वाईनला खरंच दारू म्हणावं का? वाद घालण्याआधी हा फरक समजून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दुकानांमधून वाईन विक्री होणार यावर बरीच मतमतांतरं झाली. काही जणांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काही जणांनी “शेवटी ती दारूच. हे योग्य झालं नाही.”, असं म्हटलं.
क्वचित दारू पिणं आणि दारूचं व्यसन असणं यात फरक आहे. दारूच्या आहारी न जातादेखील दारूचा आनंद घेत स्वास्थ्याची काळजी घेणारी अनेक माणसं आहेत. तरीही आवड म्हणून दारू प्यायला सुरुवात केली तरी त्याचं व्यसन कधी होईल सांगता येत नाही असं अनेकांचं मत असतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
दारूपासून स्वतःला पूर्णतः लांब ठेवणारे लोक, योग्य प्रमाणात दारूचा आस्वाद घेणारे लोक आणि दारूचं व्यसन लागलेले लोक असे तीन गट आपल्याला समाजात बघायला मिळतात.
आपल्या काही काही औषधांमध्येसुद्धा अल्कोहोलचा अगदी थोडासा अंश असतो. त्यामुळे दारूच्या काही प्रकारांचं योग्य प्रमाणत सेवन करणाऱ्यांना त्याचे काही फायदेही होतात. दारूचं अती सेवन करणारी माणसं यकृताच्या आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देत असली तरी कमी प्रमाणात दारू प्यायल्यामुळे अस्वस्थता आणि नैराश्य दूर करता येतं.
दारू पिण्याचं हे अजिबात समर्थन नसलं तरी ही बाब विचारात घेण्याजोगी आहे. आपण हमखास “वाईन म्हणजे दारू किंवा वाईन म्हणजे दारू नाही” ही दोनच उत्तर देतो आणि ऐकतो, पण वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती असतं, वाईन कशापासून बनते, कशी बनते याची तपशीलवार माहिती आपल्यातल्या अनेकांना असतेच असं नाही. त्यामुळे वाईनला खरंच दारू म्हणावं का हा वाद घालण्यापूर्वी जाणून घेऊया दारूचे इतर प्रकार आणि वाईनमधला फरक.
दारूमध्ये काही प्रमाणात इथॅनॉल असतं. आपल्याला वोडका, व्हिस्की, ब्रँडी, बियर, वाईन, जिन, टकिला अशी वेगवगेळ्या प्रकारच्या दारूंची नावं माहिती असतात, पण प्रत्येक दारूच्या प्रकारानुसार ती दारू बनवण्याची पद्धत, ती दारू बनवण्यासाठी लागणारे घटक आणि त्या दारुतल्या अल्कोहोलचं प्रमाण बदलत असतं.
अल्कोहोलचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे ‘अनडिस्टिल्ड ड्रिंक्स’चा ज्यात बियर, वाईन, हार्ड सायडर यांचा समावेश होतो. तर ब्रँडी, वोडका, टकिला, रम हे दारूचे प्रकार ‘डिस्टिल्ड ड्रिंक्स’ या दुसऱ्या प्रकारात समाविष्ट होतात.
—
- ज्यावरून एवढं राजकारण तापलंय, त्या वाईनचे आरोग्यासाठी असलेले फायदे जाणून घ्या
- जागा २० एकर, टर्नओव्हर ५०० कोटी, जगप्रसिद्ध भारतीय वाईन ब्रॅंडची कथा!
—
‘अनडिस्टिल्ड ड्रिंक्स’ या प्रकारात मोडणारी वाईन ही फळं आंबवून बनवली जाते आणि त्यानंतर पिंपासारख्या उपकरणात वाईनची वर्षानुवर्षे साठवणूक केली जाते. वाईन जितकी जुनी तितकी ती अधिक चांगली असं म्हटलं जातं. दारूच्या इतर प्रकारांपासून आपण वाईनला वेगळं करतो तेव्हा बरेच फरक आपल्या लक्षात येतात.
इतर दारू फळांव्यतिरिक्त धान्यं आणि इतर अन्नपदार्थांपासूनही बनतात, पण वाईन ही नेहमीच फळांपासून बनवली जाते. द्राक्षं, सफरचंद, कॅनबेरीज, मनुका, डाळिंबं ही फळं आंबवून त्यापासून वाईन बनवली जाते.
