Site icon InMarathi

एक असा मराठी माणूस जो सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती म्हणून ओळखला जातो!

shrikant jichkar featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ही गोष्ट खरी आहे आणि फारच कमी जणांना ठावूक आहे की भारतामध्ये एक असा महाराष्ट्राचा सुपुत्र होऊन गेला ज्याच्या नावावर भारतातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून Limca Book of Records मध्ये नोंद झाली होती.

तो मराठी माणूस म्हणजे – डॉ श्रीकांत जिचकर होय!

 

 

अश्या या प्रतिभावंत व्यक्तीचे वयाच्या अवघ्या ४९ वर्षीच २००४ मध्ये नागपूरला एका कार अपघातात निधन झाले. आज डॉ. श्रीकांत जिचकर आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या कर्तुत्वाच्या रूपाने आजही ते हयात आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

डॉ श्रीकांत जिचकर यांनी ४० पेक्षा जास्त विद्यापीठांमधून २० पदव्या घेतल्या आहेत. श्रीकांत जिचकर यांनी जवळजवळ सर्वच परीक्षांमध्ये प्रथम श्रेणी मिळवली आहे आणि २८ सोन्याची पदके जिंकली आहेत.

सन १९७२ पासून १९९० पर्यंत त्यांनी प्रत्येक वर्षी दोनदा, असे मिळून एकूण ४२ विद्यापीठांच्या परीक्षा दिल्या.

 

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा एमबीए करून तो बनला चहावाला – आणि पठ्ठ्या कमावतोय वर्षाला कोट्यावधी रुपये!

===

 

 

परंतु ते IPS मध्ये रुजू झाले नाहीत आणि पुन्हा त्यांनी १९८० मध्ये सिविल सर्विसेसची परीक्षा दिली. यावेळी त्यांना IAS (इंडिअन अॅडमिनीस्ट्रेटीव सर्विसेस) मिळाले.

डॉ जिचकर यांचे या नोकरी मध्येही जास्त काळ मन रमले नाही आणि ४ महिन्यानंतर त्यांनी या पदावरून राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

डॉ श्रीकांत यांना शिकण्याचा खूप छंद होता. त्यांच्याकडे जवळ ५२००० पेक्षा जास्त पुस्तकांची लायब्ररी होती. डॉ.श्रीकांत यांना गीता, उपनिषद, वेद-पुराण इत्यादी ग्रंथांचे खूप खोल ज्ञान होते.

श्रीकांत जिचकर केवळ एक पुस्तकी किडा होते असे नाही. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेले डॉ.जिचकर एक पेंटर, प्रोफेशनल फोटोग्राफर, स्टेज एक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ पण होते.

 

 

आज संपूर्ण भारताला त्यांचा गर्व आहे की इतका ज्ञानी आणि प्रतिभावान व्यक्ती असून सुद्धा डॉ श्रीकांत जिचकर यांनी भारतालाच आपली कर्मभूमी बनवली आणि देशवासीयांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.

अश्या या महान व्यक्तिमत्वास भावपूर्ण नमन!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

हे ही वाचा वर्क फ्रॉम होम करत यांनी थेट मंगळावरचं यान घरून कंट्रोल केलं…!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version