आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
मध्यंतरी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होता, मुलगा आर्यन खानला NCB ने ड्रगकेसमध्ये पकडलं आणि सगळीकडेच चर्चा फक्त शाहरुखची व्हायला लागली. शाहरुखने मुलांवर संस्कार चांगले केले नाहीते, त्याची शिकवण योग्य नाही इत्यादि.
एवढंच नाही तर शाहरुखचे जुने व्हिडिओज, मुलाखतीसुद्धा व्हायरल होऊ लागल्या. गेली काही वर्षं शाहरुख मोठ्या पडद्यापासूनसुद्धा बराच लांब आहे आणि त्याच्या पुढील करियरसाठीसुद्धा या प्रकरणाचा चांगलाच फटका बसणार आहे हे निश्चित.
शाहरुख आणि गौरीच्या सिम्मी गरेवाल सोबतची व्हायरल झालेली ती मुलाखत आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. त्यात शाहरुख आर्यनविषयी बरंच काही बोलला पण त्यामध्ये शाहरुख आणि गौरी यांच्या लव्हस्टोरीविषयीसुद्धा बरीच चर्चा झाली.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
शाहरुखने एक वेळा नाही, तब्बल २ वेळा गौरीला लग्नासाठी मागणी घातली होती, तसेच फिल्म इंडस्ट्रीतल्या बड्या स्टार्सनीसुद्धा शाहरुखला लग्न न करण्याचा सल्ला दिला होता, त्याविषयीच आपण जाणून घेऊया!
तुम्हाला माहितीये का, गौरी आणि शाहरुख हे फार आधीपासून एकमेकांना ओळखत होते, १९८४ च्या दरम्यान दोघांच्या कॉमन मित्राच्या घरी एक पार्टी होती, त्या पार्टीमध्ये शाहरुखने प्रथम गौरीला पाहिलं होतं.
तेव्हा तो किंग खान वगैरे नव्हता, एक सामान्य मुलगा शाहरुख होता. त्यावेळेस शाहरुख हा बराच लाजाळू होता आणि स्वतः एखाद्या मुलीला डान्ससाठी विचारण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं.
त्या मुलीविषयी शाहरुखने आपल्या मित्राकडे चौकशी केली, तेव्हा असं समजलं की ती तिच्या बॉय फ्रेंडची वाट पाहत आहे, पण इतर कोणाबरोबर डान्स करायला लागू नये म्हणून गौरीने ही युक्ति लढवली होती ते शाहरुखला नंतर समजलं!
शाहरुखने जेव्हा प्रथम गौरीकडे प्रेमाची कबुली दिली तेव्हा गौरीने त्याला साफ नकार दिला होता कारण तिच्या घरच्यांना तो पसंत नव्हता, नंतर काही कारणास्तव गौरी मुंबईत आली.
–
- एक गाणं ज्यामध्ये साऱ्या बॉलीवूडने झाडून हजेरी लावली, फक्त आमिर सोडून! असं का?
- खुद्द शाहरुखने काउंटरवर उभं राहून त्याच्या या सिनेमाची तिकिटं विकली होती!
–
तिच्यापाठोपाठ स्वतःचा कॅमेरा विकून पैसे गोळा करून शाहरुखसुद्धा त्याच्या मित्रांसोबत मुंबईत फिरायला आणि गौरीचा शोध घ्यायला आला. त्यानंतर काहीच दिवसांत मुंबईतल्या एका चौपाटीवर शाहरुख आणि त्याच्या मित्राची गौरीशी भेट झाली.
तिथे भेटल्यावर शहरुखने पुन्हा गौरीला प्रपोज करत लग्नाची मागणी घातली. तेव्हासुद्धा गौरीने नकार दिला, कारण शाहरुखने अभिनय क्षेत्रात येऊ नये असं गौरीचं ठाम मत होतं, पण शाहरुखच्या आईच्या निधनानंतर गौरीनेच शाहरुखशी लग्न करायचा निर्णय घेतला आणि २५ ऑक्टोबर १९९१ मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले.
लग्न करण्याआधी फिल्म इंडस्ट्रीतल्या काही लोकांनी शाहरुखला असाही सल्ला दिला होता की “लग्न करू नकोस, कारण बॅचलर हीरोलाच जास्त फॅन फॉलोविंग मिळतं” पण तरी या सगळ्या गोष्टी बाजूला सारून त्याने गौरीशी लग्न केलं आणि आज त्यांच्या या लव्हस्टोरीचे इंडस्ट्रीत दाखले दिले जातात.
एक काळ असा होता की या तीन खानांनी संपूर्ण बॉलिवूडवर राज्य केलं. आजही त्यांचं नाणं खणखणीत वाजतं, पण नात्याच्या बाबतीत आमीरच्या नशिबी ‘लॉन्ग टर्म रिलेशनशिप’ कधीच आली नाही, सलमान नात्याच्या बाबतीत नापासच झाला, पण या दोघांच्या तुलनेत शाहरुखने त्याचं खासगी आयुष्य चांगलंच बॅलन्स केलं.
शाहरुख आणि गौरी यांच्यातसुद्धा इतर बॉलिवूड जोडप्यांप्रमाणे खटके उडले, मध्यंतरी प्रियंका चोप्राशी जवळीक वाढल्याने गौरी आणि शाहरुखमध्ये तणाव निर्माण झाला होता. पण आजकालची बॉलिवूड जोडपी ज्या झपाट्याने घटस्फोट घेतायत, तसं वेगळं न होता दोघांनी या गोष्टी खूप उत्तमरित्या हाताळल्या.
कदाचित शाहरुख आणि गौरी यांच्यातल्या याच समंजसपणामुळे ते आज एकत्र आहेत आणि तेवढेच खुश आहेत.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.