' ‘झुकेगा नाही’ हा डायलॉग हा शिवसेनेचाच बाणा, राऊतांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात? – InMarathi

‘झुकेगा नाही’ हा डायलॉग हा शिवसेनेचाच बाणा, राऊतांच्या विधानाशी तुम्ही सहमत आहात?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या देशभरात ‘श्रीवल्ली’वर रील्स करणाऱ्या किंवा ‘पुष्पा…पुष्पाराज’ म्हणत राऊडी लूकवर फोटो काढणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतीय. गेल्या महिन्यापासून अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या ‘पुष्पा’ सिनेमाची जादू थिएटरसह आता ओटीटी वरही दिसून येतीय.

एकंदरित गावातील कथा, रक्तचंदन  तस्करीवरून उसळलेले राजकारण, अल्लू अर्जूनचा राऊडी लूक, रश्मिकाचा गोडवा आणि वेड लावणारी गाणी हे समीकरण जुळून आल्याने पुष्पा प्रेक्षकांना आवडला नाही तरच नवल! मात्र आज हा सिनेमा एका वेगळ्याच कारणामुळे नव्याने चर्चेत आलाय.

 

pushpa 1 im

 

पुष्पा सिनेमाचे लोकप्रिय डायलॉग किंवा एक खांदा वर करून चालण्याची त्याची लकब या गोष्टी दिग्दर्शकाला नेमक्या कशा सुचल्या असतील? हा प्रश्न लाखो प्रेक्षकांना पडला, मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलंय.

 

pushpa featured IM

 

संजय राऊत यांच्या मते पुष्पा सिनेमातील ‘मै झुकेगा नही’ हा डायलॉग शिवसेनेवरून प्रेरित होऊनच सिनेमात घेण्यात आला आहे”.

आश्चर्य वाटलं ना? मात्र खुद्द राऊतांनीच हे विधान केलंय.

 

sanjay raut inmarathi

 

उत्तर प्रदेश निव़णूकीत शिवशेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आल्यानंतर शिवसेना पुन्हा एकदा पेटून उठली आहे. यंदा महाराष्ट्राबाहेर भगवा फडकवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनाला उत्तर प्रदेशात शर्यतीपुर्वीच हार पत्करावी लागली आहे. याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी शिवसेनेची भुमिका मांडली.

”झुकेगा नही” हा शिवसेनेचा बाणा गेल्या ५५ वर्षांपासून कायम आहे. कदाचित यावरून प्रेरित होत पुष्पा सिनेमात हा डायलॉग घेण्यात आला आणि तो लोकप्रियही ठरला. कशाला झुकायचं? कुणापुढे झुकायचं? शिवसेनेला झुकणं ठाऊक नाही. त्यामुळे काही उमेदवारांची उमेदवारी जरी रद्द झाली तरी आम्ही निवडणूक लढवणारच आणि जिंकणार हे नक्की! असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आता राऊतांच्या या वक्त्यव्यावर विरोधक निशाणा साधणार का? हे येत्या काळात ठरेल. महाराष्ट्रात भाजपची साथ सोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आधीच शिवसेनेने सत्तेसाठी बाणा सोडला, कॉंग्रेसचे पाय धरले अशा प्रकारच्या टिकांना पक्षाला सामोरं जावं लागलं होतं. आता त्यात ‘झुकेंगे नही’ म्हणणारे राऊत पुन्हा ट्रोल होणार का? राऊतांनी केलेले हे विधान तुम्हाला कसं वाटलं? महाराष्ट्राबाहेर शिवसेना आपला हा बाणा कायम राखू शकेल का? कमेंटव्दारे तुमचं मत नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?