Site icon InMarathi

जनतेचे मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी यंदाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद!

depression im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

परवा दिवसभर नवं बजेट काय असेल याकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिले होते. पण करामध्ये घट न झाल्यामुळे आणि इतर अनेक मुद्द्यांना धरून आपल्या देशात फार मोठ्या प्रमाणावर असलेल्या नोकरदार वर्गाची या बजेटमुळे चांगलीच निराशा झाली. अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया यावर उमटल्या. विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका व्हायला सुरुवात झाली.

श्रीमंतच अधिक श्रीमंत होत चाललेत. सर्वसामान्य माणसाची काय अवस्था होतेय याकडे कुठे कुणाचं लक्ष आहे अशी भावना अनेकांच्या मनात आली असेल. पण आज सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या एका मोठ्या समस्येबाबतची एक महत्त्वाची तरतूद आपल्या यंदाच्या बजेटमध्ये केली गेलीये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मानसिक स्वास्थ्य हा आजच्या घडीला कळीचा मुद्दा आहे. त्यात कोरोनाचं संकट आल्यापासून तर सगळ्याच वयातल्या मानसिक रुग्णांची आणि नैराश्याने ग्रस्त असलेल्यांची संख्या आधीपेक्षाही केवढीतरी वाढली आहे.

 

 

काल जाहीर झालेल्या बजेटमध्ये ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्रॅम’ लाँच केला जाणार असल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय. मानसिक त्रासातून जाणाऱ्या देशभरातल्या अनेकांसाठी ही गोष्ट नक्कीच आशेचा किरण ठरू शकते. काय आहे हा ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्रॅम’? जाणून घेऊया त्याविषयी.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, २०१२ ते २०३० च्या दरम्यान लोकांना ज्या मानसिक समस्या होत आहेत त्यामुळे भारताचं ७७ लाख कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. भारतात कोरोनाने थैमान घालण्यापूर्वीही जवळपास ५ कोटी लहान मुलं कुठल्या ना कुठल्या मानसिक त्रासातून जात होती.

या त्रासापासून सुटका करून घ्यायला ८० ते ९० टक्के लहान मुलांनी, त्यांच्या कुटुंबीयांनी कुठलीही मदत घेतली नाही. त्यामुळे भारताच्या पुढच्या पिढीतल्या एका खूप मोठ्या घटकाला मानसिक आजारांवरच्या इलाजांपासून नाईलाजाने वंचित राहावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. कोरोनानंतर तर ही परिस्थिती आणखीनच गंभीर झाली.

 

 

कोरोनातून बऱ्या झालेल्या अनेकांनी कोरोनाचा आपल्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम झाला असल्याचं सांगितलं आहे. डिसेंबर २०२१ मध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित राज्यसभेत एक प्रश्न विचारला गेला होता. त्यावर भारतात १०.६ टक्के वयस्कर मंडळी कुठल्या ना कुठल्या मनोवैज्ञानिक विकारांमधून जात असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते.

काल निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये सांगितल्याप्रमाणे आता लोकांना समुपदेशन मिळावं या हेतूने ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्रॅम’ लाँच केला जाणार आहे. त्याद्वारे मानसिक स्वास्थ्याशी संबंधित उत्तम सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.

या प्रोग्रॅमची एकूण २३ नेटवर्क्स असतील आणि बंगलोरच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस’ ((NIMHANS) येथे त्याचं मुख्य केंद्र असेल. यासाठी ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बंगलोर’ अर्थात ‘आयआयआयटी बंगलोर’ तांत्रिक मदत करणार आहे.

 

लॉकडाऊनच्या काळात NIMHANSच्या सेंटर फॉर सायकॉलॉजिक सपोर्ट ने एक राष्ट्रीय टोल फ्री नंबर दिला होता. या काळात जे लोक मानसिक त्रासातून जात होते आणि ज्यांना मनोवैज्ञानिक विकार होते त्यांचं समुपदेशन करणे हा त्यामागचा हेतू होता.

आता ‘राष्ट्रीय टेली मेंटल हेल्थ प्रोग्रॅम’द्वारे ही सेवा पुढे नेण्यात येईल. त्याद्वारे सगळ्यांसाठी मोफत स्वरूपात मानसिक स्वास्थ्यासंबंधीच्या उत्तम सेवा पुरवल्या जातील. मानसिक आरोग्यासंदर्भातल्या सेवासुविधा आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेले देशातले नागरिक यांच्यात जी दरी निर्माण झाली आहे ती मिटवण्यात हा प्रोग्रॅम नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल.

निर्मला सीतारामन यांनी या बजेटमध्ये ‘नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टिम’चं खुलं व्यासपीठही नागरिकांसाठी उपलब्द्ध केलं जाईल असं सांगितलं. यात हेल्थ प्रोव्हायडर्सची आणि आरोग्य सुविधांची डिजिटल स्वरूपात नोंदणी केलेली असेल. यात आपल्या प्रत्येकाला एक ‘युनिक हेल्थ आयडेंटिटी’ दिली जाईल आणि आरोग्यासंबंधित सुविधांचा लाभ घेणं आपल्या सगळ्यांना शक्य होईल.

आपला चौथा अर्थसंकल्प जाहीर करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, “देशातल्या तरुणाचं, स्त्रियांचं आणि गरिबांचं सबलीकरण करण्यावर सरकारचा भर असेल. आरोग्य आणि कल्याण हा आत्मनिर्भर भारताचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. ६० लाख नोकऱ्यांची निर्मिती करणं हे आता सरकारपुढलं ध्येय्य आहे.”

 

 

बजेटमुळे जरी आपल्यातले अनेक जण वैतागलेले असले तरी वरील सगळ्या बाबी लक्षात घेता मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात सरकारकडून ठोस पाऊल उचललं जातंय ही गोष्ट अनेकांना निश्चितच समाधान देईल. जास्तीत जास्त नागरिकांना या प्रोग्रॅममुळे फायदा होईल अशी अशा करूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version