आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
बॉलीवूडमध्ये हिरोईन होण्यासाठी लाखों तरुणी मुंबई या मायानगरीत दाखल होतात. बॉलिवूडचा झगमगाट आणि मायानगरी अनेकींना आकर्षित करते. लाखों तरुणींमध्ये काहीच जणी इंडस्ट्रीचा भाग होतात आणि येथे स्थिरावतात. बॉलिवूड च्या नव्या फळी मध्ये दाखल होऊन आपलं दमदार अस्तित्व दाखवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एक मराठमोळ नाव आहे भूमी पेडणेकरच. नशिबाने दिलेली संधी अचुक हेरलेल्या भूमीची गिनती आता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये होते.
अभिनेत्री म्हणून कारकिर्दीला सुरवात करण्याआधी भूमी यशराज फिल्म्ससाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून खूप वर्षांपासून काम करत होती. तिच्या बॉलिवूड एन्ट्री मागे एक रोमांचक किस्सा आहे. ‘ दम लगा के हईशा ‘ ह्या फिल्मसाठी अभिनेत्रीची निवड करण्यासाठी पूर्ण टीम ऑडीशन घेत होती. संध्या नावाच्या लीड कॅरेक्टरची भूमिका नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी होती. त्यासाठी कास्टिंग टीमने तब्बल 250 मुलींची ऑडीशन घेतली होती.
हा किस्सा सांगताना भूमी म्हणते की, ‘ मी नेहमी प्रमाणे फिल्मसाठी ऑडिशन घेत होते. एवढ्या मुलींना भूमिका समजावून सांगताना मला एकदा सुद्धा वाटले नाही की ही भूमिका मी करायला हवी. मी माझ्या कामात एवढी गुंतून गेले होते की त्या वेळी दुसरा कोणताच विचार माझ्या मनात आला नाही.
ऑडिशन घेताना इतर मुलींना भूमिका समजावून सांगताना मी सुद्धा तो रोल प्ले करायचे. कधी मी सहा वर्षांची लहान मुली ह्यायचे तर कधी साठ वर्षांची म्हातारी ‘. पुढे ती सांगते, ‘माझ्याकडे इतरांना भूमिकेसाठी तयार करण्याचे काम होते. परंतु खरा पेच तेव्हा झाला जेव्हा मी इतर मुलींची ‘ दम लगा के हईशा ‘ साठी ऑडिशन घेत होते सोबतच माझी सुद्धा ऑडिशन चालू होती. इतर मुलींसोबत हा पक्षपात तर नाही ना असा विचार माझ्या मनात आला म्हणून यशराज फिल्म्सचे शानु शर्मा यांच्या सोबत चर्चा केली.
या रोल साठी आम्ही ऑलरेडी २५० मुलींची ऑडिशन घेतली होती आणि हा रोल मला सुद्धा सोपा वाटला नाही. पण मला आता गर्व वाटतो की मी या रोल साठी मेहनत घेतली आणि आपली पहिली फिल्म करण्याआधी कॅमेऱ्याच्या मागे सहा वर्षे काम केले ‘.
–
- हे मराठी सेलिब्रिटी आडनाव लावायचं का टाळतात? जाणून घ्या त्यांची खरी आडनावं!
- श्रीदेवीच्या ‘हवा हवाई’ गाण्यामधली ही चूक आजवर कुणालाच ओळखता आलेली नाही!
–
पुढे भूमी असे सांगते की संध्याच्या रोल साठी तिने जेंव्हा ऑडिशन दिली तेंव्हा शानू शर्मा ह्यांनी ही ऑडिशन घेतली. संध्याचा रोल मला देण्यापूर्वी फिल्मचे डायरेक्टर शरत कटारिया यांनी खूप विचार केला. मी फक्त यशराज फिल्म सोबत जोडलेली आहे म्हणून मला रोल द्यावा अशी त्यांची इच्छा नव्हती तर या रोलसाठी त्यांना अशी कोणती तरी अभिनेत्री हवी होती की जी हे कॅरॅक्टर समजून घेईल. त्यामुळे मला माझी पात्रता सिद्ध करावी लागली.
हा रोल ९०च्या दशकातील महिलेचा होता तर माझ्या भाषेचा लहेजा आताच्या शहरी भागातील होता. खूप मेहनत घेतल्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी माझी या रोलसाठी निवड करण्यात आली.
‘दम लगा के हईशा’ मधील संध्याच्या रोलसाठी भूमीला आपलं वजन वाढवण्याची रिस्क घ्यावी लागली. पण जेंव्हा ही फिल्म रिलीज झाली तेव्हा मात्र रिस्क सफल झाल्याचे समाधान होते. ही फिल्मची स्टोरी , आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
फिल्म हिट झाली आणि इंडस्ट्रीला एक नवीन अभिनेत्री मिळाली जी आजतागायत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. नशिबाने कास्टिंग डायरेक्टर भूमीला हिरोईन बनण्याची संधी दिली. भूमीने ‘ टॉयलेट – एक प्रेम कथा’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ अशा सिनेमातून काम केले आहे. लवकरच तिचा ‘बधाई दो’ हा सिनेमा भेटीला येत असून यात राजकुमार राव सोबत तिची केमिस्ट्री दिसणार आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.