Site icon InMarathi

बजेटनंतर या शेअर्सचे भाव वधारणार, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहेत का हे शेअर्स?

share prices IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोदी सरकारने काल यंदाचं बजेट जाहीर केलं आणि संमिश्र प्रतिक्रियांनी सोशल मिडीयावर चर्चा रंगू लागल्या. काहींचा अपेक्षाभंग झाला तर काहींनी विशेष तरतुदींचं स्वागत केलं.

क्रिप्टो करन्सीवर लागू केलेला कर, 5 जी ची घोषणा यांसारख्या अनेक निर्णयांमुळे येत्या वर्षात देशाचा जीडीपी वधारेल अशी आशा व्यक्त केली जात असतानाच शेअर मार्केटमध्ये मोठी उलथापालथ होणार असा अंदाजही तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली असतानाच तुम्हालाही यामध्ये नफा कमावण्याची संधी आहे. अर्थात या शेअर्सची निवड करताना तुम्ही अत्यंत सजग असणे गरजेचे आहे.

दरवर्षी बजेटनंतर शेअरबाजाराची समीकरणं बदलतात, त्यामुळे यंदाही वर्षभरात कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी? कोणत्या शेअर्सवर विसंबून रहावे? याची माहिती घेत गुंतवणूक केलीत तर येत्या वर्षात तुमचा बॅंकबॅलन्स वाढणार हे नक्की…

 

NH websites

 

जाणून घ्या काय सांगतंय यंदाचं बजेट

वाहतुक आणि परिवहन

यंदाच्या बजेटमध्ये परिवहन आणि वाहतुक या विषयासंदर्भात सर्वात जास्त घोषणा करण्यात आल्या. देशभरात मेट्रोचे जाळे, त्यासह तीन वर्षात ४०० हून अधिक वंदे भारत ट्रेन्सची सुरुवात, नव्या रस्त्यांची निर्मिती यांसारख्या घोषणांमुळे या क्षेत्राशी निगडित कंपन्यांचे दर यंदा वधारणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

 

यंदा L&T, GMR Infra, Container Corporation आणि IRCTC या स्टॉक्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी दिसू शकते.

टेलिकॉम 

5 जी सेवेची सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा काल निर्मला सितारामन यांनी केली. त्यासह यंदा स्पेक्ट्रमचा लीलाव करण्यात येणार आहे. सरकार देशामध्ये डेटा स्टोरेजसाठीदेखील प्रोत्साहन देऊ शकते. या निर्णयामुळे टेलिकॉम क्षेत्रातील स्टॉक वधारू शकतात.

 

 

त्यामुळे टेलिकॉम क्षेत्रात गुंतवणूक करत असाल तर ते फायद्याचे ठरू शकते.

EV सेक्टर 

इलेक्ट्रीक वाहनांसाठी अर्थसंकल्पात धोरण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये बॅटरींची अदलाबदल करण्याच्या धोरणाबाबत घोषणा करण्यात आली. यामुळे वाहनांची बॅटरी तयार करणाऱ्या कंपन्यांचे शेअरची किंमत वाढू शकते.

 

 

Exide Industries आणि Amara Raja Batteris च्या शेअरकडून यंदा गुंतवणूकदारांना चांगल्याच अपेक्षा असणार.

संरक्षण

देशाला सुरक्षेच्या दृष्टीने अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर बनवण्याचा निश्चय केल्याचे यंदा बजेटमधून सांगण्यात आले आहे. देशात लष्करी उपकरणांचे उत्पादन वाढवण्यावर जोर देण्यात येणार असल्याचेही सरकारने सांगितले. अर्थमंत्र्यांनी 68 टक्के डिफेन्स कॅपेक्स स्थानिक कंपन्यांसाठी नियोजित आहे. या घोषणेमुळे Bharat Forge, Paras Defence, New Space India या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायला काहीच हरकत नाही.

 

 

सौरउर्जा

यंदा देशात सौरउर्जा प्रकल्प विकसीत करण्यावर भर देण्याचा मुद्दा बजेटमधून मांडण्यात आला. त्यासाठी काही विशेष धोरणं आखण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे या ७ेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना नवे वर्ष अधिक सकारात्मत जाणार आणि पर्यायी गुंतवणूकदारांनाही आशेचा किरण दिसेल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

Tata Steel, Vedanta, JSW Steels, Kirloskar Brothers, Tata Power, Adani Enterprises, Reliance Industries सारख्या कंपन्यांचे स्टॉक्समध्ये गुंतवणुकदारांचा कल वाढू शकतो.

 

 

बजेटनंतर दरवर्षी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार बाजारात नवे बदलही दिसतात. मात्र या क्षेत्रातील कोणताही बदल कायमस्वरुपी नसतो, त्यामुळे कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करताना केवळ एका माहितीवर विसंबून राहू नका.

आपल्या कष्टाचा आणि हक्काचा पैसा गुंतवताना सजगता असावी. आधी या क्षेत्राची माहिती करून घ्या, त्याकरिता तज्ञांची मदत घ्या. मात्र पुर्ण खात्री झाल्यानंतरच पैशांची गुंतवणूक करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version