फळांमधली साखर तशीच राहावी म्हणून त्यात यीस्ट घातलं जातं आणि नंतर ते इथॅनॉल, कार्बन डायऑक्साइड आणि उष्णतेत रूपांतरित केलं जातं. वेगवेगळ्या फळांनुसार वेगवेगळ्या प्रकारची वाईन तयार होते. बाकी प्रकारच्या दारू उकळून शुद्ध करून, मग थंड करून आणि आंबवून अशा दोन्ही प्रकारे बनवल्या जातात. मात्र वाईन नेहमीच केवळ फळं आंबवून बनवली जाते.
बाकी दारूच्या प्रकारांच्या मानाने वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण बरंच कमी असते. वाईनमध्ये साधारतः १४ ते १५ % अल्कोहोल असतं. वाईनच्या प्रकारानुसार वाईनमधलं अल्कोहोलचं प्रमाण खालीवर होतं.
पोर्ट वाईन, शेरी वाईन, मडेरा वाईन, मार्सला वाईन इत्यादी काही वाईन प्रकारांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण २०% असतं. वर्षानुवर्षे साठवणूक करताना वाईनमधल्या अल्कोहोलचं प्रमाण बदलत जातं. असे वेगवेगळे प्रकार असले तरी वाईन मुख्यतः ‘रेड वाईन’ आणि ‘व्हाईट वाईन’ या दोन प्रकारात विभागली जाते.
लाल आणि काळी द्राक्षं कुस्करून, ती काही आठवडे आंबवून त्यापासून रेड वाईन बनवली जाते तर पांढऱ्या द्राक्षांची सालं आणि त्यातल्या बिया काढून टाकून, त्याचा गर यीस्ट मध्ये घोळवून पिंपासारख्या उपकरणात ते काही आठवडे साठवून त्यापासून व्हाईट वाईन बनवली जाते.
या दोन्ही वाईन्स अतिशय चवदार असतात आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि मधुमेहाचा होणं टाळण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. बाकी दारूंच्या प्रकारांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे नशा चढावी म्हणून बाकी प्रकारच्या दारू प्यायल्या जातात. मात्र वाईनचे वेगवेगळे फ्लेवर्स ही तिची खासियत आहे.
चविष्ट फ्लेवर्स चाखण्यासाठी वाईन जगभर आवडीने प्यायली जाते. अल्कोहोलचं प्रमाण फार कमी असल्यामुळे वाईन सहसा चढत नाही. त्यामुळे आरामात गप्पाटप्पा करायच्या असतील तर लोक हमखास वाईनचा आनंद घेतात.
डिस्टिल्ड ड्रिंक्समधलं अल्कोहोलचं प्रमाण पाहू.
१. रम – आंबवलेल्या उसापासून रम बनवली जाते. त्यात अल्कोहोलचं प्रमाण ४०% असतं. परंतू अनेक अतिरंजित रम्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण ६० ते ७० % असतं.
२. टकिला – मॅक्सिन एगेव या वनस्पतीपासून बनवल्या जाणाऱ्या टकिलामध्ये अल्कोहोलचं प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत असतं.
३. जिन – जुनिपर बेरीपासून जिन बनवली जाते. त्यात ३५ ते ५५ % अल्कोहोल असतं.
४. व्हिस्की – आंबलेल्या धान्यांपासून बनवलेल्या व्हिस्कीत अल्कोहोलचं प्रमाण ४० ते ५० % असतं.
५. वोडका – तृणधान्ये आणि बटाट्यापासून वोडका बनवला जातो. त्यात ४० टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असतं.
६. ब्रँडी – ब्रॅन्डीमध्ये अल्कोहोलचं प्रमाण ३५ ते ६० % असतं.
आजही एखादी व्यक्ती दारू पिते म्हटल्यावर सगळ्यांचं त्या व्यक्तीविषयी चांगलं मत असतंच असं नाही. वेगवेगळ्या दारूच्या प्रकारामधलं अल्कोहोलचं प्रमाण पाहिल्यावर त्यामानाने वाईन बरीच सौम्य असल्याचं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे वाईनला दारू म्हटलं तरी त्यावर किती वाद घालायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved..