगलेली दिसते.
यावर्षीच्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वडेरा यांनी ‘लडकी हू लढ सकती हू’ हे कॅम्पेन सुरू केलं खरं पण आता हे केवळ घोषणा देण्यापुरतंच मर्यादित राहील की काय अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
या मोहिमेद्वारे ४०% जागांवरती महिलांना काँग्रेस पक्षातर्फे तिकीट दिलं जाईल असं सांगितलं गेलं होतं आणि तसं ते दिलंदेखील जात आहे. मात्र इतर ४ राज्यांमध्येसुद्धा निवडणुका असूनही तिथे महिलांना ४०% सीट्स का दिल्या गेल्या नाहीत हे कळू शकलेलं नाही.
इतक्यातच एका काँग्रेस महिला उमेदवाराने काँग्रेसकडून तिकीट मिळाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात पक्ष सोडला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने विधानसभेच्या ८९ सीट्सवर उमेदवारांची घोषणा केली होती. त्यातल्या ३७ उमेदवार या महिला असल्याचं जाहीर केलं गेलं.
बदायू जिल्ह्यातून शेखपूर विधानसभेची सीट काँग्रेसने फराह नईम यांना दिली होती. मात्र फराह नईम आता ही निवडणूक लढवणार नाहीत. इतकंच नाही तर त्यांनी काँग्रेस पक्षदेखील सोडला आहे. काय आहे यामागचं नेमकं कारण?
पार्टीचे जिल्हाध्यक्ष ओंकार सिंग यांनी मुस्लिम महिलांना तिकीट मिळता कामा नये आणि तुम्ही चारित्र्यहीन आहात असं फराह नईम यांना म्हटल्याचा आरोप फराह यांनी ओंकार यांच्यावर केला आहे. फराह म्हणाल्या की, “प्रियांका गांधींमुळे त्या काँग्रेस पक्षात होत्या आणि यापुढेही त्या महिलांच्या हक्कासाठी लढत राहतील. पण ओंकार यांच्यासारख्या लोकांमुळे त्यांना पक्ष सोडावा लागत आहे.”
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक इतकी जवळ आलेली असताना ही गोष्ट पक्षासाठी नक्कीच लाजिरवाणी आहे. ANIशी बोलताना नईम म्हणाल्या, “पार्टीचं बदायूमधलं जे युनिट आहे तिथल्या महिला सुरक्षित नाहीत. उमेदवारीसाठी मी जे काम केलं, तिकीट मिळवण्यासाठी मी जो लढा दिला त्यापासून मला रोखण्यासाठी ओंकार सिंग यांनी माझी प्रतिमा मलीन केली आहे.
मुस्लिम महिलांना तिकीट मिळता कामा नये असं ते म्हणाले. काँग्रेसला समाजातल्या प्रत्येक विभागातून आणि समुदायाकडून मतं मिळण्याची गरज आहे. मी करत असलेल्या प्रयत्नांपासून मला रोखण्याची एकही संधी ओंकार यांनी सोडली नाही. त्यांनी मला धमकावलं. मला तिकीट मिळू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यामुळे ओंकार सिंगसारखी माणसं जर युनिटमध्ये असली तर मी निवडणूक लढणार नाही आणि मी काँग्रेस पक्षदेखील सोडते आहे.”
चारित्र्यहीनतेचा आरोप करण्याव्यतिरिक्त आणखीनही काही आरोप ओंकार सिंग यांनी फराह नईम यांच्यावर केले असल्याचं त्यांनी सांगितलं. ते त्यांच्या फार जिव्हारी लागले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याकडे जगण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत अशीही गोष्ट पसरवली गेली होती आणि त्यावर बऱ्याच चर्चा होत होत्या.
काहीही झालं तरी या अशा माणसांमुळे आपण अजिबात खचून जाणार नाही. काँग्रेस पक्ष जरी सोडला तरी आपल्या मनात प्रियांका गांधी वडेरा यांच्याविषयी आदर आहे असं त्या म्हणाल्या.
‘लडकी हू लढ सकती हू’ या मोहिमेसाठी त्यांनी प्रियांका गांधी यांचं कौतुक केलं. ही घोषणा एक महिला म्हणून आपल्याला खूप प्रेरणा देत असल्याचं सांगितलं. आपण पक्षात नसलो तरी याहीपुढे आपण महिलांच्या हक्कांसाठी लढत राहू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.
४०३व्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूका ७ फेजेसमध्ये होणार असून १० फेब्रुवारी पासून त्या सुरू होणार आहेत. फेब्रुवारीच्या १०,१४,२०,२३,२७ आणि मार्चच्या ३ आणि ७ या तारखांना ७ फेजेसमध्ये उत्तर प्रदेशात मतदान होणार आहे.
–
- जेव्हा २०० दलित महिलांनी भर कोर्टात एका नराधमाला यमसदनी धाडलं…
- काँग्रेसच्या ४० % महिला उमेदवारीच्या अजेंड्यावरून दिग्गज नेते पक्ष सोडत आहेत
–
कुणी म्हणेल पक्षाला बदनाम करण्यासाठी हे सगळं चाललंय तर कुणी या सगळ्यावर विश्वासही ठेवेल. मात्र प्रत्यक्षात काय घडलंय हे केवळ संबंधितांनाच माहीत. काही वाईट प्रवृत्तीच्या माणसांमुळे ज्यांना खरोखरच जनतेसाठी कार्य करण्याची आस आहे अशी माणसं दाबली जाऊ नयेत इतकीच आशा आपण करू शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.