Site icon InMarathi

आधी वाद नामकरणावरून आणि आता तिरंग्यावरून, वादग्रस्त जिना टॉवरबद्दल…

jinnah im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वास्तू आणि त्याचे नामकरण हा वाद आपल्याकडे नवीन नाही, औरंगाबाद शहराचे नामकरण करून  संभाजीनगर करावे अशी मागणी सतत होत असते. गेल्या कित्येक वर्षांपासून हा प्रश्न तसाच चिघळत पडलेला आहे. राजकारणी देखील आपल्या सोयीनुसार हा मुद्दा वापरत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज भारतात अनेक मुघलकालीन वास्तू आहेत जे पाहण्यासाठी देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात. मुघलकालीन वास्तुकला त्यातील कोरीव काम हे बघण्याचे विशेषण असते. आज उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने हळूहळू जिथे जिथे मुघलकालीन नावे असलेल्या गोष्टी आहेत मग त्यात शहर जरी असले तरी त्याचे नामकरण केले आहे.

 

 

उत्तर प्रदेशमध्ये नामकरण होत आहेच मात्र सध्या आंध्रप्रदेश राज्यातील जिना टॉवरवरून चांगलेच राजकारण तापलेले दिसून येत आहे, नेमकं काय आहे भानगड चला तर मग जाणून घेऊयात….

जिना टॉवर :

आंध्र प्रदेश गुंटूर भाग आज शिक्षण क्षेत्रात बरीच प्रगती करताना दिसून येत आहे. प्रामुख्याने तंबाखूजन्य पदार्थ आणि कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते, तसेच लाल मिरचीचे आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट आहे, अशा या लाल मिरचीच्या सर्वाधिक खप असलेल्या भागात जिना टॉवरने एक वादाची फोडणी टाकली आहे.

 

 

गुंटूर शहरात एक स्वातंत्र्यपूर्व कालीन वास्तू आहे जिचं नाव आहे जीना टॉवर, गेल्या काही दिवसांपासून हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता कारण भाजपने आणि इतर हिंदू संघटनांनी या स्मारकरचे नामकरण करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यातच गुंटूर महानगरपालिकने काल म्हणजे मंगळवारी १ फेब्रुवारी रोजी या टॉवरची भारतीय राष्ट्रधव्जच्या रंगात रंगरंगोटी करून त्या भोवताली कुंपण घातले आहे.

 

जिना टॉवरचा इतिहास :

जिना टॉवर हा गुंटूर शहरातील एक प्रमुख वास्तूंपैकी आहे, जो महात्मा गांधी रोडवर स्थित आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधला गेलेला हा टॉवर ६ खांबांवर उभा आहे त्यातील एक घुमटासाठी उघडला जातो.

काही इतिहासकारांच्या मते जिना यांचे प्रतिनिधी लिकायात खान यांनी गुंटूर शहराला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ स्थानिक मुस्लिम नेते लाला जन बाशा यांनी हा टॉवर बांधला आहे. भारत पाक संघर्ष असूनसुद्धा एक समरसतेचे प्रतीक म्हणून याकडे बघितले जाते.

 

 

महापौरांचे काय म्हणणे आहे?

गुंटूर महानगरपालिकेवर सध्या YSRCP पक्षाची सत्ता आहे, महापौर कवती मनोहर नायडू असे म्हणाले की हा टॉवर हे स्वातंत्र्य चळवळीचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच याला पांढरा भगवा आणि हिरवा रंग देण्यात आला आहे. या टॉवरची रंगरंगोटी करण्याचा प्रस्ताव अनेकवेळा आला आहे.

 

 

भाजपकडून या टॉवरच्या नामकरणाला मोठ्या प्रमाणावर विरोध होतच आहे तसेच त्याऐवजी अब्दुल कलाम किंवा तेलगू भाषेतील एखाद्या प्रतिष्ठती व्यक्तीचे नाव दिले गेले पाहिजे, गुंटूर भागातील प्रसिद्ध कवी गुरुराम जासुहा यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर YSRCP पक्ष या वास्तूकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून बघत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version