' जगात केवळ “तीनच” लोकांकडे असलेला exclusive पासपोर्ट! – InMarathi

जगात केवळ “तीनच” लोकांकडे असलेला exclusive पासपोर्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पासपोर्ट म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात फिरण्याचे तिकीटच म्हणा ना, हे तिकीट तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला देशाबाहेर जाण्याची परवानगी मिळणारच नाही, म्हणून तर एयरपोर्टवर गेल्यावर सगळ्यात पहिला पासपोर्ट विचारतात.

 

indian-passport-marathipizza
springfieldtravels.com

अश्या या महत्त्वपूर्ण पासपोर्टचे कोणत्याही देशाच्या नागरिकासाठी किती महत्त्व आहे हे तुम्हाला अजून वेगळ्याने सांगायची गरज नाही. केवळ प्रवासासाठीच नाही तर एक महत्त्वपूर्ण ओळखपत्र आणि कागदपत्र म्हणून देखील पासपोर्टचे महत्त्व अधिक आहे.

एवढच नाही तर या पासपोर्टने प्रत्येक देशाच्या ताकदीची ओळख होते.

अनेकांना असे वाटत असेल की सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा अमेरिका किंवा फार फार तर रशियाचा असेल, कारण हे दोनच देश आज जगात सगळ्यात आघाडीवर आहेत. पण मित्रांनो तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जगातील सगळ्यात शक्तिशाली पासपोर्ट आहे जर्मनीचा!

 

german-passport-marathipizza
usatoday.com

जर्मन नागरीक २१८ पैकी १७६ देशांमध्ये विना व्हिसा प्रवेश करू शकतात. आहे की नाही मस्त! इतर कोणत्याही देशाच्या नागरिकाला एवढ्या प्रमाणात सूट मिळत नाही.

हा झाला शक्तिशाली पासपोर्ट, पण तुम्हाला माहित आहे का शक्तिशाली पासपोर्ट व्यतिरिक्त जगात एक खास म्हणजेच Exclusive पासपोर्ट आहे, ह्याचा वापर जगातील केवळ ३ व्यक्तीच करू शकतात. आहे की नाही रंजक गोष्ट?! चला जाणून घेऊया या अतिशय खास पासपोर्टबद्दल….

माल्टा देशाच्या The Sovereign Military Order ने एक Exclusive पासपोर्ट जारी केला आहे, हा पासपोर्ट यासाठी Exclusive आहे कारण हा पासपोर्ट केवळ ३ व्यक्तींनाच दिला गेला आहे.

 

exclusive-passport-marathipizza01
aladinsmiraclelamp.wordpress.com

The Sovereign Military Order ही एक ख्रिश्चन धर्माची चॅरीटेबल संस्था आहे. जी संपूर्ण जगभरामध्ये मेडिकल सहाय्य पुरवते आणि विशेष गोष्ट म्हणजे या संस्थेला कोणत्याही देशाच्या सीमेचं बंधन नाही. हा पासपोर्ट Catholic Order चे ग्रँड मास्टर, डेप्यूटी ग्रँड मास्टर आणि चान्सलर यांना देण्यात आला आहे.

 

exclusive-passport-marathipizza02
thesun.co.uk

पाहायला गेलं तर या स्पेशल पासपोर्टला अधिकृतपणे ११३ व्या शतकातच Pope Paschal यांनी मान्यता दिली होती. साधारणपणे पासपोर्टचा रंग हा निळा असतो, पण या पासपोर्टचा रंग मात्र लाल आहे.

 

exclusive-passport-InMarathi

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?