' वारलेले नातेवाईक तुमच्या स्वप्नात येत असतील तर ‘हा’ असतो त्या स्वप्नाचा अर्थ.. – InMarathi

वारलेले नातेवाईक तुमच्या स्वप्नात येत असतील तर ‘हा’ असतो त्या स्वप्नाचा अर्थ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या सगळ्यांनाच झोपल्यावर स्वप्नं पडतात. कित्येकदा आपण उठल्यावर ती स्वप्नं विसरून जातो पण एखादं स्वप्न उठल्यावरही किंवा अगदी पुढचे २-३ दिवसही आपल्या लक्षात राहतं. स्वप्नात आपण नेमकं काय बघितलंय यावर ते अवलंबून असावं.

असं म्हणतात की आपल्या मनात जे विचार चाललेले असतात तेच बऱ्याचदा स्वप्नात दिसतात. बऱ्याचदा आपल्याच मनातली एखादी भीती, एखादं शल्य दाखवणारं काहीतरी स्वप्नात घडतं.

 

indian guy sleeping IM

 

आपण आनंदात असलो तर आपल्याला आनंदी स्वप्नं पडतात. पण प्रत्येकवेळी फक्त आपल्या मनात जे विचार असतात त्यानुसारच आपल्याला स्वप्नं पडतात असं नाही. कधीतरी अचानक आपण आपल्या आता संपर्कातच नसलेल्या एखाद्या व्यक्तीलाही स्वप्नात पाहतो. त्या व्यक्तीशी बोलतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखादा जुना मित्र किंवा जुनी मैत्रीण अचानक स्वप्नात दिसते. उठल्यावर ते स्वप्न लक्षात राहीलं तर आपल्याला कधी आश्चर्य वाटतं तर कधी गंमत. आपल्या कुटूंबातली जिवंत असलेली अगदी जवळची व्यक्ती वारली आहे असंही स्वप्न पडून काही जणांना घाबरायला होतं.

तर काही वेळा आपले जे नातेवाईक किंवा इतर जवळची मंडळी वारली आहेत तीसुद्धा आपल्या स्वप्नात येतात. आपल्या संस्कृतीत वारलेल्या नातेवाईकांच्या श्राद्धाला जर कावळा पिंडाला पटकन शिवला तर त्या व्यक्तीचा आत्मा आता समाधानी आहे असं आपण समजतो.

पण कधीकधी कावळा पिंडाला पटकन शिवत नाही त्यावेळी त्या व्यक्तीचा आत्मा अतृप्त राहिला आहे असं आपण म्हणतो. पण वारलेले नातेवाईक स्वप्नात दिसण्यामागे काही अर्थ असतो की नाही हे आपल्याला माहीत नसतं.

 

crow IM

 

वारलेले नातेवाईक जर आपल्या स्वप्नात येत असतील तर त्याचा नेमका अर्थ काय होतो याचा स्वप्न शास्त्राने फार रंजक पद्धतीने उलगडा केला आहे. आपल्या सगळ्यांना हे जाणून घ्यायची नक्कीच उत्सुकता असेल.

मरण पावलेली माणसं जागेपणी आपल्याशी संपर्क साधू शकत नाहीत म्हणून ती आपल्या स्वप्नात येतात असा समज आहे. असं समजलं जातं की, जर तुमच्या जवळची वारलेली एखादी व्यक्ती तुमच्या स्वप्नात पुन्हा पुन्हा येत असेल तर ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगू पाहतेय. अशा प्रकारचं स्वप्न हे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवा बदल घडणार असल्याचं सूचित करतं.

वारलेले नातेवाईक स्वप्नात येण्यामागे काही मानसशास्त्रीय आणि अध्यात्मिक कारणंही असू शकतात. कधीकधी आपल्या जवळच्या वारलेल्या काही व्यक्तींबाबत आपल्या मनात काही शल्यं, दुःख, पश्चात्ताप असतात. त्यामुळेही ही वारलेली जवळची माणसं आपल्या स्वप्नात येतात.

