Site icon InMarathi

भारतातील अशीही एक नदी जी फ्री मध्ये देते सोनं! ही कोणतीही अफवा नाही हे १००% खरं आहे!

Swarna-Rekha-Nadi-marathipizza00

vigyanam.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखाद्या नदी विषयी ही गोष्ट ऐकणे थोडं वेगळे वाटते, परंतु विश्वास ठेवा आपल्या देशामध्ये एक अशी नदी आहे जिच्या वाळूमधून शेकडो वर्षांपासून सोने काढले जात आहे, पण इतर कोणत्याही नदीच्या वाळूमध्ये न मिळणारे सोन्याचे कण याच नदीमध्ये कसे काय मिळतात हे मात्र आजही न उलगडलेलं कोड आहे.

ajabgjab.com

भूशास्त्रज्ञांचे मानने आहे की, नदी सर्व खडकांमधून वाहते. त्याचवेळी घर्षणामुळे सोन्याचे कण त्यामध्ये मिसळतात. ही नदी देशाच्या झारखंड, पश्चिम बंगाल आणि उडीसा मधील काही परिसरात वाहते. नदीचे नाव स्वर्ण रेखा आहे. काही ठिकाणी हिला सुबर्ण रेखाच्या नावाने ओळखले जाते. नदीचा उगम रांचीपासून जवळपास १६ किमी दूर आहे. हिची एकूण लांबी ४७४ किमी आहे.

स्वर्ण रेखा आणि तिची एक उपनदी ‘करकरी’च्या वाळूमध्ये सोन्याचे कण मिळतात. काही लोकांचे म्हणणे आहे की, स्वर्ण रेखा मध्ये सोन्याचे कण करकरी नदीमधूनच वाहून येतात. तुम्हाला सांगू इच्छितो की, करकरी नदीची लांबी फक्त ३७ किमी आहे. त्यामुळे हा दावा तितकासा ठोस वाटत नाही. आजही लोक याचा शोध लावण्यात गुंतले आहेत की, या दोन्ही नद्यांमध्ये शेवटी कुठून सोन्याचे कण येतात.

gyanpanti.com

झारखंड मधील तमाड आणि सारंडा सारख्या जागांवर नदीच्या पाण्यामध्ये स्थानीक आदिवासी, वाळू चाळून सोन्याचे कण बाहेर काढण्याचे काम करतात. पुरुष, महिला आणि मुले- घरातील प्रत्येक सभासदाच्या रोजच्या जीवनाचा हा भाग आहे. येथील आदिवासी कुटुंबातील कित्येक सदस्य, पाण्यामध्ये वाळू चाळून दिवसभर सोन्याचे कण काढतात. सहसा एक व्यक्तीने, दिवसभर काम केल्यानंतर सोन्याचे एक किंवा दोन कण मिळतात.

ajabgjab.com

नदी मध्ये सोने चाळण्यासाठी खूप धैर्य आणि मेहनतीची आवश्यकता असते. एक व्यक्ती महिन्याभरात ६० ते ८० सोन्याचे कण काढतो. परंतु एखाद्या महिन्यात ही संख्या ३० ने कमी पण होऊ शकते. हे कण तांदळाच्या दाण्याएवढे किंवा त्यापेक्षा थोडे मोठे असतात. वाळूमधून सोन्याचे कण चाळण्याचे काम वर्षभर चालते. फक्त पुराच्या काळात दोन महिन्यांपर्यंत हे काम बंद असते.

वाळूतून सोने काढणाऱ्यांना एका कणाच्या मोबदल्यात ८० ते १०० रुपये मिळतात. एक माणूस सोन्याचे कण विकून महिन्याभरात ५ ते ८ हजार रुपये कमावतो, परंतु बाजारात या एका कणाची किंमत जवळपास ३०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त आहे. स्थानिक दलाल आणि सोनार सोने काढणाऱ्या लोकांकडून हे कण खरेदी करतात. असे म्हणतात की, येथील आदिवासी कुटुंबाकडून सोन्याचे कण खरेदी करणारे दलाल आणि सोनारांनी या व्यवसायातून कोटींची संपत्ती बनवली आहे.

thehook.news

स्वर्ण रेखा नदी तीन राज्यांमधून वाहते. झारखंडच्या ज्या परिसरात सोन्याचे कण काढण्याचे काम केले जाते, तो दाट जंगलाचा भाग आहे. हा भाग नक्षलवाद्यांचा गड म्हणून प्रसिद्ध आहे. भलेही सोन्याचे कण काढणाऱ्या आदिवासी लोकांना या कामातून काहीही उत्पन्न मिळत नसले, तरी त्यांचे आर्थिक शोषण करून येथील धनदांडगे अधिक धनवान होत आहेत, जी अतिशय खेदाची गोष्ट आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version