Site icon InMarathi

संगीतविश्वाला अजून एक धक्का; पद्मश्री नाकारणाऱ्या सुप्रसिद्ध बंगाली गायिकेचे निधन

Sandhya Mukhopadhyay im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पुरस्कार नाकारणे’ हे सध्या पुरोगामी विचारसरणीचं लक्षण समजलं जातं. सरकारबद्दल, देशाबद्दल तुमच्या मनात काही राग असेल तर एक तर तुम्हाला मिळालेला पुरस्कार परत करा किंवा तुम्हाला घोषित झालेला पुरस्कार स्वीकारण्यास नकार द्या. समाजव्यवस्थेवर तुमच्या मनात असलेला राग व्यक्त करण्यासाठी मध्यंतरी काही लोकांनी ‘पुरस्कार’ हे शस्त्र म्हणून वापरलं होतं हे आपल्याला माहीतच आहे.

नुकतंच पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेब भट्टाचर्जी, अनिंद्या चटटोपाध्याय आणि सुप्रसिद्ध बंगाली गायिका ‘संध्या मुखर्जी’ यांनी यावर्षी घोषित झालेला ‘पद्मश्री’पुरस्कार नाकारला आहे. भारत सरकारकडून आलेल्या फोनवर आपल्याला घोषित झालेला पुरस्कार नाकारणे ही खरं तर साधी गोष्ट नाहीये.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

‘पुरस्कार कोणाला मिळाला ?’ यापेक्षा तो कोणी नाकारला ? आणि का ? याची नेहमीच उत्सुकता असलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाने यावर्षी देखील हा मुद्दा उचलून धरला आहे. बंगाल मधील या तिन्ही व्यक्तींनी ‘पद्मश्री’ हा प्रतिष्ठित पुरस्कार का नाकारला ? यामागची कारणं ही राजकीय आहे की वैयक्तिक ? हे जाणून घेऊयात.

‘पद्मश्री’ हा भारताचा बहुमान समजल्या जाणाऱ्या पुरस्काराची दरवर्षी २५ जानेवारी २०२२ रोजी घोषणा करण्यात येते. यावर्षी १७ माननीय व्यक्तींना यावर्षी हा पुरस्कार घोषित करण्यात आला होता. पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्तींपैकी ‘संध्या मुखर्जी’ यांच्या पुरस्कार नाकारण्याचं कारण फक्त समोर आलं आहे.

९० वर्षीय संध्या मुखर्जी या मागील ८ दशकांपासून संगीत सृष्टीची सेवा करत आहेत. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनिल विश्वास, मदन मोहन आणि एस डी बर्मन सारख्या संगीतकरांच्या रचनांना आपला आवाज दिला आहे.

पश्चिम बंगाल सरकारने त्यांना ‘बंग विभूषण’ या पुरस्काराने २०११ मध्ये सन्मानित केलं आहे. एका मुलाखतीत संध्या मुखर्जी यांनी “‘बंग विभूषण’ हाच आपल्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे ‘पद्मश्री’ नाकारणं यामागे एक कडवट प्रांतवाद देखील असू शकतो.

 

 

संध्या मुखर्जी यांच्या घरी जेव्हा पद्मश्री पुरस्कारावर काम करणाऱ्या दिल्लीच्या संबंधित कार्यालयाकडून फोन गेला तेव्हा त्यांची मुलगी सौमी सेनगुप्ता हिने तो फोन उचलला. “माझ्या आईला ‘पद्मश्री’ स्वीकारण्याची इच्छा नाहीये” असा स्पष्ट नकार सौमी सेनगुप्ता यांनी फोनवर संबंधित अधिकाऱ्यांना कळवला.

दिल्लीच्या अधिकाऱ्याने जेव्हा पुरस्कार नाकारण्याचं कारण काय आहे ? असा प्रश्न विचारला तेव्हा संध्या मुखर्जी यांनी सांगितलं की, “पद्मश्री हा पुरस्कार नवोदित कलाकारांसाठी आहे. ९० व्या वर्षी हा पुरस्कार एखाद्या कलाकाराला घोषित होत असेल तर तो त्या कलाकार आणि पुरस्कार दोघांचाही अपमान आहे.” हे कारण कितपत खरं आहे याची शहानिशा अजून झाली नाहीये.

