Site icon InMarathi

सगळ्यात मोठे चोर बाजार : मोबाईल पासून कार्सपर्यंत सगळे काही स्वस्तात मिळते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज आम्ही तुम्हाला देशातील पाच अशा मोठ्या चोर बाजारांविषयी सांगत आहोत जिथे चोरीचे सामान सहज मिळते.

इथे चोरीचे बूट, फोन, मोबाईल, गॅजेट्स, ऑटोपार्ट्स पासून थेट कार देखील विकल्या जातात. देशातील या अट्टल चोर बाजारात चोरीच्या गाड्या मॉडीफाय करून विक्रीसाठी ठेवल्या जातात.

जर या ठिकाणांवर कधी गाडी घेऊन गेलात तर इथे आपली बाइक किंवा कार चुकूनही उभी करू नका. जर तुम्ही तुमची गाडी उभी केली, तर परत आल्यावर तुम्हाला तुमची गाडी नजरेस पडण्याची शक्यता फारच कमी असेल. एव्हाना तिचे पार्ट्स त्याच चोर बाजारात विक्रीसाठी ठेवले गेले असतील…!

जाणून घेऊ देशातील या अट्टल आणि तितक्याच धोकादायक चोर बाजारांविषयी….!

 

मुंबई चोर बाजार

 

 

मुंबईचा चोर बाजार दक्षिण मुंबईच्या मटन स्ट्रीट मोहम्मद अली रोडच्या जवळ आहे.

हे मार्केट जवळपास १५० वर्ष जुने आहे. हा बाजार पहिला ‘शोर बाजार’च्या नावाने सुरु झाला होता, कारण इथे दुकानदार जोरात आवाज देऊन सामान विकत असत त्यामुळे इथे खूप आवाज असे.

परंतु इंग्रज लोक ‘शोर’ला चुकीने ‘चोर’ बोलत असल्याने याचे नाव ‘चोर बाजार’ पडले. एका अर्थी हे नाव सार्थच ठरले.

इथे वापरलेले कपडे, ऑटो मोबाईल पार्ट्स, चोरलेली घड्याळे आणि ब्रँडेड घड्याळांचे ओरीजनल मॉडेल्स, तसेच विंटेज आणि अँटीक सजावटीचे सामान मिळते. येथील रेस्टॉरंट आणि कबाब खूप प्रसिद्ध आहे.

पण – इथे पाकीट मारांपासून सावध राहा बरं!

 

हे ही वाचा – मानवी कौशल्याच्या प्रगतीचा इतिहास – १० वस्तूंच्या रूपांतरातून

हे मार्केट रोज सकाळी ११ वाजल्यापासून संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत खुले असते. असे  म्हटले जाते की मुंबईच्या यात्रेवेळी राणी विक्टोरियाचे सामान जहाजात लोड करतेवेळी चोरी झाले होते. हेच सामान नंतर मुंबई चोर बाजारात मिळाले.

या बाजारासाठी एक म्हण सुद्धा प्रसिद्ध आहे की, तुम्ही मुंबईत राहत असाल तर इथे तुमच्या घरातून चोरी झालेले सामान सुद्धा मिळेल. मुंबईला कधी गेलात तर या चोर बाजाराला नक्की भेट द्या.

 

दिल्ली चोर बाजार

 

 

हा देशातील सर्वात जुना चोर बाजार आहे. पहिल्यांदा हा बाजार संडे मार्केट म्हणून लाल किल्ल्याच्या मागे लागत असे. आज हा बाजार दरियागंज मध्ये नावेल्टी आणि जामा मस्जिदच्या जवळ लागतो. हा बाजार मुंबई चोर बाजारापेक्षा वेगळा आहे.

याला भंगार बाजार पण म्हटले जाते. इथे हार्डवेयर पासून किचन इलेक्ट्रोनिक्सचे सामान मिळते. हा बाजार रविवारी लागतो. इथे खरेदी करताना वस्तू तपासून घ्या कारण जसे विक्रेता सांगतो तशी वस्तू निघत नाही.

 

सोती गंज, मेरठ

 

 

यूपीच्या मेरठमध्ये सोती गंज मार्केट खूप प्रसिद्ध आहे. या बाजाराला चोरीच्या गाड्या आणि स्पेयर पार्ट्सचा गड मानले जाते. येथे सर्व गाडींचे ऑटो पार्ट्स मिळतील.

इथे चोरलेल्या, जुन्या आणि अपघातात खराब झालेल्या गाड्या येतात. मेरठचे सोतीगंज मार्केट आशियातील सर्वात मोठे स्क्रॅप मार्केट पण आहे.

हे मार्केट मेरठ शहरात सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले राहते.

 

 

इथे समान खरेदी करण्यासाठी तुम्हाला योग्य विक्रेता मिळणे गरजेचे आहे. सोतीगंज मध्ये १९७९ च्या अँबेसिडरचे ब्रेक पिस्टन, १९६० च्या महिंद्रा जीप क्लासिकचा गियर बॉक्स आणि युद्धमढील विलीज जीपचे टायर देखील मिळतात.

 

चिकपेटे, बँगलोर

 

 

दिल्ली आणि मुंबईच्या चोर बाजारांपेक्षा बँगलोरचे चोर बाजार कमी प्रसिद्ध आहे. हे मार्केट बँगलोर मध्ये चिकपेटे जागेवर रविवारच्या दिवशी लागते.

येथे वापरलेल्या वस्तू, ग्रामोफोन, चोरीचे गॅजेट्स, कॅमेरा, अँटीक, इलेक्ट्रोनिक्स आइटम आणि स्वस्त व्यायामाची उपकरणे मिळतात.

 

 

हे मार्केट लोकल मार्केटसारखेच आहे. हा बाजार एका गावाच्या बाजारासारखा बीवीके अयंगर रस्त्यावर अवेन्यू रोडच्या जवळ रविवारी लागतो.

 

पुदुपेत्ताई, चेन्नई

 

 

चेन्नईमध्ये असलेल्या ‘ऑटो नगर’ मध्ये जुन्या आणि चोरी केलेल्या कार्सना मॉडीफाय केले जाते. इथे हजारोंच्या संख्येत दुकाने आहेत. ही दुकाने गाडींच्या मुळ पार्ट्स आणि कारला बदलण्यासाठी प्रसिद्ध आहे.

येथील कारागीरांजवळ या कामासाठी आंतरराष्ट्रीय कौशल्य आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. गाड्यांचे रूपडे स्वस्तात पालटायचे असेल तर या चोर बाजारापेक्षा दुसरी योग्य जागा नाही.

 

 

या मार्केट मध्ये खूप वेळा पोलिसांचा छापा पडला आहे आहे, परंतु हे मार्केट कधीही बंद पडले नाही. हा बाजार अॅग्मोर रेल्वे स्थानकापासून १ किलोमीटर लांब आहे.

सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा बाजार चालू असतो. इथे तुमची गाडी अजिबात घेऊन जाऊ नका, का ते तुहाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल आणि भाव करण्याचे कौशल्य असेल तर या चोर बाजारांना एकदा भेट द्यायला हरकत नाही!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा – एकेकाळी फक्त वस्तू नव्हे, तर चक्क मुलं पार्सल करून पाठवली जायची

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version