काही काही माणसांना अनैसर्गिकरित्या मरण आलेलं असतं, काही जणांचा अकाली मृत्यू झालेला असतो तर काही वेळा वारलेल्या माणसांचे अंत्यविधी व्यवस्थित पार पाडले गेलेले नसतात. अशा वेळेस ‘क्लोजर’ मिळवायला अशी माणसं आपल्या स्वप्नात येतात.

 

dead people dream IM

 

जे म्हातारपणी मरतात त्यांची मरणाची मानसिक तयारी झालेली असते. पण ज्यांचा अकाली मृत्यू होतो त्यांचे आत्मे अस्वस्थ राहू शकतात.

काही वेळा अकाली मृत्यू झालेल्यांच्या जिवंतपणीच्या काही इच्छा पूर्ण व्हायच्या बाकी असतात. म्हणूनही आपल्याकडून मदत मिळावी म्हणून ती माणसं आपल्या स्वप्नात येतात.

जर आपल्या घरातलं कुणी मरण येण्यापूर्वी आजारी असेल आणि ती व्यक्ती वारल्यानंतर आपल्याला ती व्यक्ती ठणठणीत बरी आहे असं स्वप्न पडलं तर त्या व्यक्तीचा एका चांगल्या ठिकाणी पुनर्जन्म झालाय, आता ती व्यक्ती आनंदात आहे असा त्याचा अर्थ होतो. आपणही आता आनंदात राहावं असं ती व्यक्ती आपल्याला सांगत असते.

जर एखादी व्यक्ती मरण्यापूर्वी चांगली सुदृढ असेल आणि स्वप्नात मात्र जर ती तुम्हाला आजारी दिसली तर याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीची काहीतरी इच्छा बाकी उरली आहे आणि ती तुमच्याद्वारे पूर्ण व्हावी असं त्या व्यक्तीला वाटतंय.

कधी कधी आपल्या जवळची वारलेली माणसं आपल्या स्वप्नात येऊन आपल्या आयुष्यात पुढे जे संभाव्य धोके येऊ शकतात त्याविषयी आपल्याला सावध करत असतात.

dead dreams IM

 

आपले वारलेले नातेवाईक जर आपल्याला स्वप्नात दिसले पण ते आपल्याशी स्वप्नात काही बोलले नाहीत तर याचा अर्थ असा होतो की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण करतोय त्याविषयी ते आपल्याला समज देत आहेत. अशा वेळी ते काय सांगत आहेत याकडे आपण नीट लक्ष दिलं पाहिजे.

काही वेळा, वारलेली व्यक्ती आपल्या स्वप्नात येऊन आपल्याकडे काहीतरी मागते. अशा वेळी स्वप्नात ज्या गोष्टी त्या व्यक्तीने आपल्याकडे मागितलेल्या असतात त्या आपण गरजूंना दान केल्या पाहिजेत.

काही जणांचे वारलेले नातेवाईक त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांना आशीर्वाद देतात. अशा वेळी त्या व्यक्ती जे कुठलं काम करण्याचा विचार करत असतील त्यात त्यांना यश मिळेल याचा तो संकेत असतो.

काही वेळा आपल्या जवळची जिवंत असलेली काही माणसं सुद्धा वारली आहेत अशी विचित्र स्वप्नं आपल्याला पडतात. जिवंत असलेली व्यक्ती स्वप्नात वारलेली दिसणं हा ती व्यक्ती जास्त वयापर्यंत जगेल याचा संकेत असतो आणि ते शुभदेखील मानलं जातं.

 

dead body IM

 

तुमच्या जवळची वारलेली एखादी व्यक्ती जर स्वप्नात तुमच्यावर चिडली असेल तर अशा वेळी तुम्ही मनातल्या मनात त्या व्यक्तीला शरण गेलं पाहिजे.

लक्षात राहिलेल्या अशा स्वप्नांचे अर्थ जाणून घेण्याचं कुतूहल आपल्याला असतं. पण त्याकडे फारसं लक्ष न देता आपण आपलं आयुष्य जगत राहतो. काही काही माणसांना तर स्वप्नच पडत नाहीत म्हणे!

अशा माणसांच्या गाढ झोपेचा हेवा वाटून घ्यावा की स्वप्नांमागचे गूढ अर्थ जाणून घेण्याच्या आनंदाला ते मुकतात असं वाटून घ्यावं कळत नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?