‘पहिला नेत्रहीन राष्ट्रपती होईन’ कलमांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी तो करतोय अथक प्रयत्न
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
—
राजकुमार रावच्या अगामी चित्रपटाची घोषणा झाली आणि एक नाव चर्चेत आलं, श्रीकांत बोल्ला. सुमित पुरोहित आणि जगदीप सध्दू यांनी लिहिलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण या वर्षीच्या जुलैमधे चालू होईल.
श्रीकांत बोल्ला यांच्या भूमिकेत आहे नव्या पिढीतला गुणी अभिनेता, राजकुमार राव. यात तो अंध व्यावसायिकाची, श्रीकांत बोल्ला यांची भूमिका साकारणार आहे. कोण आहे श्रीकांत बोल्ला? जाणून घेऊ..
प्रत्येक तरूणानं प्रेरणा घ्यावं असं त्याचं व्यक्तिमत्व आणि आयुष्य. दहावी बारावीत नापास झालं म्हणून नैराश्याच्या भरात भलतं पाऊल उचलणारी मुलं, करियरमधे अपेक्षित यश मिळत नाही म्हणून निराश होणारी तरूण मुलं या सगळ्यांना आपल्या कर्तुत्वानं ज्यानं आशावाद दिला असा तरूण उद्योजक, श्रीकांत बोल्ला.
श्रीकांतची यशोगाथा भल्याभल्यांना थक्क करणारी आहे. हातपाय धड असताना, आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही छोट्याशा अपयशानं खचून जाणार्यांसाठी तर श्रीकांतची कथा खूपच प्रेरणादायी ठरेल.
जन्मजात दृष्टीहीन जन्मलेल्या श्रीकांतच्या पालकांना बाळाला अनाथ आश्रमात सोडून देण्याचा सल्ला अनेकांनी दिला होता आज हे दृष्टीहीन बाळ करोडो रुपयांची उलाढाल करणारा यशस्वी उद्योजक बनला आहे आणि पालकांचा अभिमानही.
आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणममधे १९९२ साली श्रीकांतचा जन्म एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडील दामोदर राव आणि आई व्यंकटाम्मा यांच्या पोटी जन्मलेल्या या अंध मुलाला बघून अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
आईवडिलांनाही आपल्या पोटी असा मुलगा जन्माला आला याचं दु:ख वाटत होतं. आधीच हातातोंडाची गाठ असलेल्या या कुटुंबात एक अंध मुलगा वाढविणं अडचणीचं होणार होतं. अनेकांनी या दांपत्याला सल्ला दिला, की या बाळाला अनाथ आश्रमात सोडून यावं. मात्र या दांपत्यानं अशा सल्ल्याकडे डोळेझांक करुन श्रीकांतला मनापासून वाढविलं.
त्याला वाढविण्याचा या तिघांचा संघर्ष आज त्यांना जगभरात ओळख मिळवून देणारा ठरला आहे. लहानपणापासूनच श्रीकांतचा लढा सोपा नव्हता मात्र आईवडिलांचा संघर्ष करण्याचा, हार न मानण्याचा स्वभाव श्रीकांतमधेही पूरेपूर उतरला आहे.
खास अंध शाळेत घालण्याची ऐपत आणि तितकी जाण न सणार्या श्रीकांतच्या आईवडिलांनी त्याला सामान्यांच्या शाळेतच घातलं. इथे त्याला वर्गात सर्वात शेवटी बसवलं जात असे. आईवडिलांना श्रीकांतमधली हुशारी दिसली होती आणि या अशिक्षित आईवडिलांनी श्रीकांतसाठी कायम लढा दिला. मग तो लढा व्यवस्थेशी असो वा सरकारशी.
बुध्दीनं तल्लख अशा श्रीकांतला बारावीच्या परिक्षेत ९८ टक्के गूण मिळवत सर्वांना चकीत केले. इतकं होऊनही समाजाचा अद्याप त्याच्या क्षमतेवर विश्र्वास नव्हताच. प्रत्येक पावलावर त्याला मदत मिळणं तर दूर पण त्याच्यासाठी सतत अडथळ्यांची शर्यतच समोर उभी होती.
—
- वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!
- या टिप्स वापरल्यात तर आयुष्यात दररोज नव्याने भेडसावणाऱ्या समस्यांतून सहज मार्ग काढता येईल
—
प्री युनिव्हर्सिटी परिक्षेनंतर श्रीकांतनं आय आय टी स्वप्नाचा पाठपुरावा करण्यास सुरवात केली. जेईईसाठी आवश्यक असणार्या प्रवेश परिक्षेला पार करण्यासाठी ज्या कोचिंग संस्था असतात त्यांनी श्रीकांतला प्रवेश नाकारला. या अडथळ्यांनी निराश न होता श्रीकांतनं प्रतिष्ठीत अशा एमआयटी, यूएस आधारित तंत्रज्ञान शाळांत अर्ज दाखल केला. यात त्याची निवडही झाली आणि एमआयटीचा पहिला भारतीय अंध विद्यार्थी बनला इतकंच, नव्हे तर तो या शाळेचा पहिला आंतरराष्ट्रीय अंध विद्यार्थी देखील बनला.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खरंतर श्रीकांतला अमेरिकेतच उत्तम कमाईची संधी होती मात्र तो मायदेशी परत आला. भारतात परतल्यानंतर २०१२ साली त्यानं बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली. त्याची हुशारी रतन टाटा यांच्या नजरेस आली आणि त्यांनी त्याला केवळ मार्गदर्शनच केले नाही तर त्याच्या व्यवसायात गुंतवणूकही केली.
आज पॅकेजिंग सोल्यूशन्स बनविणारी बोलंट इंडस्ट्रीज पाच कारखान्यांसहित कोट्यवधीची उलाढाल करणारी कंपनी बनली आहे. २०१७ साली फ़ोर्ब्जच्या यादीत ३० वर्षाखालील ३० आशियायी लोकांत फ़क्त तीन भारतियांचा समावेश होता त्यात श्रीकांतचं एक नाव होतं.
२००६ साली एका कार्यक्रमात माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांनी संबोधित केलेल्या विद्यार्थ्यांत श्रीकांतही होता. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला होता, की तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे? यावर श्रीकांतनं आत्मविश्र्वासानं उत्तर दिलं होतं की, मला भारताचा पहिला दृष्टीहीन राष्ट्रपती बनायचे आहे. श्रीकांतची धडाडी बघता त्याचं हे स्वप्नदेखील लवकरच पूर्ण होईल.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.