कोण आहेत संध्या मुखर्जी?

१९६० आणि ७० च्या दशकात संध्या मुखर्जी यांनी १७ हिंदी गाण्यांसाठी गायन केलं होतं. त्यानंतर त्यांनी श्यामल गुप्ता यांच्यासोबत विवाह करून कोलकत्ता येथे स्थायिक होणं पसंत केलं होतं.

बांगलादेश स्वातंत्र्य संग्रामात संध्या चौधरी यांनी भाग घेतला होता. समर दास या संगीतकाराला त्यांनी ‘स्वाधीन बांगला बेटार केंद्र’ हे रेडिओ स्टेशन सुरू करण्यासाठी मदत केली होती.

 

 

बांग्लादेशची स्थापना होण्याचं औचित्य साधून त्यांनी एक गीत सुद्धा गायलं होतं. १९७१ मध्ये बांग्लादेशची राजधानी ढाका येथे जाऊन आपला गाण्याचा कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय कलाकार आहेत.

संध्या मुखर्जी यांची मुलगी सौमी सेनगुप्ता यांनी पुरस्काराला नकार कळवतांना हे देखील सांगितलं होतं की, “कृपया करून माझ्या आईच्या पुरस्कार नाकारण्याला कोणताही राजकीय पैलू जोडू नका. संध्या चौधरी यांच्या चाहत्यांना सुद्धा त्यांनी या वयात पद्मश्री स्वीकारणं आवडणार नाही.”

 

 

पद्मभूषण पुरस्कार घोषित झालेल्या बुद्धदेब भट्टाचर्जी यांनी आपला नकार कळवतांना हे सांगितलं की, “मला हा पुरस्कार घोषित झाला आहे हे फार उशिरा कळलं. अन्यथा, मी हा पुरस्कार स्वीकारला असता आणि राष्ट्रपती भवनात हजर राहिलो असतो. ” सरकारी यंत्रणेकडून इतक्या प्रतिष्ठित पुरस्काराबद्दल अशी चूक होऊ शकते असं आजपर्यंत कधी घडलेलं ऐकिवात नाहीये.

२००० ते २०११ या काळात बुद्धदेब भट्टाचर्जी हे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टीचा चेहरा असलेले बुद्धदेब भट्टाचर्जी यांचा जन्म १ मार्च १९४४ रोजी उत्तर कोलकत्ता मध्ये झाला होता. त्यांचं वडिलोपार्जित घर हे बांगलादेश मध्ये आहे.

 

१९६६ मध्ये बुद्धदेब यांनी राजकारणात प्रवेश केला होता. १९७७ मध्ये ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’च्या तिकीटावरून त्यांनी सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक जिंकली होती. २००० साली ते ज्योती बसू यांच्यानंतर पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले होते. आपल्या मुख्यमंत्री कारकिर्दीत त्यांनी औद्योगिकरण करण्यावर जोर दिला आणि सिंगुर येथे टाटा नॅनोचा प्रकल्प उभारण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलं.

४० वर्ष कम्युनिस्ट पक्षात कार्य केलेल्या बुद्धदेब भट्टाचर्जी यांना कदाचित त्यांची ‘पद्मभूषण’ साठी झालेली निवड होणे आणि हा पुरस्कार स्वीकारणे हे केंद्र सरकार मध्ये सत्तेत असलेल्या भाजपाचं समर्थन होईल असं कदाचित वाटलं असावं असंही राजकीय विश्लेषक सध्या बोलत आहेत.

कोणताही पुरस्कार नाकारतांना किंवा परत करताना घेतलेली भूमिका ही त्या व्यक्तीच्या पूर्व आयुष्यातून आलेली असते. पश्चिम बंगाल मधील या दोन्ही व्यक्तींनी पद्मश्री, पद्मभूषण नाकारण्यामागे हे असाच कोणतातरी विचार असावा हे नक्की.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात लोकनियुक्त सरकारने घोषित केलेल्या पुरस्कारांचा लोकांनी आदर करावा ही अपेक्षा सामान्य नागरिक अशा वेळेस नेहमीच व्यक्त करत असतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version