आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सेलिब्रिटी व्यक्तींचं वैयक्तिक आयुष्य हा आपल्याकडे नेहमीच चर्चेचा विषय असतो. कोणती नायिका ही सध्या कोणाला ‘डेट’ करत आहे याची माहिती देणारे कित्येक शो टीव्हीवर चॅनल बदलतांना आपल्याला दिसत असतात.
लग्न होईपर्यंत हे लोक वेगवेगळ्या नात्यांमध्ये स्वतःला गुंतवून कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात असंही बॉलीवूड नायक, नायिकांबद्दल नेहमीच बोललं जातं. कतरिना कैफ, दीपिका पदुकोण सारख्या नायिकांचं लग्न होईपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडियाने नेहमीच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक ‘अपडेट’वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
९० च्या दशकातील ‘मनीषा कोईराला’ ही मात्र एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या सुरू असलेल्या अफेअर बद्दल नेहमीच चर्चेत राहिली. पण, लग्न झालं आणि ती चर्चा संपली असं कधी झालंच नाही.
११ अफेअर्स झाल्यानंतर तिने ‘सम्राट दहल’ सोबत लग्न केलं आणि त्यामध्ये घटस्फोट घ्यावा लागला हे तिचं दुर्दैव म्हणावं लागेल. “सेलिब्रिटी लोकांच्या आयुष्यात हे सगळं चालतंच” हे मान्य. पण, मनासारखा जोडीदार मिळणं ही प्रत्येक व्यक्तीची असलेली ‘मनीषा’ तिला कधीच पूर्ण करता आली नाही हे ही तितकंच खरं आहे.
कोण होते हे ११ सेलिब्रिटी ज्यांच्यासोबत मनीषा कोईरालाचं नाव जोडलं गेलं होतं ? जाणून घेऊयात.
१. विवेक मुश्रन
“पि पि पि पिया, जी जी जी जिया” या गाण्याने ९०च्या दशकात लोकप्रिय झालेल्या विवेक मुश्रनचं नाव ‘सौदागर’ सिनेमाची शुटिंग करत असतांना मनीषा कोईराला सोबत जोडण्यात आलं होतं.
‘इलू इलू’ या गाण्यात सिनेमात अभिनय केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा एकमेकांना हे सांगितलं होतं. काही काळ विवेक मुश्रन आणि मनीषा कोईराला यांचे संबंध मैत्रीच्या पलीकडे गेले होते. पण, सौदागर सिनेमाची चर्चा थांबली तशी त्यांच्या नात्याला सुद्धा पूर्णविराम लागला.
२. नाना पाटेकर
‘खामोशी’ मध्ये मनीषा कोईरालाचे वडील आणि ‘अग्निसाक्षी’ मध्ये एका विक्षिप्त नवऱ्याचा तंतोतंत अभिनय करणाऱ्या आपल्या नाना यांचं नाव मनीषा कोईराला सोबत कित्येक वर्ष जोडलं गेलं होतं.
या दोघांना एकत्र फिरतांना कित्येक पत्रकारांनी आपल्या कॅमेरात कैद केलं होतं. पण, नाना पाटेकर हे आधीच विवाहित असल्याने या नात्याचं पुढे काही झालं नाही. असं सांगितलं जातं की, मनीषा कोईराला ही नानांबद्दल खूप जास्त ‘पझेसिव्ह’ झाली होती. त्यामुळे दोघांमध्ये गैरसमज वाढत गेले आणि तो तणाव टाळण्यासाठी मग या दोघांनी एकत्र काम करणं सुद्धा बंद केलं.
हे नातं संपल्यावर मनीषा कोईराला हिला मानसोपचार घ्यावे लागले होते
३. डीजे हुसैन
नाना पाटेकर यांच्यापासून लांब गेल्यावर डीजे हुसैन् मनीषा कोईरालाच्या आयुष्यात एक आधार म्हणून आला होता. एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली होती.
“मी तुमचा खूप मोठा फॅन आहे” या वाक्याने सुरू झालेली मैत्री ही लग्नापर्यंत गेली होती. पण, मनीषा कोईरालाने त्यावेळी लग्नासाठी नकार दिला होता.
४. सेसिल अँथनी:
डीजे हुसैन सोबत झालेल्या ब्रेकअप नंतर मनीषा कोईराला लंडनला गेली होती. तिथे तिची भेट सेसिल अँथनी या नायजेरियाच्या व्यवसायिकासोबत झाली होती. दोघांनाही एकमेकांना जाणून घेण्यात खूप उत्सुकता होती.
दोन वर्ष हे नातं दूर अंतरावरून देखील टिकून होतं. पण, नंतर हे अंतर वाढत गेलं. भारतात मनीषा कोईरालासाठी पुढचा सिनेमा एक नवीन जोडीदार घेऊन आला होता.
५. आर्यन वैद्य
‘मार्केट’ या सिनेमासाठी शुटिंग करत असतांना मनीषा कोईराला आणि आर्यन वैद्य यांची भेट झाली आणि वयाने लहान असलेल्या या कलाकारासोबत तिची जवळीक वाढली.
बॉलीवूड मध्ये पाय रोवू पाहणाऱ्या आर्यन वैद्य साठी ही लोकप्रियता मिळवण्याची एक संधी होती ज्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला आणि मीडिया मध्ये त्यांच्या नात्याबद्दल तो उघडपणे सांगू लागला. पण, मनीषा कोईरालाचं चंचल मन हे या नात्यात सुद्धा स्थिर होऊ शकलं नाही.
