पोलिसांकडून वाईट वागणूक मिळूनही सिस्टीमला शिव्या न घालता तो बनला गुंडांचा कर्दनकाळ!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
पोलिसाची नोकरी म्हणजे एक निराळाच रुबाब असतो. खाकी वर्दी घातलेला पोलीस पाहिला, की एक आदरयुक्त भीती आपोआपच निर्माण होते. पोलिसांचा तो रुतबा, रुबाब, जरब पाहिली की ती भीती, तो आदर नेमका का आहे, हे अगदी सहजपणे सांगता येतं. पण नेहमीच पोलिसांचं चांगलंच वागणं सगळ्यांच्या अनुभवाला येत नाही.
कधी कळत-नकळतपणे पोलीसदेखील गरजेहून अधिक कठोर वागतात. कधी आजूबाजूच्या परिस्थितीला कंटाळून, कधी आयुष्यात मिळत नसलेली उसंत, सततचा त्रास याचा राग सामान्य माणसांवर निघतो.
असाच काहीसा अनुभव एका तरुणाला आला, आणि त्यानंतर जे झालं, ते मात्र फारच आश्चर्यकारक होतं. नेमकं काय घडलं होतं आणि या अनुभवामुळे पेटून उठून त्याने नेमकं काय केलं, ते बघुयात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
पहिल्याच प्रयत्नात आयपीएस आणि…
पोलीस खात्यात दाखल होणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, हे तर आपल्याला माहीतच असतं. उत्तरप्रदेश पोलिसांत भरती झालेला नवनीत सिकेरा मात्र याला अपवाद ठरला असं म्हणायला हवं.
त्यावर्षी त्यानं आयपीएसची परीक्षा देण्याचं ठरवलं, त्याच वर्षी पहिल्याच प्रयत्नात तो चक्क आयपीएस झाला. दोन वर्षांतच मेरठमध्ये एएसपीच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सायकल रिक्षा चालवणाऱ्याचा फोटो
नवनीत याने सोशल मीडियावर टाकलेला एक फोटो चांगलाच चर्चेत आला होता. दिवाळीत शेअर केलेल्या या फोटोमध्ये, एक वयस्कर व्यक्ती सायकल रिक्षासोबत दिसत आहेत. आपल्या सायकल रिक्षेवर मेणबत्ती लावणाऱ्या या व्यक्तीच्या फोटोला ‘दिवाळीतील सर्वोत्तम फोटो’ असं कॅप्शन दिलेलं आहे.
अशाच गरजू आणि सर्वस्व गमावलेल्या व्यक्तींना मदत करायला आणि त्यांच्य्यासाठी काम करायला आवडत असल्याचं नवनीत नेहमीच म्हणतो.
इंग्रजी येत नाही म्हणून…
मुलांच्या शाळेत दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या नवनीत यांनी दिल्लीमधील हंसराज कॉलेजात पुढील शिक्षण घेण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यांना इंग्रजी येत नाही, असं कारण देत ऍडमिशन फॉर्मच देण्याचं नाकारलं गेलं.
–
- डॉक्टरकी सोडून ‘ती’ बनली जम्मू काश्मीरमधील पहिली ‘महिला’ IPS ऑफिसर..
- गुन्हेगारांना पकडण्यात तरबेज असलेले दिल्ली पोलिसांचे पाच खास “स्टार कॅचर्स”
–
हा अपमान त्यांना सहन झाला नाही. मात्र खचून न जाता त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच घरच्याघरी अभ्यास केला.
मोठ्या मेहनतीने अभ्यास करून त्यांनी आयआयटीची परीक्षा पास केली. आयआयटी रुरकीमध्ये ऍडमिशन घेऊन त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं.
वडिलांचा अपमान झाला म्हणून…
इंजिनियरिंगच्या क्षेत्रात पदवी प्राप्त केल्यानंतर आयआयटी दिल्ली मध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. इंजिनियरिंग क्षेत्रातच पुढचं शिक्षण घेऊन नोकरीधंदा करण्याचं ठरवलं होतं. मात्र नियतीला हे मान्य नसावं बहुदा.
त्याच्या वडिलांचा झालेला अपमान, एक अत्यंत वाईट अनुभव त्याला तो आज जिथे आहे तिथे घेऊन आला असं म्हणायला हवं. त्याच्या वडिलांना फोन करून धमकावलं जात होतं. साहजिकपणे याविरोधात त्यांनी पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांनी मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. याउलट त्यांनी नवनीतच्या वडिलांना अपमानित करून, तिथून जाण्यास भाग पाडलं.
न्याय न मिळाल्याने आणि त्यातही अपमान झाल्याने ते दुखावले गेले. नवनीतला सुद्धा वडिलांचा हा अपमान जिव्हारी लागला आणि त्यांनी एमटेक करण्याचा निर्णय बाजूला सारत सिव्हिल सर्विसेसमध्ये शिरण्याचा निर्णय घेतला.
भौकाल या वेब्सिरीजची निर्मिती :
नवनीत सिकेरा यांच्या आयुष्यावर आधारित एका वेब सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे. भौकाल असं या वेब सिरीजचं नाव असून, एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरीज पाहता येईल. मोहित रैना या अभिनेत्याने नवनीतची भूमिक साकारली आहे.
लखनऊ आणि मुजफ्फरनगरमधील गॅंग वॉर संपवण्याचं काम नवनीत सिकेरा यांनी धाडसीपणे आणि मोठ्या शिताफीने केलं होतं. या वेब सिरीजमध्ये अशाच प्रकारचं कथानक दाखवण्यात आलं आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.