असं काय घडलं, की लसीकरण केलं सक्तीचं आणि पंतप्रधानच झाले गायब
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गेल्या दोन वर्षात जगाने कोव्हिडची नानारूपे पाहिली, अनेक नवीन व्हेरियंट पहिले. कोव्हिडमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनीची हेडलाईन असण्याची सुद्धा सवय झाली आहे. या विषाणूंच्या साथीने अनेक देशांचे समाजजीवन तसेच राजकारण ढवळून काढले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोव्हिड विरोधात लढायचे असेल तर लस हे प्रभावी शस्त्र आहे, हे जवळपास सर्वच देशांनी मान्य केले आहे. भारतात राबविण्यात आलेली लसीकरण मोहीम सर्वत्र कौतुकाचा विषय झाली, परंतु एका देशातील वातावरण मात्र या लसी वरून चांगलेच तापलेले दिसत आहे.
कॅनडामध्ये अलीकडेच लसीकरणाची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे कॅनेडियन नागरिकांना आता लस घेणे अनिवार्य झाले आहे, परंतु या निर्णयाला काही लोकांनी जोरदार विरोध केला आहे. कॅनडा मध्ये लसीकरणाविरोधात जे वातावरण तापले आहे त्याची झळ थेट पंतप्रधानांच्या घरापर्यंत पोहोचली आहे.
काही आंदोलकांनी कॅनडाची राजधानी ओटावा येथील पंतप्रधान निवासाला घेराव घातला. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टुद्रो यांच्या घराला चारी बाजूने घेरण्यात आले. परंतु त्याआधीच टुद्रो यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत एका अज्ञात स्थळी आपले बस्तान हलविले त्यामुळे त्यांना कोणतीही इजा झाली नाही.
फ्रीडम कान्वॉइ या नावाने ही मोहीम चालू असून, लसीकरणाची सक्ती आणि लॉकडाऊन विरोधात लोकांनी जोरदार निदर्शने केली आहेत.
ट्रक चालकांची ७० किमी लांब रांग –
कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अनुमानानुसार शनिवारी हजारो ट्रक ड्रायव्हर आणि आंदोलनकर्ते राजधानी ओटावा येथे जमा झाले. त्यानंतर सुमारे पन्नास हजार ट्रक चालकांनी त्यांच्या निवासस्थानाला चारी बाजूंनी घेराव घातला.
आंदोलकांनी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि विकलांग यांना सुद्धा सोबत आणले होते. त्यांना सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यांची मागणी एवढीच आहे, की लसीकरणाची सक्ती तसेच अजून काही आरोग्यविषयक निर्बंध हटवण्यात यावे. यावेळी पंतप्रधांनांना उद्देशून अश्लील शब्दात नारेबाजी सुद्धा करण्यात आली.
सैन्यातील अधिकाऱ्यांची निंदा –
कॅनडातील आंदोलनकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी यासाठी सैन्याला सुद्धा धारेवर धरले आहे. काही आंदोलकांनी नॅशनल वॉर मेमोरियल वर चढून नृत्य केल्याचे म्हटले जाते.
सैन्याची मानहानी झाल्याने कॅनडाचे उच्च सैन्याधिकारी जनरल वेन आइरे आणि कॅनडाचे संरक्षण मंत्री अनिता आनंद यांनी या कृतीचा निषेध केला आहे.
कडाक्याच्या थंडीची चेतावणी देऊन सुद्धा शेकडो लोक संसदेच्या आवारात घुसून हैदोस घालत आहेत. आंदोलकांचा रोष पाहता संभाव्य हिंसा टाळण्यासाठी कॅनेडियन पोलीस फोर्स सतर्क झाली आहे.
—
- बुस्टर डोसचा बहाणा; हा स्कॅम तुमचं बँक अकाऊंट रिकामं करू शकतो!
- अमेरिकेत दिल्या जाणाऱ्या ‘मॉडर्ना’च्या कोविड-१९ लसीमागेदेखील आहे भारतीय वंशाची व्यक्ती
—
ट्रक ड्रायव्हरचा एवढा रोष का???
पंतप्रधान जस्टिन टुद्रो यांनी लसीकरणावरील सक्तीबद्दल बोलताना ट्रक ड्रायव्हरला उद्देशून एक आक्षेपार्ह विधान केल्याचे म्हटले जाते. टुद्रो म्हणाले की, “हे ट्रक ड्रायव्हर फक्त देशासाठी नाही तर सगळ्यांसाठीच धोका आहेत”. त्यांचे हे वतव्य ट्रक चालकांच्या रोषाला कारणीभूत ठरले असून दिवसेंदिवस कॅनडामध्ये तणाव वाढताना दिसत आहे.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.