' शिल्पा शेट्टीचं नाही, तर लाज सोडून या कलाकारांनी खुलेआम केलेत खतरनाक ‘किस्से’ – InMarathi

शिल्पा शेट्टीचं नाही, तर लाज सोडून या कलाकारांनी खुलेआम केलेत खतरनाक ‘किस्से’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

बॉलीवूडमधील कलाकार अनेक गोष्टींसाठी कायम चर्चेत असतात, सार्वजनिक ठिकाणी त्यांनी घातलेल्या कपड्यांपासून त्यांच्या विधानांपर्यंत सगळ्या गोष्टी चर्चेत असतात. त्यातून काही ‘हॉट’ टॉपिक्स असतील, तर विचारायलाच नको.

चित्रपटांमध्ये जे सीन्स दिसतात, त्यावरून चर्चा होणं स्वाभाविकच आहे, पण हे सीन्स जर हॉट, रोमँटिक असतील, तर चर्चांना उधाण येतं. पडद्यावरील सीन्सपेक्षा पडद्याआड काय रंगतंय, याकडे लोकांचं लक्ष असतं.

आजही ‘किसिंग सिन’ म्हटलं, की आपल्या भुवया पटकन उंचावतात. पूर्वी चित्रपटातही एखादा किसिंग सिन असणं ही गोष्ट फार मोठी समजली जायची. असा एखाद् दुसरा सिन देणाऱ्या अभिनेत्रीला ‘बोल्ड’ म्हटलं जायचं, पण आता तो काळ गेला. ‘बोल्ड’ काय याचीही व्याख्या बदलली. आता चित्रपट म्हटला की किसिंग सिन नाही असं होतच नाही. अगदी बायोपिक्समध्ये सुद्धा किसिंग सीन्स दाखवले जातात.

हे स्टार्स कुठलीही भीडभाड न बाळगता सार्वजनिक ठिकाणीसुद्धा खुलेआम किस करतात तेव्हा मात्र त्या गोष्टीचा गहजब होतो. अनेक वर्षांपूर्वीची शिल्पा शेट्टी-रिचर्ड गेरेची किसिंग कॉंट्रोव्हर्सी तिची या खटल्यातून अखेरीस निर्दोष सुटका झाल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीये, पण शिल्पा शेट्टीव्यतिरिक्त इतरही काही बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्यांनी असं चारचौघात किस केलंय.

१. बिपाशा बासू –

 

celeb kiss im

 

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूला २००७ साली रियल मॅड्रिड स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने किस केलं होतं. पोर्तुगालमधल्या लिस्बन येथे एक मोठा इव्हेन्ट होस्ट करायला ती गेली होती.

रोनाल्डो आणि बिपाशाने विजेत्यांची नावं घोषित केली तेव्हा रोनाल्डोने बिपाशाला सगळ्यांसमोर किस केलं. तो फोटो बातम्यांपासून सोशल मीडियावर सगळीकडे व्हायरल झाला होता. बिपाशा त्यावेळी जॉन अब्राहम या अभिनेत्यासोबत रिलेशनशीपमध्ये होती. या घटनेमुळे या जोडीचे चाहते चांगलेच खट्टू झाले होते.

२. राखी सावंत –

 

celeb kiss im2

 

काही वर्षांपूर्वी मिका सिंगच्या वाढदिवसाच्या पार्टीला त्याने दारूच्या नशेत राखी सावंतला किस केलं होतं. ही घटना त्यावेळी फारच चर्चेत होती. या घटनेनंतर राखी सावंतने मिका सिंगवर छेडछाडीचा आरोप केला होता.

मिका सिंगने जेव्हा यावर भाष्य केलं तेव्हा तो म्हणाला, की त्याने पार्टीदरम्यान कुणाहीसोबत गैरव्यवहार केला नाही. तो खरंतर राखी सावंतला तिची केस परत देत होता. त्यावेळी मिकाच्या म्हणण्यानुसार तिनेच त्याला पहिल्यांदा किस केलं.

३. दीपिका पदुकोण –

celeb kiss im3

काही वर्षांपूर्वी आयपीएल मॅचदरम्यान रॉयल चॅलेंजर बंगलोर टीमने कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला हरवलं होतं तेव्हा तो विजय साजरा करताना सिद्धार्थ माल्या आणि दीपिका पदुकोण एकमेकांना खुलेआम किस करताना दिसले होते.

त्यांच्या या किसवर बरीच चर्चा रंगली होती. रणवीर सिंगशी लग्न झाल्यानंतर एका अवॉर्ड शो दरम्यान तिने रणवीरलाही स्टेजवर किस केलं होतं.

४. प्रियांका चोप्रा –

 

celeb kiss im4

 

निक जोनसशी लग्न झाल्यानंतर प्रियांका चोप्रा त्याच्यासोबत पार्किंग लॉटमध्ये किस करताना आढळली होती. हे दोघेजण अनेकदा सार्वजनिक ठिकाणी किस करताना दिसतात.

५. ऍमी जॅक्सन –

 

celeb kiss im1

 

काही वर्षांपूर्वी प्रतीक बब्बर आणि ऍमी जॅक्सन एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असताना ते काही मित्रांसोबत गोव्याला मजा करायला गेले होते. त्यावेळी त्या दोघांचा एकमेकांना किस करतानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता.

भूमिकेचा भाग म्हणून पडद्यावर अभिनेत्रींना हे किसिंग सीन्स द्यावे लागतात. पण सार्वजनिक ठिकाणी जेव्हा असं घडताना दिसतं तेव्हा सामान्य माणूस सहाजिकच ते बघून चक्रावतो. कुणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी सेलिब्रिटीज आहोत म्हणून कसंही वागलं तरी चालेल ही कलाकारांची वृत्ती चमत्कारिक वाटते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?