६. प्रशांत चौधरी
मनीषा कोईरालाचं वाढतं वय हे तिला एक जोडीदार असावा अशी जाणीव तर करून देत होतं. पण, हा शोध काही केल्या संपत नव्हता.
मुंबईत राहणाऱ्या प्रशांत चौधरी हा एक हॉटेल चैनचा मालक म्हणून मनीषा कोईरालाच्या आयुष्यात आला आणि पुन्हा तेच झालं. ओळख, कॉफी आणि बरंच काही. पण, लग्न नाही. प्रशांत चौधरीच्या घरच्यांना हे नातं कधीच मान्य झालं नाही आणि प्रकरण तिथेच संपलं.
७. क्रिस्पीन कॉनॉरी
मूळची नेपाळची असलेली मनीषा कोईरालाही तिथल्या ऑस्ट्रेलियाच्या राजदूत क्रिस्पीन कॉनॉरीच्या सुद्धा प्रेमात पडली होती. प्रेमाला देश, वय, जात, रंग असे काही भेद मान्य नसतात, मात्र लग्न हे यापैकी बऱ्याच गोष्टींचा विचार करून केलं जातं.
क्रिस्पीन कॉनॉरीने मनीषा कोईराला हिला कोणतीही ‘कमिटमेंट’ देण्यास नकार दिला आणि हे नातं सुद्धा अल्पावधीतच संपुष्टात आलं.
८. तारीक प्रेमजी
विप्रो उद्योग समूहाचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांचे सुपुत्र तारीक प्रेमजी आणि मनीषा कोईराला यांचं नाव देखील बराच काळापर्यंत जोडलं गेलं होतं. पण, हे त्या मानाने कमी माहिती बाहेर आलेलं हे नातं सुद्धा लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.
९. नवोदित कलाकार ‘अक्षय’
एक छोटीसी लव्हस्टोरी’ या सिनेमाच्या शुटींगच्या वेळी मनीषा कोईरालाची भेट अक्षय या नवोदित कलाकारासोबत झाली आणि त्याचंही रूपांतर मैत्री, प्रेमात झालं.
६ फूट उंची असलेल्या पण, वयाने १५ वर्ष लहान असलेल्या या कलाकाराला आपला पती म्हणून मान्य करण्यास मनीषा कोईरालाचं मन धजावत नव्हतं.
१०. संदीप चौटा
संगीतकार म्हणून बॉलीवूड मध्ये प्रसिद्ध असलेल्या संदीप चौटा ही मनीषा कोईरालाच्या आयुष्यात येणारी पुढची व्यक्ती होती. संदीच्या आयुष्यात मात्र त्या आधी सुश्मिता सेन, शिल्पा शेट्टी, उर्वशी ढोलकिया सारख्या अभिनेत्री येऊन गेल्या होत्या.
लग्नासाठी कधीच जोडीदार न शोधणाऱ्या संदीप चौटाने मनीषा कोईराला हिला सुद्धा नकार दिला आणि हे नातंसुद्धा संपुष्टात आलं.
११. क्रिस्तोफर डॉरीस
अमेरिकेतील एका दौऱ्यात मनीषा कोईरालाची भेट क्रिस्तोफर या क्रीडा प्रशिक्षकासोबत झाली. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण, ३ वर्ष सुरू असलेलं हे अफेअर एका वळणावर येऊन संपुष्टात आलं.
लग्न करण्याची इच्छा यावेळी मनीषा कोईराला हिने सोशल मीडियावर सुद्धा व्यक्त केली होती. पण, तिच्या लग्नाचे योग जुळून येत नव्हते.
१२. सम्राट दहल:
२०१० मध्ये मनीषा कोईराला हिची सम्राट दहल या नेपाळी व्यवसायिकासोबत फेसबुकवरून मैत्री झाली. ‘मेसेंजर’ मधून सुरू झालेलं नातं लग्नापर्यंत फोहोचलं खरं, पण २ वर्षांपेक्षा जास्त ते नातं टिकू शकलं नाही.
२०१२ मध्ये मनिषाने सम्राट दहल याला आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं जाहीर केलं आणि घटस्फोटाचा अर्ज भरला.
“लग्नाबद्दल माझ्या मनात असलेली अपेक्षा ही वेगळी आहे आणि लग्नसंस्था ही वेगळी आहे. विवाह बंधनाचा मी आदर करते. पण, म्हणून अयोग्य व्यक्तीसोबत आयुष्य व्यतीत करू नये.” असं मत मनीषाने व्यक्त केले होते.
‘अविवाहित’ रहाणं हा काही गुन्हा नाहीये. पण, जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असतात, तेव्हा तुम्हाला आनंदी रहाणं किंवा तसं दाखवणं हे बंधनकारक होतं इतकाच काय तो फरक. नुकतंच कॅन्सरवर मात केलेल्या मनीषा कोईराला हिला जर लग्न न करताही आनंदी, निरोगी आयुष्य जगता आलं तरी तिचे चाहते समाधान व्यक्त करतील हे नक्की.
अर्थात आयुष्यभर नात्याच्या शोधात असूनही प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरलेल्या मनिषाचे हे दुर्दैवच म्हणावं लागेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.