आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ अशी आपल्याकडे म्हण आहे. त्यानुसार एखादी व्यक्ती आयुष्यात पुढे काय करेल याचा साधारण अंदाज ती व्यक्ती तिच्या लहानपणी कशी वागते यावरून बांधता येतो. आयुष्यात पुढे जाऊन जे अभिनयक्षेत्रात जातात त्यांच्या बाबतीतही साधारणपणे काहीसं असंच चित्र दिसतं.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
बऱ्याच मुलाखतींमधून आजवर वेगवेगळ्या कलाकारांनी सांगितलंय की त्यांना लहानपणापासूनच अभ्यासात फारसा रस नव्हता. त्यामुळे अभिनयाची आवड असलेली व्यक्ती अभ्यासात फारशी चुणूक दाखवत नाही असं एक साधारण समीकरण आपल्या डोक्यात तयार झालेलं असतं.
आज मोठ्या झालेल्या बऱ्याच स्टारमंडळींची उदाहरणं पाहूनही आपल्याला याची प्रचिती येते. पण आपल्या याच मताला फाटा देणारीही अनेक स्टार मंडळी आहेत जे उच्चशिक्षण घेऊन मग या क्षेत्रात स्थिरावलेत.
गेली काही वर्षे दाक्षिणात्य चित्रपटांनी, त्यातल्या कलाकारांनी देशभरातल्या जनतेवर गारूड घातलंय. आपल्याला कदाचित माहीत नसेल पण आपल्याच लाडक्या काही साऊथ सुपरस्टार्सनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी शिक्षण पूर्ण करण्याला महत्त्व दिलं आणि मगच ते अभिनयक्षेत्रात उतरले.
तर जाणून घेऊयात अश्या ८ साऊथ सुपरस्टार्सच्या शैक्षणिक पार्श्वभूमीविषयी.
१. प्रभास –
आजवरचा देशातला सर्वाधिक आर्थिक कमाई करणारा ‘बाहुबली’ हा चौथा चित्रपट आहे. प्रभासने त्याच्या बाहुबलीतल्या अभिनयाने तमाम रसिकप्रेक्षकांवर दीर्घकाळ भुरळ पाडली होती.
तो पहिला भारतीय दाक्षिणात्य अभिनेता आहे ज्याचा ‘मादाम तुसाद वॅक्स म्युझियम’मध्ये मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. हैद्राबादच्या श्री चैतन्य महाविद्यालयातून त्याने ‘बी.टेक’ची पदवी मिळवली आहे.
२. अल्लू अर्जून –
–
- चित्रपटात दाक्षिणात्य लोकांना ठराविक साच्यातच दाखवायचं का? ७ खुळचट प्रकार
- अल्लू गेला मित्राच्या लग्नाला, आणि ठरवून आला स्वतःचं लग्न, डिट्टो RHTDM सारखं…
–
पुष्पाच्या घवघवीत यशानंतर अल्लू अर्जून ला कोण ओळखत नाही! साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. याखेरीज तो पार्श्वगायक, नर्तक आणि निर्माताही आहे.
अल्लू अर्जूनने हैद्राबादच्या ‘एमएसआर महाविद्यालया’तून ‘बीबीए’ म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची पदवी मिळवली आहे.
३. धनुष –
आजवर धनुष आपल्याला केवळ एक उत्तम अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक, गीतकार, पार्श्वगायक, निर्माता, दिग्दर्शक म्हणूनही माहीत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटामुळे आणि नुकत्याच झालेल्या त्याच्या घटस्फोटामुळे तो चांगलाच चर्चेत आहे.
आपलं १२ वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. नंतर त्याने मदुराई कामराज विद्यापीठातून डिस्टन्स एजुकेशनच्या माध्यमातून ‘बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन’ची पदवी मिळवली.
४. सूर्या –
अभिनेता या ओळखीखेरीज सूर्या हा टेलिव्हिजन होस्ट आणि निर्मातादेखील आहे. तो मुख्यतः त्याच्या तामिळ चित्रपटातल्या कामांसाठी ओळखला जातो. सूर्या त्याच्या ‘जय भीम’ चित्रपटाच्या यशानंतर चांगलाच चर्चेत आहे.
विशेष गोष्ट ही की हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतही आहे. सूर्या चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयातून ‘बी.कॉम’ झाला आहे.
५. महेश बाबू –
महेश बाबू हा एक देखणा भारतीय अभिनेता, फिलॅन्थ्रॉफिस्ट आणि निर्माता आहे. तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.
तो मुख्यतः त्याच्या तेलगू चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी ओळखला जातो. त्यानेदेखील चेन्नईच्या लोयोला महाविद्यालयामधूनच ‘बी. कॉम’ची पदवी मिळवली आहे.
६. नागा चैतन्य –
सुप्रसिद्ध अभिनेते नागार्जून यांचा मुलगा असलेला नागा चैतन्य हा अभिनेता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला एक मोठा स्टार आहे. तो मुख्यतः त्याच्या तेलगू चित्रपटांतल्या भूमिकांसाठी ओळखला जातो.
आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांसमोर येणार आहे. हैद्राबादच्या सेंट मेरी महाविद्यालयातून त्याने ‘बी.कॉम’पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे.
७. विजय देवरकोंडा –
विजय देवरकोंडा हा साऊथ इंडस्ट्रीतला अतिशय लोकप्रिय अभिनेता. ‘लायगर’ या चित्रपटातून तो लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. त्याने हैद्राबादच्या बद्रुका कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातून ‘बी.कॉम’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
८. दलकीर सलमान –
दलकीर सलमान हा अभिनेता त्याच्या मल्याळम चित्रपटांमधल्या कामासाठी मुख्यत्वे ओळखला जातो. तो ‘मामूट्टी’या अभिनेत्याचा मुलगा आहे.
दलकीरने अमेरिकेच्या पुर्दु विद्यापीठातून ‘बिझनेस मॅनेजमेंट’या विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तो ‘बिझनेस मॅनेजर’ म्हणून काम करायचा.
हे सगळेजण अभिनेते म्हणून जितके उत्तम आहेत तितकेच शिक्षणालाही पुरेसं महत्त्व देणारे आहेत ही बाब निश्चितच त्यांच्या चाहत्यांच्या मनात त्यांचं स्थान अधिक दृढ करणारी ठरेल.
अभिनयक्षेत्रात येण्यासाठी शिक्षणात मागे पडायची आवश्यकता नाही, खरंतर कुणी तसं पडूच नये याचा वस्तुपाठच आपल्या उदाहरणांमधून त्यांनी अभिनेता बनण्याचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या अनेकांना घालून दिला आहे.
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.