Site icon InMarathi

‘भिकार मालिका बघून वेळ फुकट घालवू नका, चॉईस तपासा’; विक्रम गोखलेंचे आवाहन

vikram gokhale im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मालिका हा प्रत्येक घरात जिव्हाळ्याचा विषय. संध्याकाळी सात वाजले, की घरोघरी ओळीने मालिका होतात. ‘आमच्या काळी उत्तम कथानक असलेल्या मालिका असायच्या, आता मालिकांचा दर्जा घसरत चालला आहे.’ असे डायलॉग तुम्ही अनेकांकडून ऐकले असतील.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीसुद्धा असंच काहीसं मत रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना मांडलं. मराठी प्रेक्षकांना त्यांनी एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. ‘प्रेक्षकांनो, भिकार मालिका बघणं बंद करा. स्वतःचा चॉईस तपासून बघा.’ असं ते म्हणाले.

 

 

बऱ्याचदा असं घडतं, की चॅनेल म्हणतं, प्रेक्षकांनाच या मालिका आवडतात, म्हणून आम्ही त्या देतो आणि प्रेक्षक म्हणतात, की अशाच मालिका सगळ्या चॅनेल्सवर दिसतात आणि म्हणून त्याचा बघाव्या लागतात. हे वर्तुळ न संपणारं आहे. यावर विक्रम गोखले म्हणाले, ‘प्रेक्षकांनी अशा मालिका बघणं बंद करा. प्रेक्षकांनी या मालिका बघणं बंद केलं, की आपसूकच त्यावर बंदी येईल आणि मालिका बंद झाल्या की असे चॅनल्सही बंद होतील.’

पैशांसाठी अगदी अर्थहीन, सुमार मालिका प्रेक्षकांच्या माथी मारल्या जातात. कशाचीही भर घालून मालिका उगाच वाढवल्या जातात. अशा भिकार मालिका बघू नका, ही विनंती विक्रम गोखले यांनी प्रेक्षकांना केली. ‘तुमचा चॉईस तपासा, त्यावर बंधने घाला. उगाच वाढवलेल्या मालिका बघून काय मिळतं? तुमचा अमूल्य वेळ या गोष्टींमध्ये वाया घालवू नका.’ अशी विनंती त्यांनी केली.

‘ज्या गोष्टींमधून काहीतरी शिकायला मिळतंय, अशाच गोष्टी करा. उत्तम वाचा, उत्तम बघा आणि उत्तम अनुभवा. हजारो चॅनल्समधून जे चांगलं तेच बघा.’ असंही ते म्हणाले.

यावेळेस नागराज मंजुळे यांच्या ‘वैकुंठ’ या फिल्मचं त्यांनी कौतुक केलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version