Site icon InMarathi

या गोष्टी “कच्च्या” खाणं म्हणजे स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करणं…

family lunch im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये व्यवस्थित शिजवलेले किंवा भाजलेले अन्न ,मसाले ह्याला असामान्य महत्त्व आहे. आपल्या रोजच्या जेवणातील फळे आणि भाज्या, मांस हे आपल्या शरीराला लागणारी पोषक तत्वे पुरवतात. आपल्या पूर्वजांनी आपल्याला भाज्या, मांस हे नेहमी स्वच्छ धुवून, शिजवून मगच जेवणात वापरण्याचा सल्ला दिलेला आहे.

काही लोक मात्र काही पदार्थ कच्चे खाण्याची चूक करतात. इतरांचे अनुकरण करून कच्चा भाज्या खाण्याचे फॅड वाढत आहे, परंतु काही भाज्यांमध्ये नैसर्गिक विष आणि पचण्यास जड शर्करा असतात ज्यामुळे गॅस्ट्रोनॉमिकल रोग होऊ शकतात. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशा पदार्थांविषयी सांगणार आहोत जे तुम्ही कच्चे खाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. बटाटा –

 

 

न शिजवलेला बटाटा केवळ चवीला खराब नसतो, तर पोटाच्या आरोग्यासाठीही तो घातक आहे. कच्चा बटाट्यातील स्टार्चमुळे पोट फुगणे किंवा गॅस होणे अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे बटाटा नेहमी तळून, उकळून किंवा भाजूनच खा.

हिरव्या बटाट्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामध्ये सोलॅनिनचे प्रमाण जास्त असते. या विषारी घटकामुळे डोकेदुखी आणि मळमळ होऊ शकते.

२. क्रूसिफेरस भाज्या –

 

 

फुलकोबी, ब्रुसेल्स, ब्रोकोली आणि स्प्राउट्स यांसारख्या कोबी श्रेणी मध्ये मोडणाऱ्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत. या भाज्यांमध्ये पचायला कठीण असलेली साखर असते.

या भाज्या कच्च्या खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या उद्भवू शकतात. भाजी शिजवल्याने भाज्यांमध्ये असलेली साखर पचण्यास सोपी जाते. तुम्हाला थायरॉइडची समस्या असल्यास, कच्च्या क्रूसिफेरस भाज्या खाणे टाळा कारण त्यामुळे थायरॉईडची पातळी बिघडू शकते.

३. राजमा –

 

 

न शिजलेल्या किंवा कमी शिजलेल्या बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात ग्लायकोप्रोटीन लेक्टिन असते ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब यासारख्या समस्या उद्भवतात. कच्चे बीन्स सेवन केल्यानंतर लगेचच त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. त्यामुळे राजमा करताना रात्रभर किंवा ८ तास भिजवून मगच जेवणात वापरा.

४. मशरूम –

 

 

मशरूम कच्चे खाऊ शकता, परंतु अधिक पोषक तत्वे मिळविण्यासाठी शिजवून खाणे चांगले. भाजलेले, तळलेले किंवा ग्रील्ड मशरूम पेक्षा शिजवलेल्या मशरूममध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

तुमच्या आवडत्या पदार्थांना हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी तुम्ही पास्ता किंवा पिझ्झामध्ये तळलेले मशरूम घालू शकता, परंतु मशरूम पाण्याने स्वच्छ धुवून मगच वापरा.

५. वांग –

 

वांग्यामध्ये सोलॅनिन नावाचे रसायन असते त्यामुळे शरीरामध्ये कॅल्शियमचे शोषण होण्यास अडथळा येतो. तसेच यामुळे न्यूरोलॉजिकल आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवू शकतात, ज्यामध्ये मळमळणे, चक्कर येणे, उलट्या होणे आणि पेटके येणे यांचा समावेश होतो. त्यामुळे वांग नीट भाजून अथवा शिजवून घ्यावे.

६. फ्रेंच बीन्स / फरसबी

 

 

फ्रेंच बीन्स किंवा फरसबी कधीही कच्ची न खाल्लेली बरी. कारण यामध्ये अमिनो अॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे शरीराला धोका होऊ शकतो. वापरण्यापूर्वी थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवल्यास विषारी घटक निघून जातात.

७. अंड –

 

 

कच्चे अंडी खाणे अगदी सामान्य आहे. केक-क्रीममध्ये कच्च्या अंड्याचा पांढरा वापरण्यापासून ते मेयोनेझमध्ये वापरण्यापर्यंत कच्चा अंड्याचा वापर सरार्स होतो.तर काही लोकांना अर्ध-शिजवलेल्या अंड्याची चव देखील आवडते. पण कच्चे अंडे खाणे सुरक्षित आहे का? अंड्यामध्ये बॅक्टेरिया (साल्मोनेला) असू शकतात, ज्यामुळे अन्न विषबाधा आणि पोट खराब होऊ शकते. काहीवेळा त्यामधून फ्लूच्या विषाणूचा प्रसार देखील होऊ शकतो, म्हणून खाण्यापूर्वी अंडी योग्यरित्या शिजवणे महत्वाचे आहे.

८. मांस आणि मच्छी –

 


मांस मग ते कोणतेही असो, चिकन, मटण , पोर्क किंवा मासे व्यवस्थित धुवून आणि शिजवूनच खाल्ले पाहिजे. एकतर ह्यांचे स्त्रोत हे विषाणू आणि जिवाणूंचे माहेरघर असतात. कॅम्पिलोबॅक्टर, साल्मोनेला , ई कोलाय सारखे विषाणू ह्यांच्या पृष्भागावर आढळून येतात. त्यामुळे कमीतकमी 160° तापमानावर मांस शिजवून घ्यावे.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version