' रोनाल्डोच्या कट्टर फॅन्सला देखील माहित नसलेल्या १५ गोष्टी… – InMarathi

रोनाल्डोच्या कट्टर फॅन्सला देखील माहित नसलेल्या १५ गोष्टी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

क्रिस्टीयानो रोनाल्डो जगातील टॉप फुटबॉल खेळाडू आहे. त्याच्या यशाला नशिबाचा खेळ समजू नका. खूप कष्ट, व्यासंगाने रोनाल्डोने या खेळात प्राविण्य कमावले आहे. त्याचा खेळ पाहताना एखादी अद्भुत गोष्ट पाहत असल्याचा भास होतो.

अश्या या मेहनती खेळाडूबद्दल जाणून घेऊया तुम्हा-आम्हाला माहित नसलेल्या काही गोष्टी!

 

ronaldo-marathipizza01

 

१) क्रिस्टीयानो रोनाल्डोचे पूर्ण नाव क्रिस्टीयानो रोनाल्डो दोस सेंटोस अवेइरो आहे. फेसबुकवर रोनाल्डोच्या पेजला १० कोटीपेक्षा अधिक लोक फॉलो करतात.

 

२) रोनाल्डो हवेमध्ये उंच उडी मारण्यात अगदी निपुण आहे. खेळाच्या मध्ये तो 5G (५ पट गुरुत्व बळ) च्या शक्तीने उडी मारतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर तो एका चित्याच्या उडीच्या ५ पट क्षमतेने मोठी उडी मारतो.

 

३) रोनाल्डोने आपल्या शरीरावर कोणताच टॅटू गोंदवलेला नाही. याचे कारण हे आहे की तो वर्षभरात अनेक वेळा रक्तदान करतो. त्यामुळे टॅटू करताना चुकून आपल्या रक्तात काही संक्रमण होऊ नये आणि त्याचा परिणाम आपल्या रक्तावर आणि शरीरावर होऊ नये म्हणून तो ही काळजी घेतो.

 

४) रोनाल्डोच्या वडिलांचा मृत्यू दारूच्या व्यसनामुळे झाला होता. त्यामुळे रोनाल्डो दारू आणि सिगारेटला हात सुद्धा लावत नाही. तसेच या व्यसनामुळे आपल्या खेळावर परिणाम होईल अशी त्याला भीती आहे.

 

ronaldo-marathipizza02

===

हे ही वाचा – इकडे रोनाल्डोने ‘नुसती बाटली सरकवली’ आणि तिकडे थेट “शेयर्सचे भाव” कोसळले…

===

५) फुटबॉल जगतातील सर्वोच्च पुरस्कार FIFA Ballon d’0r रोनाल्डोला ४ वेळा मिळाला आहे. रोनाल्डो European Golden Shoe awards ४ वेळा मिळालेला एकमात्र खेळाडू आहे.

 

६) क्रिस्टीयानो रोनाल्डोची कमाई ऐकून भल्या भल्यांना घाम सुटेल. क्रिस्टीयानो रोनाल्डो प्रत्येक ४८ तासांत जवळपास ८ कोटी रुपये कमावतो.

 

७) रोनाल्डो इतिहासातील एकमेव खेळाडू आहे, ज्याने ६ वर्ष सलग प्रत्येक हंगामात ५० पेक्षा जास्त गोल केले आहेत.

 

८) रोनाल्डोच्या फ्री किकचा वेग ताशी १३० किलोमीटर असते, म्हणजे १ सेकंदात ३१ मीटर. हा वेग अपोलो ११ रॉकेटच्या लॉचिंग वेगापेक्षा ४ पट जास्त आहे.

 

ronaldo-marathipizza03

 

९) तंदुरुस्त शरीराच्या क्रिस्टीयानो रोनाल्डोच्या शरीरामध्ये फक्त १०% फॅट्स आहेत. रँपवर कॅटवॉक करणाऱ्या सामान्य मॉडेलच्या शरीरात देखील १३.८% फॅट्स असतात.

 

१०) रोनाल्डो जेव्हा १५ वर्षाचा होता, तेव्हा त्याला हृदयाचा एक आजार असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी सांगितले होते की, हे आजारपण त्याच्या करियरला पूर्णविराम ठरू शकणार होते. पण देवाच्या कृपेने त्या आजारावर यशस्वी इलाज करण्यात आला आणि लेझर सर्जरी नंतर रोनाल्डो पूर्णपणे ठीक झाला.

 

११) नोव्हेंबर २०१२ मध्ये रोनाल्डोने आपला २०११ ला जिंकलेला गोल्डन बूट अवॉर्डचा लिलाव केला. लिलावात मिळालेले १.५ मिलियन युरो त्यांनी गाझा शहरातील मुलांच्या शाळेच्या निर्माणासाठी दान केले.

 

ronaldo-marathipizza04

===

हे ही वाचा – रोनाल्डोकडून एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही बरंच काही शिकण्यासारखं आहे

===

१२) तरुण असताना रोनाल्डो फुटबॉलचा सराव करताना पायांवर वजन बांधून खेळत असत. त्याला वाटायचे की, या पद्धतीमुळे त्याचा खेळ चांगला होईल.

 

१३) आपल्या वेट ट्रेनिंग सत्रामध्ये रोनाल्डो जवळपास एकूण २३,०५५ किलो वजन उचलतो. एवढे वजन जवळपास १६ Toyota Prius कारच्या वजनाइतके असते. फुटबॉलच्या एका सत्रात रोनाल्डो कोणत्याही ऑलिंपिक धावपटूच्या तुलनेत ९०० पट जोरात पळतो.

 

१४) रोनाल्डोचा जन्म ५ फेब्रुवारी १९८५ मध्ये पोर्तुगलच्या Madeira शहरात झाला होता. त्याचे वडील अमेरिकन राष्ट्रपती रोनाल्ड रीगनचे चाहते होते, यामुळे त्यांच्या नावावर रोनाल्डोचे नाव ठेवण्यात आले.

 

रोनाल्डोचे वडील माळी म्हणून काम करायचे आणि त्यांची आई कुक होती. ४ भावा-बहिणींमध्ये रोनाल्डो सर्वात लहान होता, त्याला मोठा एक भाऊ आणि दोन बहिणी होत्या.

 

१५) रोनाल्डोचे वजन ८० किलो आणि लांबी ६ फुट १ इंच आहे, क्रिस्टीयानो रोनाल्डोच्या मुलाचे नाव क्रिस्टीयानो रोनाल्डो जुनिअर आहे.

 

ronaldo-marathipizza05

 

जर तुमचा एखादा मित्र कट्टर रोनाल्डो फॅन असेल तर त्याच्या सोबत ही माहिती नक्की शेअर करा!

===

हे ही वाचा –  फुटबॉल किंग मेस्सीबद्दलच्या तुम्हाला माहित नसलेल्या गोष्टी!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?