एबीसी म्हणजेच अप्पा बळवंत चौकाचं पेशव्यांशी असलेलं कनेक्शन ठाऊक आहे का?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“मला जरा स्पर्धा परीक्षांची पुस्तकं पाहिजे होती रे.”, “आई-बाबा मला नवीन वह्या, पुस्तकं हवी आहेत.” यांसारख्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल ते तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. “अप्पा बळवंत चौकात चला.” हे एकच उत्तर या सगळ्या प्रश्नांसाठी आहे. पुणेकर असोत किंवा पुण्याबाहेरचे असोत. अप्पा बळवंत चौक माहित नाही अशी व्यक्ती असणं जवळजवळ अशक्य आहे.
आजकाल नवीन पिढी अप्पा बळवंत चौकाला ABC चौक असं म्हणते. एवढंच नव्हे तर पुण्यातल्या बसेसवरसुद्धा ‘मार्गे अ. ब. चौक’ असं लिहिलेलं असतं, पण या चौकाला हे नाव का मिळालं? कधी मिळालं? याची माहिती तरुण मुलांनाच काय वयस्कर लोकांनाही माहित नसेल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
अप्पा बळवंत चौक हे नाव मिळालं कसं?
बळवंतराव गणपत मेहेंदळे हे पेशव्यांचे सेनापतींपैकी एक होते. ते पानिपतच्या युद्धात हुतात्मा झाले. त्यांचे पुत्र म्हणजेच अप्पा उर्फ कृष्णाजी बळवंत मेहेंदळे. बळवंतरावांच्या पत्नी पानिपतावर सती गेल्यानंतर अप्पांची जबाबदारी पेशव्यांनी घेतली होती. ही झाली प्राथमिक माहिती.
चौकाच्या नावाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा सवाई माधवराव पेशवे पर्वतीवरून शनिवारवाड्यात जात होते. त्यांच्याबरोबर अंबारीमध्ये अप्पाही होते. त्यावेळी सवाई माधवरावांना अचानक भोवळ आली. ते खाली पडणार इतक्यात अप्पांनी पेशव्यांना सावरले आणि वर ओढले. सवाई माधवरावांचा अपघात झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता, पण अप्पांनी पेशव्यांचा जीव वाचवला त्यामुळे ती घटना जिथं घडली त्या जागेला अप्पा बळवंतांचे नाव देण्याचे पेशव्यांनी जाहीर केले.
अप्पा बळवंत चौक फक्त पुस्तकांसाठी फेमस आहे?
लोकांना अप्पा बळवंत चौक हे नाव ऐकलं, की आठवतात ती फक्त काही पुस्तकांची दुकानं. पण अप्पा बळवंत चौक आणि पुस्तकं हे समीकरण जरी योग्य आणि जगजाहीर असलं तरीही या चौकाला बाकी महत्त्वही आहेच.
शहरातल्या एका प्रमुख म्हणजे बाजीराव रस्त्याला छेदणारा चौक म्हणजे अप्पा बळवंत चौक. बुधवार पेठ आणि नारायण पेठेला जोडणारा चौक म्हणजे अप्पा बळवंत चौक. याच चौकाच्या एका बाजूला पुण्यातले नूतन मराठी विद्यालय आहे. तर दुसऱ्या बाजूला ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीचे मंदिर आहे. त्याबरोबरच अगदी चौकाला लागूनच ‘प्रभात’ म्हणजे आत्ताचे ‘किबे लक्ष्मी थिएटर’ आहे.
एवढंच नव्हे, तर पुणेकरांना पुण्यातले प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अप्पा बळवंत चौकातूनच जावं लागतं. इतरही गणपती बघण्यासाठी नागरिकांना याच चौकातून जावं लागतं.
—
- पुण्यातले ५ मानाचे गणपती! त्यांचा हा शेकडो वर्षं जुना इतिहास माहित असायलाच हवा!
- पुणे तिथे काय उणे : या सुप्रसिद्ध झणझणीत मिसळींचा आस्वाद प्रत्येकाने घ्यायलाच हवा!
—
या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरीही अप्पा बळवंत चौक म्हणजे पुस्तकं मिळण्याचं ठिकाण हे काही कोणाच्याही मनातून पुसलं जाणार नाही. कारण सध्याच्या डिजिटल युगातही सगळे लोक, अगदी बाहेरून येणारे लोकही पुस्तक घ्यायचं ठरवतात आणि अप्पा बळवंत चौकातच येतात.
स्पर्धा परीक्षा देणारे, मराठी साहित्याची आवड असणारे, शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते अगदी पीएचडीचा अभ्यास करणारे इथपर्यंत सगळेच पुस्तक घ्यायला अप्पा बळवंत चौकातच येतात.
या चौकात पूर्वी मेहेंदळेंचा तीन मजली, चार चौकी वाडा होता. अप्पा बळवंत मेहेंदळेंच्याच वाड्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना १९१० साली झाली होती. मात्र रस्ता रुंदीकरणात हा वाडा पाडला गेला.
आता तिथे फक्त गणेशपट्टी असलेली चौकट आहे. गणेशपट्टी म्हणजे दरवाजाच्या चौकटीवर मधोमध गणपतीची प्रतिमा असते. फक्त अप्पा बळवंत चौक या ठिकाणाच्या नावालाच एवढा मोठा इतिहास लाभला आहे अशातला भाग नाही. पुण्यात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांच्या नावामागे भरपूर इतिहास आहे.
नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीच धरू शकत नाही…! काय बरोबर ना??
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.