Site icon InMarathi

आतंकवाद्यांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले गेलेले शहीद बाबू राम आहेत तरी कोण?

babu im 2

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनेक दिग्गज आणि शूरवीरांचा सन्मान करण्यात आला. दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शहीद बाबू राम यांना सुद्धा त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी गौरवण्यात आले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये जम्मु काश्मीरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू राम यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर केलं. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी रीना राणी आणि त्यांचा मुलगा माणिक यांनी तो पुरस्कार स्वीकारला.

 

 

शहीद बाबू राम यांनी २९ ऑगस्ट २०२० मध्ये श्रीनगर मध्ये झालेल्या एका ऑपरेशन दरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी उल्लेखनीय शौर्य दाखवले आणि त्याच चकमकीत त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ASI बाबू राम यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत १४ एन्काऊंटर ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला होता तर त्यांनी एकूण २८ दहशतवाद्यांना यमसदनी धाडले.

लहानपणापासूनच होती देशभक्तीची आवड –

बाबू राम यांचा जन्म १५ मे१९७२ रोजी जम्मु काश्मीर मधील पुंछ जिल्ह्यात धारणा येथे झाला. लहापणापासूनच त्यांच्या मनात देशाप्रती प्रेम होते आणि त्यांना देशसेवा करण्याची इच्छा होती. म्हणूनच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९९ मध्ये बाबू राम पोलीस खात्यामध्ये कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या कामगिरीच्या जोरावर २००२ साली त्यांना स्पेशल ऑपरेशन फोर्स मध्ये सामील करून घेण्यात आले.

 

 

दहशतवाद्यांचा कर्दनकाळ –

एसओजी मध्ये असतानाच त्यांनी आतंकवाद्यांच्या विरोधात होणाऱ्या अनेक ऑपरेशन मध्ये केवळ सहभाग घेतला नाही तर पुढाकार घेऊन दहशतवादी कारवाया उधळून लावल्या. तसेच अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यांच्या प्राणपणाने लढण्याच्या वृत्तीमुळे आणि साहसासाठी वेळोवेळी सन्मानित करण्यात आले. एवढेच नाही तर त्यांना अनेकदा बढती देऊन प्रोत्साहन दिले गेले.

 

 

आतंकवाद्यांशी सामना करताना झाले शहीद –

२९ ऑगस्ट २०२०च्या दिवशी संध्याकाळच्या सुमारास स्कूटी वरून आलेल्या तीन आतंकवाद्यांनी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस आणि सीआरपीएफ च्या जवानांवर गोळीबार सुरू केला. गोळीबार करतानाच जवळच्या एका घरात त्यांनी प्रवेश केला. एएसआय बाबू राम यांनी त्यांचा पाठलाग करून त्या घराला चारीबाजूने घेरले.त्यानंतर लगेचच बाबू राम यांनी रेस्क्यूसाठी अँक्शन प्लॅन तयार केला.

आतंकवाद्यांशी सामना करताना घरात फसलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. याच दरम्यान सैनिकांची अतिरिक्त फौज दाखल झाली. दहशतवाद्यांना शरण होण्यासाठी सांगितले गेले परंतु त्यांनी दाद दिली नाही. तेंव्हाच अजून एक बातमी आली की आणखी काही लोक घरामध्ये असून दहशतवाद्यांनी त्यांना ओलीस ठेवले आहे.

 

त्यानंतर बाबू राम यांनी पुढाकार घेऊन लोकांना बाहेर काढण्याची मोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि लष्कर कमांडर साकिब बशीरचा खात्मा केला. जखमी झालेल्या बाबू राम यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्यांचा जीव वाचू शकला नाही.

या चकमकीत सहभागी झालेल्या तिन्ही दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. लष्कर कमांडर साकिब बशीर नंतर त्याचे दोन साथीदार तारिक आणि जुबेर अहमद शेख यांनी शरणागती पत्करली. जर त्यादिवशी शहीद बाबू राम यांनी बहादूरी दाखवली नसती तर कदाचित अजून एक मोठा आतंकवादी हल्ला यशस्वी झाला असता. त्यांच्या कार्याला आणि शौर्याला लाख लाख सलाम…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version