' अमिताभसारखा वेष करून रेखाच्या आसपास असणारी ही ‘खास’ व्यक्ती नक्की आहे तरी कोण? – InMarathi

अमिताभसारखा वेष करून रेखाच्या आसपास असणारी ही ‘खास’ व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एक जिवंत अख्यायिका म्हणजेच रेखा! अनेक रहस्यमय घटनांनी भरलेलं रेखाचं आयुष्य फिल्मी कथांहून कमी नाही.

राज बब्बरपासून विनोद मेहरापर्यंत जिचं नाव जोडलं गेलं आणि असफल प्रेमकहाण्यांना जन्म मिळाला ती रेखा! इंडस्ट्रीबाहेरील उद्योगपतींशी लग्न करून ते अयशस्वी झालेली शापित सुंदरी म्हणजे रेखा!

 

rekha inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

रेखाची ओळख तिच्या अभियन आणि सौंदर्याबरोबरच तिच्या असफल प्रेमकहाण्या, लग्नं आणि अमिताभशी जोडल्या गेलेल्या नावामुळेही आहे. प्रेमकथांत हिर रांझा, रोमिओ ज्युलिएट, पडद्यांवर राज- सिमरन तर वास्तव आयुष्यात रेखा-अमिताभ यांची असफल प्रेमकहाणी आजही चर्चेचा विषय ठरते.

आजही एखाद्या समारंभात अमिताभ आणि रेखा एकाच वेळेस उपस्थित असतील तर कॅमेर्‍यांचे फ्लॅश चमकल्याविना रहात नाहीत. अमिताभ आणि जयाचा संसार आता आजीआजोबा आणि लवकरच पतवंडांपर्यंत येऊन पोहोचेल पण रेखा नावानं अजूनही या दोघांतली काबीज केलेली जागा सोडलेली नाही. अमिताभ-रेखाचं प्रेम सफल होऊ शकलं नाही म्हणून आजही तिसर्‍या पिढीतले हळहळणारे फॅन्स बघितले की लार्जर दॅन लाईफ काय असतं हे समजतं.

 

amitabh rekha inmarathi
timesofindia.com

या सगळ्याच्या बरोबरीनं आणखी एक रहस्य रेखाच्या सोबत गेली अनेक वर्षं आहे. रेखाची सावली असणरी एक व्यक्ती गेली अनेक वर्षं रेखाच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी दिसते. कुठेही रेखा एकटी दिसणं अशक्य, ही व्यक्ती कायम तिच्यासोबत असते.

पुरुषी पेहराव असणार्‍या या व्यक्तीचं नाव आहे,’फरजाना’! रेखाच्या बरोबरीन फरजाना ही एक जिवंत अख्यायिका बनली आहे. मात्र ही फरजाना नेमकी कुठली? तिची कौटुंबिक पार्श्वभुमी काय? हे आजपर्यंत एक गुपितच राहिलं आहे.

ऐंशीच्या दशकात यश चोप्रांच्या सिलसिला चित्रपटाच्या सेटवर या दोघींची प्रथम भेट झाली. फरजाना रेखाची हेरस्टाइलिस्ट होती.

 

farzana rekha im

 

या दोघींत मैत्रीपूर्ण संबध निर्माण झाले. रेखा फरजानावर डोळे झाकून विश्वास ठेवू लागली आणि हेअरस्टाईस्लिस्टवरून रेखाची खाजगी सहाय्यक अशी तिला बढती मिळाली. त्यानंतर अगदी ‘दो जिस्म एक जान’ अशा या दोघी एकत्र दिसू लागल्या.

रेखाची प्रतिमा स्वतंत्र विचारांची आणि हेडस्ट्रॉन्ग अशी असली तरिही फरजानाचं तिच्यावर पूर्ण नियंत्रण असल्याचं रेखाला जवळून ओळखणार्‍यांचं मत आहे. रेखा आणि इतर जग यांमध्ये फरजाना एका अदृष्य भिंतीसारखी कायम उभी असते. फरजानामुळे रेखापर्यंत पोहोचणं जवळपास अशक्य आहे.

तुम्हाला रेखाची मुलाखत घ्यायची असो की रेखाला एखाद्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करायचं असो रेखाशी बोलण्यापूर्वी तुम्हाला आजही फरजानाशी आधी बोलावं लागतं, तिची परवानगी असेल तरच रेखा तुमच्याशी बोलते. रेखा फरजाना सोल सिस्टर असं संबोधत असली तरिही या दोघींच्या संबंधाबाबत इंडस्ट्रीत आणि बाहेर कायम संशयानं पाहिलं गेलं आहे.

 

rekha im

 

 

रेखा किंवा फरजाना या दोघींनीही कधीही हे संशयाचे ढग बाजूला केले नाहीत. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना असं म्हणत या दोघींनी आपल्या संबंधांबाबत मौनच पाळलं आहे.

मुकेश अगरवाल या रेखाच्या पतीनं रेखाचा दुपट्टा गळ्याभोवती आवळून आत्महत्या केली आणि रेखा नॅशनल व्हॅम्प बनली. तिला डायन म्हणून संबोधलं जाऊ लागलं. खचलेल्या रेखानं स्वत:चा घरात कोंडून घेतलं. आता रेखा संपली असं सगळ्यांचं एकमत झालं होतं. या संपूर्ण काळात एकमेव व्यक्ती तिच्यासोबत होती, जी दिवसरात्र रेखासोबत सावलीसारखी रहात असे ती म्हणजे फरजाना.

 

rekha 1 im

 

तीन गोष्टी या जोडीबाबत कायम चर्चेच्या आहेत, पहिली म्हणजे या दोघी कधीही अधिकृतरित्या कॅमेरासमोर येत नाहीत. तीन दशकांहून सावलीसारखी एकत्र राहूनही फरजाना आजही मिडीयासमोर आला की अलगद बाजूला जाऊन उभी रहाते. तोंडातून एक शब्दही कधी ती उच्चारताना दिसत नाही,

या दोघींचे जितके फोटो आहेत ते त्यांच्या नकळत गर्दीत घेतलेले आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे फरजानाचं कायम पुरुषी पेहरावात वावरणं, तिची हेअरस्टाईल या सगळ्याचं अमिताभच्या स्टाईलशी असणारं साधर्म्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे रेखाच्या भांगाता कायम सिंदुर असणं.

 

rekha farzana im

 

फरजाना ही नेमकी कोण आहे? याचा शोध आजच्या सुपरफास्ट मिडिया आणि शोध पत्रकारितेलाही लागलेला नाही हे एक आश्चर्यच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?