Site icon InMarathi

या टिप्स वापरल्या तर तुमच्या हातचा चहा पिऊन सगळे म्हणतील, ‘चहा असावा तर असा’

great indian kitchen IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चहा ही रोजची गरज तर असतेच. पण कुठलंही निमित्त असो, “इस बात पे एक चाय हो जाये”असं म्हणतो आपण. दुपारी काम करताना झोप उडवण्यावरचा रामबाण उपाय असतो चहा.

चहाचा एक गरमगरम घोट घश्याखाली उतरला की आपण पुढचे बरेच तास काम करायला तरतरीत होऊन जातो. घरी आलेल्या पाहुण्यांनी बाकी काही खाल्लं किंवा नाही खाल्लं तरी चहा घेतल्याशिवाय आपण त्यांना सोडत नाही.

 

 

सच्चा चहाप्रेमींना घरच्याघरी बनवलेला चहा, टपरीवरचा चहा, हॉटेलातला चहा अश्या कुठल्याच चहाचं वावडं नसतं. घरी कुणाला सर्दी-खोकला असेल तर चहा लागतोच लागतो. पण गंमत अशी आहे की तीच सामग्री वापरून आपण बनवलेला चहा रोज मात्र वेगळा होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कधी साखरच जास्त पडते, तर कधी चहाच कडू होतो. कधी दूधच जास्त पडतं तर कधी चहा पातळच होतो. एखाद्याच्या चहाची चव, रंग रोज तसाच येत असेल तर सगळे त्या व्यक्तीचं कौतुक करतात. पण हे ‘फक्कड चहा’ जमून येणं आपल्यातल्या बऱ्याचजणांना साधतंच असं नाही.

आपण सगळेच जण चहा करतो. पण तुमचा चहा जर सगळ्यांपेक्षा उत्तम व्हायला हवा असेल तर या टिप्स वापरून तो जरूर बनवा.

१. ६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चहाची पात उकळू नका –

 

 

आपल्या प्रत्येकाला वेगवगेळ्या प्रकारे चहा आवडतो. कुणाला कडक चहा लागतो, कुणाला मध्यम तर कुणाला फिका. पण साधारणपणे ६ मिनिटं चहापत्ती पाण्यात उकळली तर पत्तीचा अर्क पाण्यात व्यवस्थित उतरतो. त्यानंतर त्यात योग्य प्रमाणात साखर आणि दूध घाला.

तुम्हाला जसा चहा हवाय त्यानुसार तुम्ही चहापत्ती निवडली पाहिजे. जर तुम्हाला लाइट चहा आवडत असेल तर पत्तीदार चहापत्ती वापरा.

जर तुम्हाला कडक चहा हवा असेल तर बारीक चहापत्ती वापरा. जर तुम्हाला फार कडक किंवा फार फिका चहा नको असेल, मध्यम चहा हवा असेल तर दाणेदार चहापत्तीचा वापर करा.

२. साखरेवर मारा फुली –

 

 

साखर घातलेला चहा कुणाला आवडत नाही! पण तो आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही. अश्यावेळी चहामध्ये साखरेऐवजी मध, गूळ, ब्राऊन शुगर, ज्येष्ठमध घालणं उपयुक्त ठरतं.

त्यामुळे चहाला गोडवाही येतो आणि या पदार्थांमुळे चहाची चव साखर घातलेल्या चहापेक्षा वेगळीच येते.

३. औषधी वनस्पती चहात एकत्र कुटून घाला –

 

आपण साधारणपणे आलं, वेलची, तुळस यांचा चहात वापर करतो. पण बहुतेकांना चहात आलं किसून घालायची सवय असते. आलं चहात किसून घालण्याऐवजी आलं, वेलची, तुळस एकत्र बारीक कुटून ते उकळत्या पाण्यात घाला.

अर्धा इंच आल्याचा तुकडा, २ वेलची, ३-४ तुळशीची पानं असं प्रमाण घ्या. तुळस आवडत नसेल तर त्याऐवजी २ लवंगा आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा कुटून घाला.

या सगळ्या औषधी वनस्पतींच्या एकत्रित मिश्रणामुळे तुमच्या चहाला तुमच्या नेहमीच्या चहापेक्षा नक्कीच वेगळा स्वाद येईल.

४. चहापत्तीमध्ये आधीच वेलची, लवंग घालून ठेवू नका –

 

 

अनेकांना चहा करताना वेलची, लवंग घालायला नको म्हणून आधीच चहापत्तीच्या डब्यात वेलची, लवंग घालून ठेवायची सवय असते. पण त्यामुळे होतं असं की ना घड चहाचा वास तसा राहतो ना वेलची लवंगेचा.

तुम्हाला जर चहाचा आणि वेलची, लवंगेचा सुगंध टिकवून ठेवायचा असेल तर असं करणं टाळाच. चहा करतानाच वेलची, लवंग स्वतंत्रपणे चहात घाला. तुमचा चहा मस्त होईल.

५. दाटसर आणि छान फेसाळता चहा बनवा –

 

 

टपरीवर बनवल्या जाणाऱ्या चहाच्या बाबतीत एक गोष्ट तुम्ही हमखास पाहिली असेल. चहा बनवणारी व्यक्ती सारखा चहा ढवळत असते आणि एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात चहा ओतताना थोड्या उंचीवरूनच तो चहा ओतत असते.

यामुळे चहा छान दाटसर आणि फेसाळता होतो. तुम्ही घरी चहा करताना तो सतत चमच्याने ढवळत राहून आणि दुसऱ्या भांड्यांमध्ये ओतताना चहा थोड्या उंचीवरून ओतून चहा असा घट्ट आणि फेसाळता बनवू शकता.

६. वाळलेल्या लिंबाच्या तुकड्यांचा वापर –

 

 

आपल्याकडे लेमन टीदेखील आवडीने प्यायला जातो. साधारणपणे लोक त्यात मसाला पावडरचा वापर करतात. पण वाळलेलं लिंबू चहात घातलं तर चहाला मस्त चव येते. अरबी चहामध्ये वाळलेल्या लिंबाचा वापर करतात. चहापत्ती पाण्यात उकळून त्यात वाळलेल्या लिंबाचे २ तुकडे घाला.

चांगली उकळी आली की त्यात साखर घाला. अगदी झकास अरेबिक-लेमन टी बनेल. यात दूध घालायची आवश्यक्ता नाही. तरीही जर तुम्हाला दूध घालायचंच असेल तर ते अगदी शेवटी घाला.

आपल्याला चहाची इतकी सवय झालीये की एखाद् वेळेस चहा वेळेवर नाही मिळाला तर आपण कमालीचे बेचैन होतो.

चहा हा सगळ्यांसाठी स्वस्त आणि मस्त मूड मेकर आहे. करून करून सवयीने चहा छान होतोच. पण या वरच्या टिप्स वापरल्यात तर तुमच्या हातचा चहा प्यायलेलं कुणीही म्हणेल, “वाह! चहा असावा तर असा!”

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version